देवेंद्र फडणवीसांचा उद्या शपथविधी: युतीच्या नेत्यांकडून सरकार स्थापन करण्याचा दावा, तर राज्यपालांकडून निमंत्रण:
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 11 दिवसांनी आज नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार आहे. विधीमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठी भाजपचे केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. महायुतीमधील प्रमुख नेते फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा केला. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता आझाद मैदान, मुंबई येथे शपथविधी होणार आहे.
महाराष्ट्रात भाजपाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून आलेले विजय रुपानी यांनी सत्ता स्थापनेसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. उद्या कोण-कोण शपथ घेणार? सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना किती वाजता भेटणार? ते त्यांनी सांगितलं.
“आज विधानसभा संसदीय पक्षाचे नेते म्हणून सर्व सहमतीने, एकमताने देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली” असं भाजप नेते विजय रुपानी यांनी सांगितलं. “संसदीय नेता निवडीची प्रक्रिया उत्साहात, आनंदाच्या वातावरणात संपन्न झाली” असं विजय रुपांनी म्हणाले. ते दिल्लीहून केंद्रीय निरीक्षक म्हणून आले होते. त्यांच्या आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या उपस्थितीत भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेत्याची निवड करण्यात आली. भाजप महायुतीमधला मोठा पक्ष आहे. मुख्यमंत्री त्यांचाच होणार. भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड होणं, म्हणजे ते महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असतील.
सरकार स्थापनेचा दावा कधी?
उद्या कोण शपथ घेणार? मंत्रिमंडळातील सदस्य सुद्धा शपथ घेणार का? यावर सुद्धा विजय रुपानी बोलले. “ते संध्याकाळी हायकमांडशी चर्चा झाल्यानंतर ठरेल. उद्या आझाद मैदानात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री नक्की शपथ घेतील” असं त्यांनी सांगितलं. सरकार स्थापनेचा दावा कधी करणार? यावर आज दुपारी 3 वाजता राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याच त्यांनी सांगितलं.
उद्या सरकार स्थापनेसाठी शपथविधी त्याआधीच महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी जाहीर:
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला 230 जागांवर स्पष्ट बहुमतमिळाले असून माहिती सरकारचा शपथविधी पाच डिसेंबरला होणारआहे मुंबईच्या आझाद मैदानावर शपथविधी जोरदार तयारी जात आहे आता शिवसेना शिंदे गटाचे तसेच राष्ट्रवादी शरदमी संपादित करतोपवार गटाचे कुठले नेते शपथ घेणार याबाचत संभाव्ययादी समोर आले आहे या संभाव्य यादी मध्ये नेमक्या कोणत्या नेत्यांची नावे चला जाणून घेऊया या राज्यात पुन्हा एकदा एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अशीय रचना असणार आहे तर महायुतीतमंत्रिपदासाठी च्या वाटपासाठी एका फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली असून त्यानुसार सहा ते सात आमदारांच्यामागे एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता महायुतीमध्ये मंत्रिमंडळाचा अंदाजीत फॉर्मुला 22 12 10 सासू शकतो यात भाजपला 22 मंत्रिपदे त्यानंतर शिवसेनेला बार आणि राष्ट्रवादीला दहा मंत्रिपद मिळण्याची शक्यता. त्याच्या संभाव्य मंत्र्यांची यादी जाणून घेऊया.
भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी पुढीलप्रमाणे:
देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, रवींद्र मंगल, मंगल प्रभात,लोढा चंद्रशेखर, बावनकुळे आशिष, शेलार नितेश ,राणेशिवेंद्रसिंहराजे, राहुल कुलमाधुरी मिसाळ, संजय कुठे, कृष्ण विखे पाटील, गणेशनाईक, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर.
शिवसेना शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी पुढीलप्रमाणे:
एकनाथ शिंदे, शंभूराज देसाईगुलाबराव पाटील, संजय शिरसाठ, भरत गोगावले, उदय सामंत, दादा भुसे, तानाजी सावंत.
अजित पवार संभाव्य मंत्र्यांचीयादी पुढीलप्रमाणे:
अजित पवार, आदिती तटकरे, अनिल पाटील, हसन मुश्रीफ, धर्मराव बाबा आत्राम, धनंजय मुंडे, छगन भुजबळ.
दरम्यान भाजप कडून माहिती सरकारच्या शपथविधीसाठी महत्त्वाच्या नेत्यांना शपथविधीचे आमंत्रण देण्यात आले आहे देशातील बड्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि प्रमुख नेल्यांना निमंत्रित करण्यात आले आहे भाजपशासित राज्यांचा मित्र पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे.
उत्साहच्या वातावरणात हे सरकार स्थापन होतंय याचा आनंद : एकनाथ शिंदे
उत्साहच्या वातावरणात हे सरकार स्थापन होतंय याचा आनंद होतोय, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. महायुतीच्या नेत्यांनी राज्यपालांना सत्तास्थापनेचं पत्र दिलं. त्यानंतर शिंदे यांनी महायुतीच्या नेत्यांसह पत्रकार परिदेषदेत ही प्रतिक्रिया दिली.
“अडीच वर्षापूर्वी इथेच देवेंद्रजींनी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून माझ्या नावाची शिफरस केली होती. आज देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत अशी शिफारस आणि समर्थनाचं पत्र दिलं आहे. आम्ही आधीच त्यांना पाठिंबा दिला होता. मोदी आणि अमित शाह असतील नड्डा असतील हे जो काही निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा असेल. खेळीमेळीच्या वातावरणात हे सरकार स्थापन होतंय याचा आनंद आहे. आतापर्यंतच्या इतिहासात एवढं बहुमत मिळालं नव्हतं”असं शिंदे यांनी म्हटलं.
एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात असणार की नाही याबाबत अनिश्चितता:
राज्यात महायुतीचं सरकार येणार आहे. महायुतीने राज्यपालांकडे थोड्याच वेळापूर्वी सत्तास्थापनेचा दावा करत आमदारांच्या बहुमताचं पत्र दिलं आहे. त्यानंतर महायुतीतील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघेही पत्रकार परिषदेतून संबोधित आहेत. या दरम्यान एकनाथ शिंदे हे नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात असणार की नाही याबाबत अनिश्चितता आहे. “आम्ही शिंदेना मंत्रिमंडळात राहण्याची विनंती केली आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
शिंदेच्या शिवसेनेची मागणी काय?
मुख्यमंत्री असताना तुमचा प्रशासनावर वचक निर्माण झाला आहे. तसा वचक अन्य कोणाचाही नसेल. त्यामुळे वाटाघाटीत महत्त्वाची खाती घ्या. ती अन्य कोणाकडे देऊ नका,’ अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या खासदारांनी शिंदेंकडे केली. आमदारांपाठोपाठ आता खासदारांनीदेखील सत्तेत सहभागी व्हा, असा सूर लावल्यानं शिंदे काय करणार याकडे लक्ष लागलं आहे. गावावरुन येताच बैठका रद्द; शिंदे काय करणार? ३ शक्यता; तिसरी प्रत्यक्षात आल्यास भाजपला फटका.
मुख्यमंत्रिपद सोडणाऱ्या शिंदेंना भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर आहे. उपमुख्यमंत्रिपदासह गृह मंत्रालयाची जबाबदारी मिळावी, अशी शिवसेनेची मागणी आहे. पण भाजप उपमुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार नाही. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृह मंत्रिपद होतं. तोच पॅटर्न पुन्हा राबवण्यात यावा, अशी शिवसेनेची मागणी आहे.
देवेंद्र फडणवीस उद्या संध्याकाळी ५.३० वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार:
देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी ५.३० वाजता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.