दहा दिवसांपूर्वीची गोष्ट आहे जानेवारीचा महिना सोन आणि चांदीचे भाव ऑल टाईम हाय होते चांदीन इतिहासात पहिल्यांदाच चार लाख रुपयांचा टप्पा क्रॉस केला तर सोनं सुद्धा एक लाख 80 हजार रुपयापर्यंत गेलं आता इथून सोन आणि चांदीचे भाव आणखी किती वाढणार याकडे सर्वांच लक्ष होतं पण अचानक मार्केट क्रॅश झालं जानेवारीच्या शेवटी या दोन्ही धातूंचे भाव ऑल टाईम हाय होते ते पुढच्याच आठवड्यात प्रचंड वेगाने कोसळले त्यानंतर काही काळ भाव स्थिर राहिले पण आता भाव पुन्हा वाढत असल्याच दिसतय.
सोन आणि चांदी मधला हा चड उतार गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे चर्चेचा विषय ठरलाय. त्यातच प्रसिद्ध इन्वेस्टर रॉबर्ट कसाकी यांनी सोन आणि चांदी खरेदी करणं थांबवल्याचं म्हटलं यामुळे गोंधळ आणखी वाढला. आता सोन आणि चांदीचे भाव आणखी खाली येणार की ते पुन्हा एकदा वाढणार हा मोठा प्रश्न आहे नेमकं काय घडतय सोना आणि चांदीचे भाव अचानक का कोसळले आता क्यूओसाकी यांनी या धातूंची खरेदी का थांबवली याआधी त्यांनी काय दावे केले होते पाहूयात…
सोनं आणि चांदीच्या मार्केटमध्ये काय घडतय?
सगळ्यात आधी सध्या सोनं आणि चांदीच्या मार्केटमध्ये काय घडतय ते बघू. शुक्रवारी 6 फेब्रुवारीला एमसीएक्स वर चांदीच्या किमतींमध्ये मोठा भूकंप आला. चांदीचे रेट सहा टक्क्यांनी घसरून 2ला29 हज रुपये प्रति किलो एवढे झाले तर सोन्याचे भाव सुद्धा प्रति तोळा एक लाख50 हज रुपयांच्या खाली आले. आकडेवारी पाहिली तर फक्त एका आठवड्यात चांदीच्या भावांमध्ये जवळपास 30 हज रुपयांची घसरण झाली तर मागच्या महिन्यात ऑल टाईम हाय रेट गाठल्यानंतर चांदीच्या दरांमध्ये एक लाख80 हज रुपये म्हणजे जवळपास 44% घसरण पाहायला मिळाली.
सोन्याचा विचार करायचा झाला तर शुक्रवार पर्यंत सोनं ऑल टाईम हाय रेट वरून 18% म्हणजे जवळपास 33000 रुपये स्वस्थ झालं होतं सोनं आणि चांदीमध्ये मागच्या आठवडाभर ही घसरण सुरूच होती. शनिवारी या दोन धातूंचे भाव काही प्रमाणात वाढले शनिवारी 7 फेब्रुवारीला एमसीएक्स वर एक किलो चांदीचे रेट 20 हजारांनी वाढून दो लाख 50 हजार रुपयांच्या आसपास केले तर सोन्याचे भाव प्रति तोळा अडीच तेती हज रुपयांनी वाढले पण तरी सुद्धा एकेकाळी च लाख पर्यंत गेलेली चांदी आता अडीच लाखांवर आली आहे तर दोन लाखांच्या आसपास गेलेल सोन सुद्धा दीड लाखांवर घसरलय.
हे दर आणखी कमी होणार की पुन्हा वाढणार?
आता इथून पुढे काय होणार हे दर आणखी कमी होणार की पुन्हा वाढणार हा प्रश्न आहे ते पाहण्याआधी सोन आणि चांदीचे भाव ऑल टाईम हाय वरून अचानक एवढे खाली कसे घसरले ते पाहू. सोना आणि चांदीचे भाव अचानक खाली येण्यासाठी कारणीभूत आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केलेली एक नेमणूक ट्रंप जानेवारी 2017 मध्ये पहिल्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष बनले होते.
पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांनी जेरोम पॉवेल यांची अमेरिकेच्या फेडरल रिझर्वहचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. ट्रंप यांनी भूमिका व्याज दर कमी करण्याची राहिली आहे मात्र पॉवेल यांनी ट्रंप यांच्या म्हणण्याप्रमाणे व्याज दर कमी जास्त केले नाहीत. यामुळे या दोघांमध्ये लवकरच संबंध खराब झाले हे संबंध एवढे बिघडले की ट्रंप यांनी पॉवेल यांना पदावरून हटवण्याचे प्रयत्न सुरू केले पण ट्रंप काही यशस्वी झाले नाहीत पुढे 2021 ट्रंप यांचा अध्यक्षपद गेलं आणि जो बायडन अमेरिकेचे अध्यक्ष झाले त्यांनी पॉवेल यांचा कार्यकाळ वाढवला पण गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात ट्रंप पुन्हा एकदा अमेरिकेचे अध्यक्ष बनले आणि त्यांनी पॉवेल यांच्या विरुद्ध मोहीम सुरू केली आता मे 2026 मध्ये पॉवेल यांचा कार्यकाळ संपतोय ज्यानंतर त्यांना मुदतवाढ मिळालेली त्यांच्या जागी ट्रंप यांनी 30 जानेवारीला फेडरल रिझर्वच्या अध्यक्षपदी केविन वॉर्श यांची नियुक्ती केली आणि हीच नियुक्ती गेम चेंजर ठरली.
वॉरश यांच्या नियुक्तीनंतर जगभरात सोनं आणि चांदीचे रेट ऑल टाईम हाय वरून अचानक खाली आले या घटनेला आता वॉर शॉक असं म्हटलं जातय. पण असं नेमकं घडलं काय वॉर्श यांच्या नियुक्तीनंतर सोन आणि चांदीचे भाव अचानक खाली कसे आले तर वॉर्श यांच्या नियुक्ती आधी इन्हेस्टर सोन आणि चांदीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत होते कारण इन्वेस्टर्सना वाटत होतं की ट्रंप फेडरल रिझर्वहच्या अध्यक्षपदी असा माणूस आणतील ज्याची भूमिका व्याज दर कमी करण्याची असेल असं केलं तर डॉलरची व्हॅल्यू आणखी कमी होईल आणि सोन चांदीला आणखी महत्त्व मिळेल असं इन्वेस्टर्सना वाटत होतं आणि त्यामुळेच ते मोठ्या प्रमाणात या धातूंची खरेदी करत होते पण ट्रंप यांनी नेम याच्या उलट केलं त्यांनी फेडरल रिझर्व्च्या अध्यक्षपदी केविन वॉर्श यांची नियुक्ती केली ज्यांची भूमिका व्याज दर स्थिर ठेवण्याची राहिली आहे त्यांच्या नियुक्तीनंतर इन्वेस्टर्सना विश्वास मिळाला की डॉलरची व्हॅल्यू कमी होणार नाही यामुळे इन्वेस्टर्सन पटापट सोन आणि चांदी मधून आपले पैसे काढायला सुरुवात केली.
धातूंचे भाव एवढे कोसळले आता पुढे काय होणार?
ज्यामुळे जगभरात अचानक या धातूंचे भाव एवढे कोसळले आता पुढे काय होणार सोन आणि चांदीचे भाव कमी होणार की वाढणार याबाबत प्रसिद्ध इन्वेस्टर्स रॉबर्ट कियोसाकी यांनी अलीकडे सांगितलं की ते सध्या सध्या कोणतीही नवी गुंतवणूक करत नाहीयेत कियोसाकी यांनी सांगितलय की चांदीचे भाव जेव्हा 60 डॉलर आणि सोन्याचे भाव 300 डॉलर च्या आसपास होते तेव्हा त्यांनी इन्हेस्टमेंट थांबवली कियोसाकी यांच्या म्हणण्यानुसार नफा खरेदी करताना मिळत असतो विक्री करताना नाही जर योग्य किमतीत खरेदी केली तर फायदा होत असतो असं त्यांचं म्हणण आहे त्यामुळे ते सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत आणि योग्य संधीची वाट पाहत आहेत.
आता ही योग्य संधी केव्हा येणार तर कियोसाकी यांच्या म्हणण्यानुसार चांदीचा रेट जेव्हा 74 डॉ डॉलर आणि सोन्याचा रेट 4000 डॉलर पर्यंत जाईल तेव्हा ते पुन्हा खरेदी करू शकतात. या सगळ्यावरून काय लक्षात येतं तर सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये अशाच प्रकारचा चड उतार पाहायला मिळू शकतो. येणाऱ्या काळात चांदीच्या किंमती अस्थिर राहू शकतात असं युबीएस च्या रिपोर्टमध्ये म्हटल आहे. काही तज्ञांच्या मते पुढच्या वर्षी मार्च पर्यंत चांदीचा भाव प्रति अंश 134 डॉलर पर्यंत पोहोचू शकतो.
भारतीय रुपयांमध्ये ही व्हॅल्यू 4 लाखवी हजार रुपये प्रति किलो एवढी आहे. याचा अर्थ लॉंग टर्म चांदीचे भाव वाढणार असल्याचे अंदाज आहे. ते पुन्हा एकदा गेल्या महिन्यातल्या ऑल टाईम हाय लेव्ल पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. मात्र या दरम्यान मोठ्या प्रमाणात चड उतार पाहायला मिळू शकतात. तज्ञांच म्हणणं आहे की ज्या इन्वेस्टर्सना लगेच पैशांची आवश्यकता नाही ते एक वर्षापर्यंत वाट पाहू शकतात.
पण ज्यांना जास्त काळ वाट पाहायची नाही ते अधूनमधून चांदीत जी तेजी येत आहे त्याचा फायदा घेऊन सेलिंग करू शकतात. एकूणच काय तर जागतिक बाजारात घडलेल्या घडामोडींचे परिणाम भारतातल्या सोनं आणि चांदीच्या किंमतीवरती होतायत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या एका नियुक्तीमुळे ऑल टाईम हाय लेव्लला असलेले हे दोन्ही धातू अचानक खाली कोसळले आता इथून पुढे किमतीमध्ये चड उतार होणार असल्याचीच अपेक्षा आहे.

