PM Kisan चा लाभ बंद झालेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू…

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ अद्याप न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. विविध तांत्रिक कागदपत्रातील किंवा मालकी हक्कातील अडचणीमुळे योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा या योजनेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शासनाने नव्याने लाभार्थी समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू केल्याने लाखो शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदतीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण 12000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये केंद्र सरकारकडून 6000 रुपये आणि राज्य सरकारकडून 6000 रुपये दिले जातात. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात तीन समान हप्त्यामध्ये जमा केली जाते. शेतीसाठी लागणारा खर्च, बियाणे, खत, औषधे तसेच कुटुंबाच्या दैनंदिन गरजासाठी ही मदत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरते. मात्र अनेक शेतकरी विविध कारणांमुळे या योजनेपासून आजपर्यंत वंचित राहिले आहेत.

जाणून घ्या कुणाला करता येणार अर्ज;

  • शासनाच्या माहितीनुसार कागदपत्रामधील त्रुटी
  • आधार बँक खात्याशी लिंक नसणे.
  • जमिनीच्या नोंदीमध्ये नावात तफावत.
  • शेतीचा वारसा बदल शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर मालकी हस्तांतरण न होणे.

अशा अनेक कारणामुळे मोठ्या संख्येने शेतकरी या योजनेच्या लाभापासून दूर राहिले होते. अशा सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांनाही आर्थिक मदतीचा आधार मिळावा या उद्देशाने शासनाने नव्याने अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्ज कोण करू शकतो?

खालील शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

  • या योजनेअंतर्गत लहान व अल्पभूधारक शेतकरी अर्ज करू शकतात.
  • ज्यांचे नाव अधिकृत जमिनीच्या नोंदीत आहे.
  • आधार कार्ड, मोबाईल व बँक खाते लिंक असलेले शेतकरी.
  • पूर्वी लाभ बंद झाला होता किवा मिलाच नव्हता असे शेतकरी.

आवश्यक अटी काय आहेत?

अर्ज करण्यापूर्वी या गोष्टी पूर्ण असणे आवश्यक आहे.

  • अर्जदार शेतकऱ्याचे नाव राज्य किंवा केंद्र सरकारच्या अधिकृत जमिनीच्या नोंदीमध्ये असणे आवश्यक आहे.
  • आधार कार्ड
  • बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे.
  • मोबाईल क्रमांक आधारशी जोडलेले असणे बंधनकारक आहे.

या अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करता येणार आहे.

ऑनलाईन नोंदणी कशी करायची?

तर जाणून घ्या की नोंदणी कशी करायची नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून शेतकऱ्यांना अधिकृत संकेत स्थळ

  • pmkisan.gov.in/homenew.aspx या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करता येईल.
  • यासाठी नवीन शेतकरी नोंदणी हा पर्याय निवडावा लागेल.
  • त्यानंतर संबंधित राज्याची निवड करावी.
  • आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकावा लागेल.
  • मोबाईलवर येणारा ओटीपी नोंदवल्यानंतर अर्जाची प्रक्रिया पुढे जाईल.
  • यामध्ये शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती भरा.
  • जमिनीचा तपशील बँक खाते क्रमांक आणि आवश्यक कागदपत्राची माहिती भरून अर्ज सबमिट करावा लागेल.

महत्त्वाची सूचना:

अर्ज करताना चुकीची माहिती भरू नका.

सर्व कागदपत्रे बरोबर असल्याची खात्री करा.

अन्यथा अर्ज फेटाळला जाऊ शकतो.

PM Kisan योजनेचा लाभ बंद झालेल्या किंवा न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे वेळ न दवडता आजच अर्ज करा आणि दरवर्षी 12,000 रुपयांचा थेट लाभ मिळवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *