आला उन्हाळा तब्येत सांभाळा हा कानमंत्र आपल्याला आधीपासूनच दिला जातो बरोबर ना, पण बऱ्याच जणांना उन्हाळ्यात आपल्या तब्येतीची काळजी कशी घ्यायची हेच माहीत नसते, आणि मग सुरू होतात समस्या जसं की उन्हाळी लागणे,चक्कर येणे, घशाला कोरड पडणं, सतत घाम येणं इतकच नाही तर उन्हाळ्यात आपल्याला डीहायड्रेशन सारख्या समस्या उद्भवतात तर या गोष्टीपासून कसं वाचायचं आणि उन्हाळ्यात आपल्या तब्येतीची काळजी कशी घ्यायची याचबद्दल जाणून घेणार आहोत.
तर सगळ्यात पहिला म्हणजे सकाळी उठल्या उठल्या आपल्याला एक बदल करावा लागणार आहे, ते म्हणजे आपल्याला गरम पाण्याने अंघोळ करायची सवय झालेली असते तर उन्हाळ्यात शक्यतो गार पाण्याने किंवा कोमट पाण्याने अंघोळ केली पाहिजे. आणि त्यात एक अधिक फायद्यासाठी जर तुम्ही सँडल म्हणजेच चंदनाची पावडर जर पाण्यात मिक्स केली तर सर्वोत्तम कारण चंदनाची पावडर हे आपल्याला थंडवा देते खूप छान सुगंध येतो तो घामाच्या दुर्गंधी पासून आपला बचाव होतो आणि आपले त्वचा सुद्धा ऑइल फ्री राहते.
घराबाहेर पडताना पातळ सुती आणि जास्तीत जास्त लाईट कपडे वापर तुमच्या सोबत रुमाल ठेवा. डोळ्यांना चश्मा लावत जा आणि शक्यतो काम असेल तरच घराबाहेर पडा. मुख्य म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त द्रव पदार्थ खाणं या गोष्टीना जास्त प्राधान्य करा तुम्हाला नैसर्गिकरित्या गोड असणाऱ्या गोष्टी द्राक्ष किंवा संत्रेचा रस घ्यायचा आहे, त्यामुळे आपल्या शरीर थंड राहण्यास मदत होते. जास्तीत जास्त पानी प्या सगळेच सांगतात पण तुम्ही पाण्यात लिंबू, पिळा तुळस घाला, वाळा घाला किंवा पाण्यात घालून ते दिवसभर पाणी प्यायला तर आणखी फायदेशीर ठरू शकतात. म्हणजे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आता विटामिन ए साठी तुम्ही गाजर टोमॅटो खाऊ शकता लाल आणि नारंगी कलरच्या पदार्थांमध्ये विटामिन ए जास्त प्रमाणात असतात. विटामिन सी युक्त फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असतं तर तुम्हाला उष्णतेच्या दिवसात हायड्रेड आणि थंड ठेवण्यासाठी एक उत्तम पर्याय बनतात विटामिन सी मुळे तुमची इम्युनिटी सुद्धा मजबूत होते म्हणून तुम्ही लिंबूवर्गीय फळ खाणं आणि हिरव्या पालेभाज्या खान्याला जास्त प्राधान्य द्या बेसिक गोष्टी आहेत जर तुम्ही ह्या गोष्टीचे नियमित पालन करा आणि उन्हाळ्यात सुद्धा ताजे आणि निरोगी रहा स्वतःला जास्तीत जास्त हायड्रेट ठेवा आणि फिट रहा.
आपल्या त्वचेचे रक्षण करण्यासाठी येथे काही प्रभावी मार्ग आहेत:
स्वतःला हायड्रेटेड ठेवा:-
उन्हाळ्यात उशिरा फिरण्यामुळे जास्त घाम येतो. पुरेसे पाणी न पिल्यास शरीर निर्जलीकरण होते. पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन होऊ शकते. डिहायड्रेशन टाळण्यासाठी दिवसातून किमान 2-3 लिटर पाणी प्या. तुमच्या आहारात भरपूर फळे आणि भाज्यांचा समावेश करा.
सूर्यप्रकाश टाळण्याचा प्रयत्न करा:-
उन्हाळ्यात दिवसा उष्ण वाऱ्यामुळे अनेकदा लोकांना उष्माघाताचा त्रास होतो. तातडीचे काम नसेल तर घराबाहेर पडू नका. जर बाहेर जाणे अत्यंत आवश्यक असेल तर जुने कपडे आणि जाड कपडे घाला.
बाहेर जाणे टाळा:-
उष्णतेपासून बचाव करायचा असेल तर विनाकारण घराबाहेर पडू नका. कूलर, पंखा, एसीसह घरातच रहा. जर या गोष्टी घरी उपलब्ध नसतील तर जाड पडदे ठेवा, अशा प्रकारे तुम्ही उष्णता टाळू शकता.
सूर्यप्रकाशापासून संरक्षण:-
- सनस्क्रीन वापरा: बाहेर जाण्यापूर्वी किमान SPF 30, 15-30 मिनिटे आधी ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन लावा. दर 2 तासांनी किंवा पोहल्यानंतर किंवा घाम आल्यानंतर लगेच पुन्हा अर्ज करा.
- योग्य कपडे निवडा: तुमची त्वचा झाकणारे हलके, सैल कपडे घाला, जसे की लांब बाहींचा शर्ट, पँट आणि रुंद-काठी असलेली टोपी.
- ॲक्सेसरीज महत्त्वाचे: अतिनील संरक्षणासह सनग्लासेस घाला आणि तुमच्या ओठांचे संरक्षण करण्यासाठी SPF सह लिप बाम वापरा.
हीटस्ट्रोक:-
उन्हाळ्यातील आणखी एक प्रमुख समस्या म्हणजे हीटस्ट्रोक. हीटस्ट्रोकची समस्या आपल्याकडे तुलनेने कमी असली तरी तीव्र उष्णता असलेल्या भागात हे जास्त आढळून येते.मात्र आता तापमान आपल्या येथे 40 अंशाच्या वर जाऊ लागले आहे आणि म्हणून सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.उन्हाच्या संपर्कामुळे शरीरातील तापमान वाढल्यामुळे ही अवस्था उद्भवू शकते.
आहार कसा असावा:-
उन्हाळ्यात उपाशी राहणे आणि अतिरिक्त खाणे ह्या दोन्ही गोष्टी टाळाव्यात आणि विशेषत: रात्रीच्या जेवणात हलक्या आहाराचा समावेश असावा. तीव्र उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण घटते म्हणून दिवसातून 8-10 ग्लास पाणी पिणे अत्यंत गरजेचे असते.उन्हाळ्याचे संपूर्ण 4 महिने योग्य आहार घेणे हे उन्हाच्या त्रासापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. योग्य काळजी घेतल्यास उन्हाळा सुखकर होण्यास नक्कीच मदत होईल.
घरच्या जेवणाला प्राधान्य द्यावे:-
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्याला डीहायड्रेशन म्हणतात,जेव्हा शरीरातून द्रवपदार्थ जास्त प्रमाणात बाहेर पडतात तेव्हा ही स्थिती उद्भवते.ही स्थिती उन्हाळ्यात सामान्य असते कारण, आपल्या शरीरातून घामावाटे किंवा लघवीवाटे पाणी बाहेर जात असते आणि तेवढ्या प्रमाणात पाणी शरीरात गेले नाही तर तहान वाढते.
शहरी जीवनशैलीमध्ये समस्या वाढविणारा भाग म्हणजे वारंवार बाहेरचे व तेलकट,मसालेदार अन्न खाणे.धकाधकीच्या आणि गतिशील जीवनशैलीमध्ये घरातून डबा आणण्याचे प्रमाण देखील कमी होत चालले आहे.परिणामी रस्त्यावरील उघडे अन्न खाल्ल्यास पचनक्रियेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.प्रत्येकालाच चटकदार पदार्थ खायला आवडतात परंतु किमान उन्हाळ्यात तरी थोडी सावधगिरी बाळगावी.
महामारीच्या काळात लॉकडाऊनमध्ये आपण घरचेच अन्न खात होतो.हीच सवय पुढे सुरू ठेवायला काय हरकत आहे.ज्या व्यावसायिकांना मीटिंग्सना किंवा कुठल्या कामानिमित्त बाहेर पडावे लागते त्यांनी लांबचा प्रवास करताना मध्ये विश्रांती घेऊन पाणी पित राहावे,जेणे करून पाण्याचे प्रमाण कमी होणार नाही.
उन्हाळ्यात केसांची काळजी कशी घ्याल:
उन्हाळ्यात ऊन वाढत जाते तसेच त्याचा परिणाम शरीरावरही पडतो विशेषतः केसांची तर उन्हाळ्यात फार काळजी घेतली पाहिजे. माती आणि घामामुळे केसांमध्ये चिकटपणा येतो परिणामी केसात कोंडा आणि डोक्यावरील देखील त्वचा वृक्ष होते मात्र उन्हाळ्यातही केसांचं सौंदर्य कायम राखण्यासाठी या काही खास टिप्सचा अवलंब करून तुम्ही केसांची निगा राखू शकता.
केसांना धूळ माती आणि उन्हापासून वाचवून आठवड्यात कमीत कमी तीन वेळा केस धुणे गरजेचे आहे तुमचे केस तेलकट असतील तर प्रत्येक दुसऱ्या दिवशी केस धुतले तरी चालतील त्यांच्या मुळंाना लिंबाचा रस लावून वीस मिनिटांपर्यंत ठेवावे नंतर कोमट पाण्याने केस धुऊन टाकावे कोंडा काढण्याचा हा सर्वात चांगला पर्याय आहे. केसांवर सारखे कंगवा फिरवायला हवा केसांमधील धूळ आणि माती निघून जाईल केसांना हर्बल ऑइल ने मसाज केल्यास उत्तम. शॅम्पूचा जास्त वापर केल्यास केस कोरडे होतात म्हणून चांगल्या कंपनीच्या शाम्पूचा वापर करावा मेंदीत लिंबाचा रस आणि एक अंडे फेटून पॅक तयार करून केसांना लावावा त्यामुळे केसांची चमकदार वाढतेच आणि गर्मीत आरामही मिळतो केसांना जास्त गरम किंवा थंड पाण्याने धुवून नये तसेच धुतल्यानंतर कंडिशनर लावावा केसांची पोणी किंवा फ्रेंच नॉट केल्यास केस व्यवस्थित राहता आणि घामामुळे खराबरी होत नाही.