अर्थसंकल्प 2026 : काय स्वस्त, काय महाग? जाणून घ्या सविस्तर माहिती..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी एक फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर केला आपल्या भाषणात सीतारामन यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मोदी सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून सीतारामन यांचा नववा अर्थसंकल्प होता. या बजेटचा आकार 53 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. सीतारामन यांनी संसदेत एकूण 85 मिनिट भाषण केलं.

भाषणामध्ये त्यांनी सामान्य माणसांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. सोबतच सरकारनं डायरेक्ट टॅक्स कस्टम आणि सेंट्रल एक्झाशी संबंधित अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. यावर्षी तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि केरळ यांसारख्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळं त्या राज्यांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची घोषणा होणार का? याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं.

सीतारामन यांच्या या बजेटला शेअर बाजाराकडून मात्र निगेटिव्ह रिस्पॉन्स मिळालाय. सीतारामण यांच भाषण सुरू असतानाच शेअर बाजारात प्रचंड मोठी घसरण झाली आहे. देशाच्या या अर्थसंकल्पात कोणकोणत्या गोष्टीची घोषणा करण्यात आली आहे. अर्थसंकल्पानंतर काय स्वस्थ आणि काय महाग झालय? या अर्थसंकल्पानंतर शेअर मार्केट एवढं का कोसळलं समजून घेऊयात या माहिती मधून…

अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या?

सगळ्यात आधी अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या ते पाहूयात. यावर्षीच्या अर्थसंकल्पाची मोठी गोष्ट म्हणजे गेल्या वर्षीप्रमाणे यावेळी इन्कम टॅक्सच्या स्लॅब मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये. पण यंदा रिवाईज रिटर्न फाईल करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी वाढवण्यात आलाय. याचा अर्थ आता तुम्ही 31 डिसेंबर ऐवजी 31 मार्च पर्यंत रिवाईज रिटर्न फाईल करू शकता. सरकारन 1 एप्रिल 2026 पासून न्यू इन्कम टॅक्स ऍक्ट लागू करण्याची घोषणा केली याबाबतची अधिसूचना लवकरच जारी केली जाईल. या ऍक्टममुळे इन्कम टॅक्स भरणं सोपं होणार आहे. सरकारन जुलै 2024 मध्ये न्यू इन्कम टॅक्स ऍक्ट आणला होता.

सरकारन देशभरात सात नव्या हाय स्पीड रेल कॉरिडोरची घोषणा केली:

अर्थसंकल्पातली दुसरी मोठी घोषणा म्हणजे सरकारन देशभरात सात नव्या हाय स्पीड रेल कॉरिडोरची घोषणा केली. हे रेल कॉरिडोर आहेत मुंबई टू पुणे, पुणे टू हैदराबाद, हैदराबाद टू बेंगलोर, हैदराबाद टू चेन्नई, चेन्नई टू बेंगलोर,दिल्ली टू वाराणसी आणि वाराणसी टू सिलिगुडी सरकारनं पुढच्या पाच वर्षात 20 नवे राष्ट्रीय जलमार्ग बांधण्याची घोषणा केली आहे. तसेच वाराणसी आणि पटना इथं जहाज दुरुस्ती केंद्र डेव्हलप केले जातील. याशिवाय देशातल्या 20 प्रमुख पर्यटन स्थळांवर 10,000 गाईड्सना ट्रेनिंग देण्याची घोषणा सरकारने केली.

सरकारन कॅन्सरच्या औषधांवरची कस्टम डुटी रद्द केली:

अर्थसंकल्पातली तिसरी मोठी घोषणा म्हणजे सरकारन कॅन्सरच्या औषधांवरची कस्टम डुटी रद्द केली आहे. त्यामुळे आता कॅन्सर सारख्या रोगावरचे उपचार स्वस्थ होणार आहेत. सरकारन कॅन्सर सोबतच हिमोफिलिया सिकल सेल आणि मस्कुलर डिस्ट्रोफी यांसारख्या सात दुर्मीळ आजारांच्या 17 औषधांवरची बेसिक कस्टम डुटी रद्द केली ही औषध ऍडव्हान्स कॅन्सर साठी इम्पोर्ट केली जातात.

पण आता कस्टम ड्युटी रद्द केल्यानंतर ही औषध स्वस्थ होणार आहेत. याशिवाय सरकारन भारताला जागतिक बायोफार्मासटिकल प्रोडक्शन हब बनवण्याची तयारी सुरू केली आहे यासाठी दहा हजार कोटी रुपयांची इन्हेस्टमेंट केली जाईल. याशिवाय तीन नवीन आयुर्वेदिक एम्स स्थापन करण्याची घोषणाही सरकारने केली.

अर्थसंकल्पातली चौथी मोठी घोषणा मुली आणि महिलांसाठी करण्यात आले;

अर्थसंकल्पातली चौथी मोठी घोषणा ही मुली आणि महिलांसाठी करण्यात आले. अर्थसंकल्पात प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी हॉस्टेल बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे. देशात एकूण 789 जिल्हे आहेत. या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मुलींसाठी किमान एक हॉस्टेल बांधल जाईल. याशिवाय बचत गटातील महिला उद्योजकांसाठी शी मार्ट उभे केले जातील. या दुकानांमध्ये बचत गटातील महिलांनी बनवलेले पदार्थ, हस्तकलेच्या वस्तू, कपडे, स्थानिक प्रॉडक्ट्स थेट विकले जातील. यामुळं मध्यस्थींची भूमिका कमी होईल आणि महिलांना यातून जास्त फायदा मिळेल.

अर्थसंकल्पातली पाचवी मोठी घोषणा ही डिफेन्स सेक्टर मधली आहे;

अर्थसंकल्पातली पाचवी मोठी घोषणा ही डिफेन्स सेक्टर मधली आहे. मागच्या वर्षी झालेल्या भारत पाकिस्तान संघर्षानंतर आता सरकारन देशाच्या डिफेन्स बजेटमध्ये जवळपास 16 टक्क्यांनी वाढ केली आहे. या अर्थसंकल्पात डिफेन्स सेक्टर मधल्या खर्चासाठी एकूण 784,678 कोटी रुपये वेगळे काढून ठेवण्यात आलेत. गेल्या वर्षी ही रक्कम 681210 कोटी एवढी होती. यामध्ये पेन्शन साठी एक लाख 7138 कोटी रुपये विमान आणि एरो इंजिन साठी 63733 कोटी रुपये आणि नौदलासाठी 25023 कोटी रुपये राखून ठेवण्यात आलेत.

अर्थसंकल्पानंतर देशात कोणत्या गोष्टी महाग आणि कोणत्या गोष्टी स्वस्थ झाल्या ते पाहूयात…

निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या भाषणात सांगितले की भारतात ज्या वस्तूंच प्रोडक्शन होतय त्या वस्तूंवरची कस्टम ड्युटी कमी करण्यात आली त्यात त्यांनी काही वस्तूंचा उल्लेख केला जसं की लेदर आणि टेक्स्टाईल यांची निर्यात आता ड्युटी फ्री होईल यावर्षी कस्टम डुटी कमी केली जाते शिवाय डिफेन्स सेक्टरमध्ये बेसिक कस्टम ड्युटी मध्ये सूट देण्यात आली तसच पर्सनल वापरासाठी ज्या वस्तू आयात केल्या जातात त्या वस्तूंवरच टॅरी 20 टक्क्यावरून कमी करून 10 टक्क्यांवर आणण्याची घोषणाही सीतारामण यांनी केले

आता यामुळे कोणकोणत्या वस्तू वस्त स्वस्थ होणार यामुळे कपडे, लेदर, सिंथेटिक फुटवेअर, चांबड्याच्या वस्तू, कॅन्सर आणि शुगर फ्री औषध लिथियम आयन सेल मोबाईल बॅटरी सोलर ग्लास मिक्स गॅस सीएनजी ईव्ही मायक्रोवेव्ह ओव्न विमानाचा फ्यूल आणि परदेशाचा प्रवास स्वस्थ होणार आहे मोबाईल बॅटरी सारख्या वस्तू स्वस्थ होत असल्यामुळे मोबाईलच्या किमतीही कमी होऊ शकतात याशिवाय सरकारन विदेशातल्या शिक्षणाच्या खर्चाबाबत एक मोठी घोषणा केली आहे सरकारन टीसीएस इंटरेस्टवर पाच टक्क्यांवरून कमी करून दोन टक्क्यापर्यंत आणलाय याशिवाय खेळाशी संबंधित वस्तूही स्वस्थ होणार आहेत.

कारण सरकारन या वस्तूंवरची कस्टम ड्युटी ही कमी केली आहे. यासोबतच अशाही काही वस्तू आहेत ज्यांची किंमत वाढण्याची शक्यता आहे. सरकारनं या सेक्टरच्या कस्टम ड्युटीमध्ये वाढ केली आहे. यात दारू, भंगार आणि खनिजांचा समावेश आहे.

शेअर मार्केटमध्ये मोठी खळबळ झाली;

आता एकीकडे निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करत होत्या तर दुसरीकडे शेअर मार्केटमध्ये मोठी खळबळ झाली. अर्थमंत्र्यांचे भाषण संपेपर्यंत शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. एकावेळी तर सेनसेक्स तब्बल 2000 अंकांनी घसरला होता. आता असं का झालं ते पाहूयात. तज्ञांच्या म्हणण्यानुसार शेअर बाजारात फ्युचर ट्रेडिंग सिक्युरिटी ट्रानजॅक्शन टॅक्स म्हणजेच एसटीटी वाढवण्याचा सरकारच्या घोषणेमुळे बाजारात घसरण झाल्याची शक्यता आहे. खरं तर रविवारी शेअर बाजार ओपन असतो. मात्र अर्थसंकल्पामुळे बाजार खुला होता. पण याच दिवशी बाजारात मोठी घसरण झाली.

सीतारामणयांनी अर्थसंकल्पात घोषणा केली की त्या फ्युचर्स अँड ऑप्शन वरील एसटीटी 0.02%वरून 0.05% 05 टक्क्यापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव देत आहेत. त्यांच्या त्या घोषणेनंतर शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात सेलिंग पाहायला मिळाली खरं तर जेव्हा तुम्ही शेअर बाजारात शेअर्स इक्विटी म्युच्युअल फंड किंवा डेरिव्टिव्ह यांची खरेदी किंवा विक्री करता तेव्हा सरकार एसटी नावाचा टॅक्स आकारत जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करता तेव्हा तुम्हाला स्वतंत्रपणे एसटीटी भरावा लागत नाही.

हा टॅक्स ब्रोकरच कापून सरकारला देतो. मात्र आता हा टॅक्स वाढल्यामुळे इथून पुढे ट्रेडिंग करणं थोडसं महाग होणार आहे. त्यामुळे ही घोषणा झाल्यानंतर शेअर मार्केट क्रॅक झालं. एकूणच काय तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात अनेक प्रमुख योजनांची घोषणा केली. त्यांनी रेअर अर्थ मिनरल्स कॉरिडोर बद्दल सांगितलं.

हाय स्पीड रेल कॉरिडोरची घोषणा केली. डिफेन्स सेक्टरवरचा खर्च वाढवला. पण मध्यम वर्गीयांसाठी हा अर्थसंकल्प निराशाजनकच होता. कारण गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी इन्कम टॅक्स स्लॅब मध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही त्यामुळे आता मध्यम वर्गीयांना टॅक्स मधून सूट मिळवण्यासाठी पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पाची वाट पाहावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *