⛈️पावसाळा येताच सोबत येते ते म्हणजे सर्दी अन खोकला, अशी घ्या काळजी!
▪️जर आपल्याला कफचा त्रास होत असेल तर, एका बाऊलमध्ये काळीमिरीची पावडर घ्या. त्यात मध घालून मिक्स करा. १० ते १२ तासांसाठी तसेच ठेवा किंवा रात्रभर ठेवा. सकाळी उठल्यानंतर खा. यामुळे कफाचा त्रास कमी होईल.
▪️ मान्सूनमध्ये प्राणायाम नियमित करावे. यामुळे श्वास घेण्यात अडचण होणार नाही.
▪️जर आपल्याला दमा, कफचा त्रास असेल तर, हळद-कापूर आणि हळद-कडुलिंब यांचे मिश्रण करून खा. यामुळे कफचा त्रास कमी होईल.
▪️ जेव्हा सर्दी खोकल्याचा त्रास वाढतो, तेव्हा श्वसनमार्गातील कफ देखील वाढते. ज्यामुळे बऱ्याचदा श्वास घेण्यातही अडचण निर्माण होते. अशावेळी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे टाळावे. यामुळे कफचे उत्पादन वाढते. ज्यामुळे घशाचा त्रास वाढू शकते.
▪️ गोल मिरची देखील फायदेशीर ठरू शकते. गोल मिरचीमध्ये पाइपरिन कंपाऊंड असते. जे कफ पातळ करते. ज्यामुळे सर्दी आणि खोकल्याचा त्रास कमी होतो. यासह योग आणि प्राणायाम देखील ऋतू बदलांमुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळवून देऊ शकतात.