21 फेब्रुवारीला लखनऊच्या आशियाना पोलीस स्टेशनला एक तक्रार दाखल झाली तक्रार होती मिसिंगची आपले वडील मानवेंद्र सिंग हे 20 तारखेपासून गायब आहेत शिवाय त्यांचे तिन्ही फोन सुद्धा बंद आहेत अशी तक्रार मुलगा अक्षतन दिली पोलिसांनी तक्रार घेतली त्यांच वर्णन जाणून घेतलं आणि सुरू झाला शोध गायब असलेल्या मानवेंद्र यांचा शोध त्यांनी आधी सीडीआर त्यांच लास्ट लोकेशन सगळी माहिती घेतली पण पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हतं इकडे मानवेंद्र यांचा शोध सुरू असतानाच दोन दिवसांनी एका पाहुण्यांना मुलगा अक्षतन माहिती दिली की आपल्या वडिलांनी स्वतःला संपवलय त्यामुळे पोलिसांना अक्षतवर संशय आला जेव्हा त्याची चौकशी झाली तेव्हा सुटलं कोड गायब असलेल्या मानवेंद्र यांचं चौकशीत समोर आलं मानवेंद्र यांचा खून अक्षतनेच केला होता कारण होतं नीटची तयारी करण्यासाठी वडिलांकडून दिलं जाणार प्रेशर आणि ठेवलं जाणार लक्ष बरं अक्षत इथेच थांबला नाही त्याने हते त्याच्या गुन्ह्यातून सुटायचं फिल्मी प्लॅनिंग सुद्धा केलेलं पण आपणच केलेल्या प्लॅनिंग मध्ये तो अडकला आणि एक थरारक स्टोरी समोर आली.
मानवेंद्र कोण होते आणि यांचं कुटुंब:
लखनऊच्या सेक्टर एल मधल्या घर क्रमांक 91 मध्ये राहणारं मानवेंद्र यांचं कुटुंब. घरात मानवेंद्र त्यांचा मुलगा आणि मुलगी असं त्रिकोणी कुटुंब. 2017 मानवेंद्र यांच्या बायकोचे निधन झालं होतं. त्यामुळे घरात हे तिघच राहिला होते. तीन मजली घरात पहिल्या मजल्यावर एक कुटुंब भाड्यान राहायला होतं तर तळ मजल्यावर त्यांचे भाऊ राहायला होते. मानवेंद्र यांच्याकडे लखनऊ शहरात चार पॅथोलॉजी लॅब तर दोन दारूची दुकान होती. त्यांची लहान मुलगी ही 11 वीत शिकायची तर त्यांचा मुलगा अक्षत हा बीबीएच्या पहिल्या वर्षात शिकत होता. यापूर्वी त्यानं बायोलॉजी विषयात बारावीची परीक्षा पास केली होती. सोबतच तो एका प्रतिष्ठित संस्थेत नीटची सुद्धा तयारी करत होता.
याआधी त्याने दोन वेळा नीटची परीक्षा दिली होती पण त्यात तो नापास झाला होता आपल्या पोरान शिकावं डॉक्टर व्हावं असं मानवेंद्र यांना वाटत होतं पण अक्षतला त्यात अजिबात रस नव्हता त्याला मोठा बिझनेसमन बनायचं होतं आणि याच कारणावरून या पितापुत्रात वाद व्हायचे अशातच 20 फेब्रुवारीला मानवेंद्र हे दिल्लीला जातो असं सांगून घरातून निघून गेले पण नंतर सापडला त्यांचा मृतदेह त्याचं झालं असं की 21 फेब्रुवारीला अक्षतने लखनऊच्या आशियान पोलीस स्टेशनला तक्रार दिली की माझे वडील 20 तारखेच्या सकाळपासून गायब आहेत. 20 तारखेच्या पहाटे 6:00 वाजता त्यांनी मला उठवलं आणि मी कामानिमित्त दिल्लीला जाऊन येतो. तू दार लावून घे असं सांगितलं.
पण दुपारी मी त्यांना कॉल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचे तिन्ही फोन बंद यायला लागले अशी माहिती अक्षतने पोलिसांना दिली तेव्हा पोलिसांनी त्याची तक्रार दाखल करून घेतली आणि प्राथमिक माहितीच्या आधारे तपासाला सुरुवात केली. परिसरात असलेले सीसीटीव्ही त्यांच लास्ट लोकेशन त्यांचे मित्र मंडळी मानवेंद्र जिथे जिथे जाऊ शकतात त्या त्या ठिकाणी पोलिसांनी चौकशी केली पण पोलिसांना काहीच क्लू मिळत नव्हता.
शिवाय जेव्हा पोलिसांनी त्यांच लास्ट लोकेशन पाहिलं तर ते त्यांच्याच लॅब मधलच निघालं पण तिथे त्यांचा फोन नव्हता त्यातच पोलिसांनी सीडीआर काढला होता पण त्यात सुद्धा काहीच संशयास्पद आढळून आल नाही त्यामुळे मानवेंद्र यांच्या सोबत नेमकं काय झालं असेल ते कुठे गेले असतील असे अनेक प्रश्न पोलिसांना पडले होते इकडे दोन दिवस झाले तरी मानवेंद्र यांचा काहीच पत्ता लागत नव्हता त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या घरच्या लोकांची मित्र मंडळींची परिसरात असलेल्या लोकांची सगळ्यां ची चौकशी केली त्यातून काही माहिती मिळते का हे पाहिलं पण काहीच माहिती समोर येत नव्हती.
अक्षतने वडिलांची गोळी घालून हत्या केल्याचं कबूल केलं:
मानवेंद्र हे लखनऊ मधील मोठे व्यापारी असल्याने ते गायब झाल्याची बातमी सगळीकडेच पसरली त्यांच्या मित्रांनी नातेवायकांनी त्यांच्या घरासमोर एकच गर्दी केली चौकशी शोधाशोध सगळं सुरू होतं पण त्यातून कोणतीच ठोस माहिती मिळत नव्हती अशातच 23 फेब्रुवारीला मानवेंद्र यांच्या एका नातेवायकाला मुलगा अक्षतन बोलताना सांगितलं की आपल्या वडिलांनी स्वतःला संपव माहिती लगेच पोलिसांना समजली तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी केली तेव्हा अक्षतच्या जबाबात पोलिसांना विसंगती आढळली पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने आपणच वडिलांची गोळी घालून हत्या केल्याचं कबूल केलं वडिलांच्या शरीराचे तुकडे करून ते फेकून दिले शीर आणि काही भाग घरातल्या निळ्या ड्रम मध्ये भरून ठेवलाय अशी माहिती दिली.
दोन दिवस वडील गायब आहेत म्हणून जो मुलगा शोध घेत होता त्यानेच वडिलांना संपवलं होतं अगदी क्रूरपणे आणि वडिलांना संपवण्याच कारण काय तर नीट परीक्षा अक्षत हा बायोलॉजी विषयातून बारावीत पास झाला होता. आपल्या मुलांना डॉक्टर व्हाव अशी मानवेंद्र यांची खूप इच्छा होती. त्यासाठी ते सगळ्या गोष्टी त्याला पुरवत होते पण अक्षतच मन दुसरीकडेच होतं त्याला अभ्यासात रस नव्हता त्याला आपल्या वडिलांपेक्षा मोठा बिझनेसमन व्हायचं होतं त्याचे वडील त्याला सतत नीटच्या अभ्यासासाठी प्रेशर देत होते याचा अक्षतला राग होता शिवाय गेल्या काही महिन्यांपासून मानवेंद्र हे त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून होते कारण चार महिन्यांपूर्वी मानवेंद्र यांच्या घरातून मौल्यवान दागिने चोरीला गेले होते.
सुरुवातीला मानवेंद्र यांनी मोलकर्णीवर संशय घेऊन पोलिसात तक्रार दिली होती. पण नंतर त्यांना समजलं की दागिने आपल्याच मुलाने गायब केलेत. त्यामुळे त्यांनी पोलीस तक्रार मागे घेत अक्षतला धारेवर धरलं होतं आणि तेव्हापासून ते अक्षत वरती लक्ष ठेवून होते.
वडील आणि पुत्र यांच्यात वाद सुरु झाला कारण?
अशातच 20 फेब्रुवारीच्या मध्यरात्री नीटच्या तयारीवरून वडील आणि मुलामध्ये वाद झाला. वाद इतका वाढला की रागाच्या भरात मानवेंद्र यांनी आपल्या मुलावर बंदूक रोकली पण नंतर त्यांनी आपला राग आवरला ते शांत झाले आणि आपल्या रूममध्ये झोपायला गेले वडिलांच आपल्यावर लक्ष ठेवणं सतत नीटच्या तयारीसाठी प्रेशर देणं यातून त्याने आपल्या वडिलांना कायमच संपवण्याचं ठरवलं रात्री जी बंदूक वडिलांनी त्याच्यावर रोखली होती तीच बंदूक घेऊन तो पहाटे चार च्या दरम्यान वडिलांच्या रूममध्ये गेला आणि शांत झोपलेल्या वडिलांवर गोळी झाडली ज्यात त्यांचा चा जागीच मृत्यू झाला.
नंतर तो एकदम शांत बसला आणि मृतदेहाची विलेवाट कशी लावायची याचा विचार करू लागला. नंतर त्याने त्याच मृतदेहाचे तुकडे केले एका बॅगेत भरले आणि सदरवना गावाच्या जवळ फेकून दिले तर शीर आणि काही भाग हा घरात असलेल्या निळ्या ड्रम मध्ये ठेवला. नंतर 21 फेब्रुवारीला पोलिसात वडिलांच्या मिसिंगची तक्रार दिली पण पोलिसांच्या चौकशीत तो फसला आणि हे सगळं हत्याकांड समोर आलं काही स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मानवेंद्र यांच्या बायकोच निधन झालं तरी त्यांनी दुसरं लग्न केलं नव्हतं कारण त्यांच्या मुलावर त्याचा परिणाम होऊ शकतो असं ते नेहमी सांगायचे तर काही वर्षापूर्वी अक्षत हा घरातले पैसे लॅपटॉप आणि बॅग घेऊन घरातून निघून गेला होता सोबतच त्यान सहा पानाची एक चिठ्ठी लिहिली ज्यात त्याला मोठं बिझनेसमन बनायचं होतं असं लिहिलं होतं.
नंतर त्याच्या वडिलांनी आणि त्याच्या मित्रांनी त्याला कानपूर मधून शोधून काढलं होतं आता त्यानेच हत्या केल्याच समजल्याने सगळ्यांनाच धक्का बसलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं तेव्हा त्याच्या जबाबात आम्हाला विसंगती आढळली म्हणून त्याच्यावर आमचा संशय वाढला त्याची अधिकची चौकशी केली तेव्हा त्यान हत्या गेल्याचं कबूल केलं त्याच्या घरातून आम्ही तो निळा ड्रम ताब्यात घेतलाय मृतदेह सापडल्यानंतर वरिष अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची तपासणी केली आणि पुरावे गोळा केले तर बाकी पार्टचा शोध सुरू आहे शिवाय त्याच्या घरातून आम्ही 20 लिटर ऍसिड जप्त केलाय सध्या अक्षत अटकेत असून गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारे त्याच्यावर संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल केला जाईल सध्या याचा तपास सुरू आहे.




