शेतकरी आणि कृषी व्यवसायासाठीच्या टॉप 10 सरकारी योजना ज्यामध्ये तुम्हाला फंडिंग, सबसिडी ग्रँड म्हणजे अनुदान आणि टेक्निकल सपोर्ट हा मिळणार आहे. कृषी उद्योजकांसाठी सबसिडी आणि ग्रँड संबंधी काही योजना ज्या की प्रत्येक शेतकऱ्यांना माहिती असणं आवश्यक आहे आणि जर तुम्हीही एग्रीकल्चर स्टार्टअप किंवा शेती संबंधित काही प्रक्रिया उद्योग किंवा कुठलाही उद्योग जर सुरू करण्याच्या विचारात असाल किंवा सध्याचा तुमचा जो प्रक्रिया युनिट आहे त्याचा व्यवसाय वाढवू इच्छित असाल तर या योजनेचा तुम्हाला नक्की फायदा घ्यायचा आहे. खूप चांगल्या योजना या ग्रीकल्चरल सेक्टरसाठी गव्हर्नमेंट राबवत आहे.
1) पहिली योजना ऍग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड:
कृषी व्यवसाय साठी सर्वात पहिली योजना आहे ऍग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड म्हणजेच एआयएफ ही जी स्कीम आहे ही कृषी क्षेत्रातील इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट साठी आहे म्हणजे जो काही तुम्ही कृषी क्षेत्रामध्ये कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करणार आहात किंवा कोल्ड स्टोरेज वेअरऊस किंवा प्रायमरी कलेक्शन सेंटर इत्यादी सुरू करणार आहात तर त्यासाठी तुम्हाला दोन ते 25 कोटी रुपयापर्यंत इथे कर्ज दिला जातो आणि याचा जो व्याज दर आहे तर तो एकदम कमीत कमी व्याजदर असतो आणि त्यामध्ये तुम्हाला तीन टक्के व्याजदामध्ये सवलत दिले जाते आणि सोबतच क्रेडिट गॅरंटीची ही सुविधा तुम्हाला शासनामार्फत दिल्या जाते म्हणून नक्की या स्कीमचा तुम्ही बेनिफिट घ्या.
2) पुढील योजना फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राईजेस;
त्यानंतर पुढची योजना आपण बघूयात पीएम एफएमई म्हणजेच फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राईजेस ही जी योजना आहे ही लघु आणि सूक्ष्म जी फूड प्रोसेसिंग युनिट आहे त्यांच्यासाठी आहे आणि गव्हर्मेंट यामध्ये 35% पर्यंत तुम्हाला सबसिडी देते या योजनेमुळे तुम्ही तुमच्या युनिटच मॉडर्नायझेशन ब्राँडिंग आणि मार्केटिंग इत्यादी सुधारू शकता आणि ग्रो करू शकता. तर अशी ही पीएमएफएमई खूप सोपी आणि ताबडतोप आपल्याला अनुदान आणि फंडिंग देणारी योजना आहे.
3) नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड
पुढची जी योजना आहे म्हणजे जी स्कीम आहे ती नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड म्हणजे एनएचबी यांच्या मार्फत राबवली जाणारी स्कीम आहे. मग या स्कीमच्या अंडर मध्ये तुम्ही फळबाग किंवा भाजीपाला लागवड किंवा नर्सरी किंवा कोल्ड स्टोरेज इत्यादी व्यवसाय सुरू करू शकता. एनएचबी योजने अंतर्गत तुम्हाला 40 ते 50 टक्क पर्यंत अनुदान दिल जात ही जी योजना आहे बागायती आणि जे व्यवसाय व्हॅल्यू डिशन करतात यांच्यासाठी आहे.
4) प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना:
त्यानंतर कृषी व्यवसायासाठी पुढची योजना आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ही योजना सिंचन आणि जल संरक्षण यासाठी आहे म्हणजे ड्रीप किंवा स्प्रिंकलर इरिगेशन इत्यादी जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये बसवत असाल तर तुम्हाला 55 ते 75 टक्क पर्यंत सबसिडी दिल्या जाते.
5) डेरी अंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट योजना:
पुढची योजना आहे डेरी अंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट स्कीम म्हणजे डीएस या योजने अंतर्गत जर तुम्ही डेरी दुग्ध व्यवसाय किंवा पशुपालन इत्यादी जर सुरू करायचा विचार करत असाल तर नाबार्ड द्वारे चालवल्या जाणाऱ्या या योजनेत तुम्हाला 25 ते 35% पर्यंत सबसिडी मिळणार आहे. ही जी योजना आहे डेरी प्रोसेसिंग इक्विपमेंट आणि ट्रान्सपोर्टेशन इत्यादीसाठी आर्थिक सहाय्य तुम्हाला करणार आहे.
6) नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन:
पुढची योजना आहे नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन म्हणजेच आपण याला एनएलएम असं म्हणतो ही योजना गोट फार्मिंग पोल्ट्री फार्मिंग फडर डेव्हलपमेंट आणि फीड मिल इत्यादी सारख्या व्यवसायांसाठी ही योजना फायदेशीर आहे. यामध्ये ट्रेनिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि इक्विपमेंट जे काही लागणार आहे त्यामध्ये तुम्हाला अनुदान दिल जात. मग जर तुम्ही पशुपालन या क्षेत्रामध्ये जर व्यवसाय करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही योजना एकदम बेस्ट आहे.
7) ग्रीकल्चर मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर:
पुढची योजना आहे ग्रीकल्चर मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे एएमआय यामध्ये जर तुम्ही ग्रेडिंग पॅकिंग स्टोरेज आणि मार्केट यार्ड यासारख्या सुविधा विकसित करू इच्छित असाल तर या योजनेअंतर्गत तुम्हाला 25 ते 33% पर्यंत कॅपिटल सबसिडी मिळणार आहे. कॅपिटल सबसिडी म्हणजे जे काही तुम्ही खर्च करणार आहात जे काही कॅपिटल इन्हेस्टमेंट करणार आहात तर त्यावर तुम्हाला सबसिडी मिळणार आहे. ही योजना शेतकऱ्यांना व्हॅल्यू चेन मध्ये जोडण्यासाठी आणि पोस्ट हार्वेस्ट नुकसान जे होतं तर ते कमी करण्यासाठी आहे.
8) राष्ट्रीय कृषी विकास योजना:
पुढची योजना आपण बघूया राष्ट्रीय कृषी विकास योजना म्हणजेच आर केव्ही वाय रफ्तार ही योजना ग्रीपनर्स म्हणजेच कृषी उद्योजक आणि स्टार्टअप साठी तुम्हाला थेट असा निधी दिला जातो यामध्ये आणि म्हणून जर तुमच्याकडे इनोव्हेटिव्ह ग्रीकल्चरल जर काही आयडिया असेल तर यामध्ये तुम्हाला इन्क्युबेशन सेंटर मार्फत 5 ते 25 लाख रुपयापर्यंत सीड फंडिंग मिळणार आहे म्हणजे हा जो फंड आहे तो ग्रांडच्या स्वरूपात मिळतो म्हणजेच आपल्याला रिटर्न करण्याची आवश्यकता नाहीये हे लोन नाहीय ही जी योजना आहे विशेषत कृषी क्षेत्रामध्ये तरुणांना सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजे स्वयं रोजगार साठी प्रोत्साहित करते.
9) प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना:
पुढची योजना आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जर तुम्ही मत्स्य व्यवसाय अक्वाकल्चर किंवा फिश प्रोसेसिंग इत्यादी मध्ये जर काम करू इच्छित असाल तर या योजनेमध्ये तुम्हाला 40 ते 60% पर्यंत सबसिडी मिळू शकते ही योजना समुद्री तसेच अंतर्गत मत्स्यपालन या दोन्ही क्षेत्रांना प्रोत्साहन देते आहे.
10) ग्रीकल्चर अँड प्रोसेस फूड प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी:
सर्वात महत्त्वाची योजना ग्रीकल्चर अँड प्रोसेस फूड प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणजे जे एक्सपोर्ट प्रमोशन कान्सिल आहे आपेडा तर यांच्यामार्फत राबवली जाणारी ही योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून कृषी आणि जे काही प्रोसेस फूड आहे तर ते एक्सपोर्ट करण्यासाठी जे काही तुम्ही युनिट उभा करणार आहात किंवा तुमचा शेतीशी संबंधित जो काही बिजनेस आहे प्रोसेसिंग युनिट आहे किंवा शेतमाल आहे तर तो एक्सपोर्ट ओरिएंटेड जर असेल तर त्यासाठी आर्थिक मदत करण्यासाठी ही अपेडा मार्फत राबवली जाणारी स्कीम आहे.
म्हणजे बघा जर तुम्ही तुमचा कृषी उत्पादनाचा एक्सपोर्ट करण्याचा जर बिजनेस सुरु करू इच्छित असाल तर अपेडा तुम्हाला सर्टिफिकेशन, ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि एक्सपोर्ट ट्रेनिंग म्हणजे या सर्वांमध्ये तुम्हाला मदत करते.