अजित दादांना भिडणाऱ्या IPS “अंजना कृष्णा” आहेत तरी कोण?

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

डेपुटी, चीफ मिनिस्टर बोल रहा हु, आपको आदेश देता हु व काम रुकवाणा नही, एक मिनिट तेरे उपर ॲक्शन लुगा मुझे डायरेक्ट फोन बताती हो, तुझे मेरा चेहरा देखना है ना, तेरा नंबर दे मेरा चेहरा तो आपको समझ आयगा, ना इतना डेरिंग हुवा है आपको – हे शब्द आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तेच अजित पवार जे धरण भरण्याच्या वक्तव्यावरून चर्चेत आले होते.

आणि त्यानंतर त्यांनी आत्मक्लेश केला होता आणि यापुढे राजकारणात तोलून मोजून मापून बोलण्याचं त्यांनी ठरवलं होतं. तेच अजित पवार आज एका आयपीएस अधिकाऱ्याला त्यातही महिला पोलीस अधिकाऱ्याला ज्या भाषेत बोलतायत ते अजिबात अपेक्षित नाहीये. एक प्रामाणिक महिला पोलीस अधिकारी बेकायदा मुरूम उत्खनन सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचते तिथे कारवाई थांबवते ते तिचं काम आहे ती तिचं काम करतीय आणि त्याच वेळी काही गुंड आणि राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे कार्यकर्ते येतात काहींच्या हातामध्ये लाठ्या काठ्या असतात एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता थेट आपल्या

नेत्याला आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावून देतो आणि त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या भाषेत बोलतात हे महाराष्ट्राने ठरवावं कितपत योग्य आहे. आज यामध्ये अपडेट अशी आहे की ग्राम महसूल अधिकारी प्रीती शिंदे यांच्या फिर्यादीवरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह 20 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे सविस्तर जाणून घेऊयात हे सगळं प्रकरण नेमकं काय अजित पवारांना एवढा राग का आला उपमुख्यमंत्र्यांना आयपीएस अधिकाऱ्याला अशा पद्धतीने आदेश देण्याचा अधिकार आहे का? आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना नडणाऱ्या आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा नेमक्या कोण आहेत?

प्रकरण कस उघडकीस आल:

सविस्तर जाणून घेऊयात आपण सुरुवातीला त्या व्हिडिओबद्दल बघूयात ज्यामध्ये अजित पवार कोणत्या भाषेत त्या महिला पोलीस अधिकाऱ्या सोबत बोलले. त्यामध्ये अजित पवार हे मोठ्या आणि अनपेक्षित भाषेत आयपीएस अधिकारी सोबत बोलले कि, तुला माझा चेहरा बघायचाणा बघ तर मग आणि तुझा नंबर दे, तुझ्याशी काय ते मी बोलून घेईल, असं बोलत असताना ज्या आयपीएस अधिकारी आहेत त्यांनी सर्व बोलन रेकॉर्ड केल होत त्यावरून हे सर्व प्रकरण उघडकीस आल.

सविस्तर नीट हे सगळं प्रकरण काय ते समजून घ्या प्रकरण सोलापूर जिल्ह्यातल्या माडा तालुक्यातल्या कुरडू गावातला आहे. या गावामध्ये रस्त्याचं काम सुरू होतं ठेकेदाराकडून मुरूम उत्खनन केलं जात होतं. काहीच म्हणण आहे की हे काम परवानगी घेऊन सुरू होतं पण ज्या भागात ज्याला ग्रामीण शासकीय भाषेमध्ये गट असं म्हणतात त्या ठिकाणी परवानगी नव्हती आणि त्यामुळे पोलीस उपधीक्षक अंजना कृष्णा यांनी त्या ठिकाणी रेट टाकली अवैध मुरूम उत्खनन होत असल्याची माहिती मिळाल्यामुळे त्यांनी ही कारवाई सुरू केली पण गावातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हे फार काही पचलं नाही काहींनी सांगितलं हा महसूलचा विषय आहे.

इथे आयपीएस अधिकाऱ्याचं काय काम? म्हणजे बघा गाव गुंड ठरवणार कोणत्या अधिकाऱ्यांन काय कारवाई करायची? हद्द तर तेव्हा झाली जेव्हा तिथे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता बाबा जगताप हा थेट उपमुख्यमंत्र्यांना फोन लावतो. लक्षात घ्या सोलापूर जिल्ह्यातल एक छोटसं गाव अवैध मुरूम उत्खननावरती कारवाई करण्यासाठी एक महिला आयपीएस अधिकारी येते आणि तिला कारवाई थांबवायला सांगण्यासाठी चक्क उपमुख्यमंत्र्यांना फोन जातो.

उपमुख्यमंत्र्यांचे फोन वरील शब्द…

विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार त्या आयपीएस अधिकाऱ्यावरती चिडचिड करतात डेपुटी, चीफ मिनिस्टर बोल रहा हु आपको आदेश देता हु ओ काम रुकवाओगे तो एक मिनिट मे तेरे उपर ॲक्शन लूंगा मुझे डायरेक्ट फोन पर बताती हो तुझे मेरा चेहरा देखना है नंबर दो मेरा चेहरा तो आपको समझ आयेगा ना इतना डेरिंग आपको कैसे हुआ. हे उपमुख्यमंत्र्यांचे शब्द आहेत महाराष्ट्राच्या मुळात माननीय उपमुख्यमंत्र्यांना आयपीएस अधिकाऱ्याला आदेश देण्याचा अधिकार नाहीये तशा पद्धतीचे कोणतेही विशेष अधिकार भारतीय घटनेने कायदा संस्थेन उपमुख्यमंत्र्यांना दिलेले नाहीयेत. हे एक राजकीय पद आहे.

राज्यघटनेने कुठलाही विशेष दर्जा माननीय उपमुख्यमंत्री पदाला दिलेला नाहीये मग अजित पवार कोणत्या अधिकारान असा आदेश देतायत हा पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न असं फोनवरून आदेश देता येत नाही त्या संदर्भात लेखी काही असेल तर ठीक आहे आज उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, उद्या नसतील दुसरं कोणीतरी असेल त्यामुळे शासकीय काम अशी तोंडी फोनवरून आदेश देऊन होत नाही. तिसरा प्रश्न अजित पवारांना राग येण्याच कारण काय एका गावातला एक साधा कार्यकर्ता फोन लावून देतो समोरून आवाज येतो मी डेपुटी, सीएम बोल रहा हु यावरती त्या आयपीएस अधिकाऱ्यांना विश्वास का ठेवावा.

अजित पवार म्हणायचे गुन्हा केला तर…

आजकाल कोणीही अजित पवारांचा आवाज काढून बोलू शकतं एआयच्या मदतीने आवाज क्रिएट केला जाऊ शकतो. त्यामुळे त्या महिला अधिकाऱ्यांना जर थेट तिच्या फोनवरती कॉल करा असं म्हटलं असेल तर त्यात गैर काय दादा तुम्हीच म्हणाला होता तुम्हाला पुन्हा एकदा एक आठवण करून देतो, नियम मोडत असेल तर त्याला टायरमध्ये घालून हाणा अजित पवार असो की अजित पवारांचा नातेवाईक असो हे तुम्ही जाहीर भाषणामध्ये सांगता आणि कोण कुठला तुमचा कार्यकर्ता जो अवैध काम थांबवावं म्हणून तुम्हाला फोन करतो आणि तुम्ही पोलीस आयपीएस अधिकारी यांच्याशी या भाषेमध्ये बोलता हे काही पटण्यासारखं नाहीये.

मग कळेल आता दादा कोण आणि आता या केसमध्ये कोणाला टायरमध्ये घालायचं ते सुद्धा सांगा पण त्या आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच अभिनंदन केलं पाहिजे त्यांनी त्यांच कर्तव्य पार पाडल आज या प्रकरणामध्ये श्री दादाराव माने यांच्या शेतामध्ये अवैध मुरूम उत्खनन केल्या प्रकरणामध्ये जमाव जमवून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणामध्ये बाबा जगताप, नितीन माळी, संतोष कापरे, अण्णा धाणे यांच्यासह 20 ग्रामस्थानवरती गुन्हे दाखल झालेले आहेत.

पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या अवैध मुरूम उपसा करणाऱ्यांवरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वरदहस्त आहे का? अपेक्षा आहे माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यावरती उत्तर देतील आणि ज्या आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांनी कुठलीही पातळी न सोडता आवाजाचा सूर कमी जास्त होऊ न देता आजूबाजूला लाठ्या काठ्या घेऊन गुंड उभे असताना अजित पवार यांना अत्यंत संयमी भाषेमध्ये कायदेशीर उत्तर दिलं त्या अंजना कृष्णा नेमक्या कोण आहेत ते सुद्धा पाहूयात..

आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांची कामगिरी आणि वयक्तिक माहिती:

आयपीएस अंजना कृष्णा या मूळच्या केरळ मधल्या त्रिवेंद्रमच्या त्रिवेंद्रम म्हणजे भारतातल एक महत्त्वाच श्रीमंत देवस्थान श्री पद्मनाभ स्वामी मंदिर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तेच त्रिवेंद्रम तर या त्रिवेंद्रम जवळच्या एका छोट्याशा गावामध्ये त्यांचा जन्म झाला होता 2023 ला त्या आयपीएस झाल्या भारतातून त्यांनी 55वी रँक घेतली होती. सुरुवातीला त्यांना होम केडर देण्यात आलं त्रिविंद्रम एसीपी पदावरती त्यांनी काम केलं आणि त्यानंतर महाराष्ट्रात त्यांची बदली झाली.

सोलापूर ग्रामीण पोलीस दलामध्ये पंढरपूर भागात प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी पदावरती ते आहेत. आपल्या बेधडक कारवायांमुळे त्या अल्पावधीमध्येच सोलापूर जिल्ह्यात सध्या चर्चेत आहेत. एका जुगार अड्ड्यावरती छापा टाकून नऊ लाखांचा मुद्देमाल त्यांनी जप्त केला होता आणि 18 जणांवरती गुन्हा दाखल केलेला होता. करमाळ्यामध्ये डीजेच्या गोंगाटावरती कारवाई करत त्यांनी डीजे मुक्त उत्सवाची सुद्धा सुरुवात केलेली आहे.

शिस्तीच्या अधिकारी आहेत. अवैध कामाच्या विरोधात न डगमगता कारवाई करतात आणि अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांच कसं खच्चीकरण होतं त्याचं उदाहरण हे व्हायरल झालं म्हणून कळलं नाहीतर एरवी पडद्यामागे काय काय घडत असेल सामान्य माणसाला ते माहिती पण नसतं आता या गाव गुंडांवरती गुन्हे तर दाखल झालेले आहेत पण उपमुख्यमंत्री अजित पवार अशा गुंडांसाठी फोन का करतात त्यांचा फोन का घेतात हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *