लाडकी बहिण योजनेचे मिळणार १५०० ऐवजी २१०० रुपये…!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली, या योजनेतून पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळत आहे. या योजनेच्या अंतर्गत महिलांच्या बँक खात्यात आतापर्यंत पाच हप्त्यांचे पैसे जमा करण्यात आले आहेत. नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका असल्याने राज्य सरकारने ऑक्टोबर महिन्यातच नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे सुद्धा जमा केले, आता निवडणुका पार पडल्यावर सहाव्या आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न महिलांच्या मनात उपस्थित होत आहे.

महायुतीला सत्ता मिळाली आहे, लाडक्या बहिणीला २१०० रुपये कधीपासून मिळणार? बघा एकनाथ शिंदे यांची घोषणा.

महाराष्ट्राचा एकतर्फी निकाल लाडक्या बहिणींनी लावल्याचे बोलले जात आहे. मतदानाची वाढलेली टक्केवारी ही लाडक्या बहिणींची असल्याचे दावे केले जात आहेत. अशातच या लाडक्या बहिणी नव्या सरकारच्या पहिला हप्ता कधी येणार याकडे डोळे लावून बसल्या आहेत. हा हप्ता १५०० रुपये येणार की २१०० रुपये याबाबतही चर्चा होत आहे.

या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना राज्य शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत. निवडणुकीच्या जाहिरनाम्यात ही रक्कम वाढवून 2100 रुपये करण्याचे आश्वासन महायुतीने दिलं होतं. त्यामुळे आता सहाव्या हफ्त्याचे 2100 रुपये आपल्या बँक खात्यात जमा होण्याकडे सर्व पात्र महिलांच्या नजरा लागल्या आहेत.

आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे या योजनेचे एकूण पाच हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. सहाव्या हप्त्याचे पैसे म्हणजेच डिसेंबर महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पूर्ण झाले आणि महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. आता महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन होणार हे स्पष्ट आहे. सरकार स्थापन झाल्यावर आणि मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यावर पात्र महिलांच्या बैंक खात्यात सहाव्या हप्त्याचे पैसे जमा होतील अशीमाहिती समोर येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडी सरकारने लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देण्याचा शब्द दिला होता; मात्र ज्या महायुती सरकारने योजना आणली व एक जुलैपासून दरमहा पंधराशे रुपये त्याच सरकारवर लाडक्या बहिणीने विश्वास दाखवला. त्याचवेळी महायुती सरकारने आमचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचे वचन दिले. त्याला लाडक्या बहिणीने साथ दिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. राज्यातील 288 आमदारांमध्ये तब्बल 187 आमदारांना एक लाखाहून अधिक मते मिळाले आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निवडणुकीनंतरही राबविली जाणार का?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण पोजना ही अत्यंत महत्वाकांक्षी व क्रांतिकारी योजना आहे. ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. या आर्थिक वर्षात योजनेसाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याची आर्थिक स्थिती जसजशी मजबूत होत जाईल, तसे सद्यस्थितीत असणारी दरमहा १५०० रुपयांची रक्कम वाढवून २१०० रुपये करण्यात आलेली आहे. पुढे जाऊन टप्प्याटप्प्याने ही रक्कम तीन हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल, अशी ग्वाही यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी दिली होती. तसेच शिंदेनी सांगितले आहे की, ही योजना लाडक्या बहीणींसाठी कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात येईल.

लाडकी बहीण योजनेतील हे नवीन बदल:

लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा २१०० रुपये मिळणार आहेत, पण ही वाढ डिसेंबरपासून लागू होणार नाही. डिसेंबर महिन्यात लाभार्थ्यांना प्रत्येकी १५०० रुपये मिळतील.

महायुती सरकारने लाडकी बहिणी योजनेच्या निधीत वाढ करण्याचे जाहीर केले आहे, पण ही वाढ एप्रिल २०२५ पासून लागू होण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यापासून लाभार्थ्यांना दरमहा २१०० रुपये मिळणार आहेत.

  • अर्ज करण्याची मुदत 2 महिने करण्यात आली असून 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल.
  • या योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.
  • लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे.
  • परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.
  • 2.5 लाख रुपये उत्पन्न दाखला नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे.
  • पोस्ट बँक खाते असल्यास योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राह्य धरणार.
  • दुसऱ्या राज्यातील महिलेने महाराष्ट्रातल्या पुरूषा बरोबर लग्न केल्यास पतीच्या कागदपत्रावर तिला लाभ मिळेल.
  • गावात समिती मार्फत दर शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचली जाणार, त्यात बदलही केले जाणार.
  • केंद्राच्या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांनाही यापुढे लाभ मिळणार.
  • नवविवाहीत महिलेची नोंदणी शक्य नसेल, तर पतीचे रेशनिंग कार्ड ग्राह्य धरणार.
  • ओटीपीचा कालावधी दहा मिनिटांचा करण्यात येणार.

या नव्या नियम आणि अटींमुळे अर्ज करण्यात सुलभता येईल अशी आशा सरकारच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. लाडकी बहिण योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र अर्ज करताना अनेक अडचणी येत आहे. त्या येवू नये यासाठी सरकारचा प्रयत्न आहे.

नोंद:

  • या माहितीमध्ये कोणताही बदल होऊ शकतो.
  • अधिकृत वेबसाइटवर नेहमी तपासून पहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *