9 व्या मजल्यावरून एकत्र उडी मारून तीन बहिणींनी स्वतःला संपवलं! कारण?

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

दरवाजा अर्धवट तुटलेला फरशीवर घरातल्या लोकांचे फोटो चिटकवलेले होते पिंतीवर राधाकृष्णच चित्र होतं काही ठिकाणी पेन्सिलने स्केचेस काढले होते पण स्केचेस पेन्सिलनेच खोडण्याचा प्रयत्न झाला होता समोरच एक डायरी होती ज्यात मजकूर होता आय एम रिली सॉरी सॉरी बाबा तिथल्याच एका भिंतीवर लिहिलं होतं मेक मी अ हार्ट ऑफ ब्रोकन इथे सापडलेल्या डायरीतल्या आणखीन एका पानावर लिहिलं होतं वी लव कोरियन कल्चर हे चित्र होतं गाजियाबाद मधल्या एका फ्लॅट मधलं या फ्लॅट मध्ये राहणाऱ्या चेतन कुमारन बुधवारी मध्यरात्री पोलिसांना फोन केला होता आणि आपल्या तीन मुलींनी नवव्या मजल्यावरच्या बाल्कणी मधून खाली उडी मारल्याच सांगितलं होतं.

तीन बहिणींनी एकत्रच स्वतःला संपवल्यामुळे खळबळ माजली वडील चेतनन आधी हा सगळा प्रकार कोरियन गेममुळे घडल्याचा दावा केला पण तपासात समोर आलं एक भीषण सत्य कोरियन कल्चरचा नाद सोडायला सांगितल्यामुळे टोकाच पाऊल उचलणाऱ्या बहिणींच सत्य गाजेबाद मध्ये नेमकं काय घडलं वडिलांनी कुठला अंगल सांगितला आणि पोलीस तपासात काय समोर आलं सगळी स्टोरी जाणून घेयुया…

अपघात कुठे घडला?

गाजियाबादच्या भारत सिटीच्या बीवन टॉवर मधला फ्लॅट नंबर 907 त्यामध्ये चेतन कुमारच कुटुंब राहतं चेतनची दोन लग्न झाली पहिल्या बायकोला सुरुवातीला मूल होत नव्हतं म्हणून त्यान बायकोच्या सख्या लहान बहिणीशी लग्न केलं त्यानंतर त्याला दुसऱ्या बायकोपासून तीन आणि पहिल्या बायकोपासून दोन मुलं झाली चेतनला एकूण चार मुली आणि एक मुलगा होता दोन्ही बायका आणि पाचही ही मुलांसोबत तो एकाच फ्लॅटमध्ये राहत होता.

या कुटुंबाची आर्थिक स्थिती फार चांगली नव्हती. घरातल्या एका खोलीत चेतन आपल्या पत्नीसोबत राहायचा एका खोलीत दुसऱ्या पत्नीला आणि एक खोली तीन मुलींना दिली होती. निशिका, प्राची आणि पाखी या तीन बहिणी एकाच खोलीत कायम एकत्र असायच्या सोबतच झोपायच्या त्या तिघींपैकी दोन मुली चेतनच्या दुसऱ्या बायकोपासून झालेल्या तर एक पहिल्या बायकोपासून निशिका 16, प्राची 14 आणि पाखी 12 वर्षांची होती.

विशेष म्हणजे कोविड आणि लॉकडाऊन पासून या तिन्ही मुली शाळेत गेल्याच नव्हत्या त्या घरीच असायच्या पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या तिघी अभ्यासात स्लो होत्या म्हणून त्यांना लॉकडाऊन नंतर घरच्यांनी शाळेत पाठवलंच नव्हतं बुधवारी चार तारखेच्या मध्यरात्री दोन वाजता भारत सिटी सोसायटीच्या लोकांना सोसायटी मधल्या रस्त्यावर काहीतरी पडल्याचा मोठा आवाज झाला.

लोकांनी तातडीने खाली धाव घेतली तर त्यांना तीन मुली जमिनीवर पडलेल्या दिसल्या. त्यात सोसायटी मधल्या एका व्यक्तीने चेतन कुमारच्या फ्लॅटच्या बालकणी मधून तीन मुलींना खाली उडी मारताना पाहिलं होतं त्यामुळे तातळीने चेतन कुमारला याची माहिती देण्यात आली. त्यान स्वतः आणि बिल्डिंग मधल्या लोकांनी पोलिसांना सुद्धा फोन केला. चेतनन मुली ज्या रूममध्ये राहतात त्या रूमचा दरवाजा तोडला आणि तो आतमध्ये गेला तेव्हा त्या तिघीच्या बेडवर झोपायच्या तो बेड अस्ताव्यस्त होता.

कपाट मधल सामान सुद्धा पसरलेलं होतं बेडरूमला लागूनच असलेल्या बाल्कनीमध्ये एक स्टूल ठेवला होता या स्टूल वरूनच तिघींनी खाली उडी मारली होती.

पोलिसांनी चौकशी सुरु केली असता?

या सगळ्या घटनेची माहिती मिळाल्यावर लगेचच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या मुलींना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण नवव्या मजल्यावरून उडी मारल्याने तिघांचाही जागेच मृत्यू झाला होता. पोलिसांनी तीनही मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवले पण पोलिसांनी या तिन्ही मुलींचे वडील चेतन कुमारची चौकशी केली सोबतच घराची आणि या तिन्ही मुलींच्या खोलींची झडती सुद्धा घेतली तेव्हा त्यांना अनेक विचित्र गोष्टी दिसून आल्या या मुलींनी जमिनीवरच आपल्या कुटुंबातल्या सदस्यांचे फोटो चिटकवले होते तर भिंतीवर एका बाजूला राधाकृष्णाचे चित्र होतं तर इतर ठिकाणी काही स्केचेस काढण्यात आले होते.

पण स्केचेस खोडण्याचा प्रयत्न झाला होता त्या स्केचेसवर पेन्सिलन क्रॉस मार्क करण्यात आले पोलिसांना गंभीर वाटलेली आणखीन एक गोष्ट होती या रूम मधल्या भिंतींवर ठीक ठिकाणी लिहिलेली वाक्य आयम व्हेरी व्री अलोन माय लाईफ वेरी अलोन असं एका ठिकाणी लिहिण्यात आलं होतं तर एका ठिकाणी मेक मी अ हार्ट ऑफ ब्रोकन असं लिहिलं होतं त्यामुळे या मुली एकट्या का होत्या आणि त्यांनी हे सगळं एकटेपणामुळे केलं का असा प्रश्न उपस्थित झाला.

पोलिसांनी चेतन कुमार कडे चौकशी केली तेव्हा?

त्यामुळे याबद्दल पोलिसांनी चेतन कुमार कडे चौकशी केली तेव्हा त्यान आपल्या तिन्ही मुलींबद्दल काही धक्कादायक दावे केले चेतन कुमारच म्हणणं होतं की माझ्या मुलींना एका गेमचा नाद लागला होता ही कोरियन गेम होती या गेमच्या नादात त्यांनी स्वतःला कोंडून घेतलं होतं त्या त्यांच्या खोलीमधून बाहेर सुद्धा यायच्या नाहीत त्यांनी शाळेत जाणं सोडून दिलं होतं मधल्या मुलींच दोन्ही मुली ऐकायच्या ती सांगेल तसंच वागायच्या आम्ही कधी त्यांच्या खोलीत गेलो तर त्या दुसरीकडे निघून जायच्या फक्त जेवायलाच खोलीतून बाहेर यायच्या आंघोळीला सुद्धा एकत्र जायच्या की सगळं एका गेममुळे झालं होतं मुलीच्या वडिलांनीच गेमचा उल्लेख केल्याने या गोष्टीची चर्चा झाली पण तपास अधिकाऱ्यांनी माध्यमा ना दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंतच्या तपासामध्ये सुद्धा गेम बद्दलची कोणतीही माहिती समोर आली नाही.

या मुलींच्या फोनमध्ये सुद्धा गेम सापडलेला नाहीये. त्या तिन्ही बहिणींना कोरियन कल्चरची प्रचंड आवड होती. त्यांना कोरियन खान, म्युझिक बँड्स, सिरीज, गाणी, पिक्चर या सगळ्या गोष्टी प्रचंड आवडायच्या या गोष्टीची माहिती त्याच्या कुटुंबीयांना सुद्धा होती. मोबाईलमुळेच तुम्हाला ही सवय लागली आहे. कोरियन कल्चरचा नाद सोडून द्या असं म्हणत त्या मुलीच्या वडिलांनी त्यांचे फोन काढून घेतले होते. त्यांना बराच ओरडा सुद्धा बसला होता. मागचे काही दिवस मोबाईल नसल्याने त्या अस्वस्थ झाल्या असाव्यात आणि त्यातूनच त्यांनी टोकाच पाऊल उचलल असावं असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या तिघींच्याही मोबाईलची तपासणी सुरू असून त्यातून काय डेटा मिळतो कुठल्या गेम बद्दल माहिती मिळते का आणखीन काही वेगळं सापडतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

या मुलींच्या रूम मध्ये एक डायरी सुद्धा सापडली ज्यावर लिहिण्यात आलय ट्रू लाईफ स्टोरी इस डायरी मे जो कुछ भी लिखा आहे वो सब पढलो क्युकी ये सब सच आहे रीड नाव आय एम रिली सॉरी, सॉरी पप्पा सोबतच एक रडण्याचा इमोजी सुद्धा काढण्यात आलंय याच डायरीत वि लव्ह कोरियन कल्चर असही लिहिण्याच सांगण्यात येतय त्यामुळं आता या डायरीतून काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल सोबतच जर गेमचा काही संबंध नव्हता तर चेतन कुमारनं असं स्टेटमेंट का दिलं याचीही चौकशी होण्याची शक्यता पण सध्या भारत सिटी टॉवर मधल्या लोकांच्या कानात घुमतोय तो लागोपाठ तीनदा झालेला मोठा आवाज आणि डोळ्यासमोर फिरतायत तीन बहिणी कोरियन कल्चरचा आणि मोबाईल पासून लांब राहिल्याने टोकाच पाऊल उचलणाऱ्या तीन बहिणी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *