गंभीर आजारांसाठी खर्च मोठा; या नंबरला बिनधास्त द्या मिसकॉल

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

गंभीर आजारांसाठी खर्च मोठा; या नंबरला बिनधास्त द्या मिसकॉल

मुख्यमंत्री साहाय्यता निधी: सहज, सोपे अन् कमी वेळात निधी मिळणार

           मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक मदत दिली जाते. अर्ज भरण्यासाठी अनेकदा विविध अडचणी येतात. आमीण भागात अनेक समस्यांचा सामना अर्जदारांना करावा लागतो. राज्य सरकारने ही गंभीर बाब लक्षात घेत, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ८६५०७६७७६७ हा मोबाइल क्रमांक देऊन केवळ मिसकॉलचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री साहाय्यता निधीकरिता वेळकाढू प्रक्रियेतून आता सहज, सोप्या आणि कमी वेळात निधी मिळेल. लाभार्थीना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

        ग्रामीण भागातील गरजूंना निधीसाठी मंत्रालयाचे दरवाजे झिजवावे लागतात. अनेकदा अर्ज भरताना चुका झाल्यास नव्याने प्रक्रिया करावी लागते. उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची होणारी परवड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्षात घेऊन लाभार्थीना बेट मिसकॉलवर अर्ज करण्याची प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे.

         अर्जदाराने ८६५०५६०५०६७ मिसकॉल केल्यानंतर अर्जाची लिंक एसएमएसद्वारे प्राप्त होईल. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर डाऊनलोड होणाऱ्या अर्जाची प्रिंट काढून तो भरावा. रुग्णाच्या आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष किंवा स्कॅन करून pdf मध्ये cmrf@maharashtra.gov.in या ई-मेल आयडीवर अपलोड करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे.

या आजारासाठी सर्वाधिक अर्ज

      मुख्यमंत्री साहाय्यता निधींसाठी कर्करोगावरील उपचाराच्या मदतीसाठी सर्वाधिक अर्ज येतात, एकूण अर्जाच्या एकूण २५ टक्के अर्ज असून, त्या खालोखाल हृदयविकार, गुडधा प्रत्यारोपण, खुबा प्रत्यारोपण, अपघात, डायलिसिस, किडनी विकार उपचारांच्या मदतीसाठी अर्ज येत आहेत. भाजलेल्या तसेच शॉक लागलेल्या रुग्णांकडून देखील मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहाय्यता मिळवण्यासाठी अर्ज येत आहे.

आता फक्त मिस कॉल देण्याची आवश्यकता

      आता फक्त एका मिसकॉलवर तुम्हाला मुख्यमंत्री साहायता निधी मिळणार आहे. मागील एक वर्षात हजारी गरजूंना मदत दिली आहे. अशी माहिती श्री.मंगेश चिवटे, प्रमुख, मुख्यमंत्री साहाय्यता निधी, महाराष्ट्र यांनी दिली.

लवकरच ॲप तयार करण्यात येणार..!

     मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी येणारे बहुतांश अर्ज अपूर्ण स्वरुपात असतात. मदत करण्यास अडचणी येतात. सध्या मिसकॉलवर ही सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी लवकरच अर्जासाठी ॲप बनविले जाणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया अधिक गतिमान होईल आणि एकाच वेळी तिथे सर्व माहितीचे अर्ज स्वीकारले जातील, त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मदत कक्षाशी संपर्क साधावा लागणार नसल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *