अकरावीच्या प्रवेशासाठी कशी कराल नोंदणी? जाणून घ्या सविस्तर..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

महाराष्ट्रातील सर्व इयत्ता अकरावीला ऑनलाईन प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.सन 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यात इयत्ता 11 वीचे प्रवेश हे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
यासाठी अधिकृत पोर्टल हे तयार करण्यात आले आहे. https://mahafyjcadmissions.in या पोर्टलवर विद्यार्थी स्वतः घरी बसून इयत्ता 11 वीचे ऑनलाईन प्रवेश अर्ज हे भरू शकणार आहे. विद्यार्थ्यांने हा 11वीचा ऑनलाईन प्रवेश अर्ज जर भरला नाही, तर त्या विद्यार्थ्याला इयत्ता 11 वीला प्रवेश मिळणार नाही. सो त्या विद्यार्थ्यांने इयत्ता 11 वीचा प्रवेश अर्ज कसा भरावा या संदर्भात आज आपण स्टेप बाय स्टेप महत्त्वाची माहिती पाहणार आहोत.
प्रथमतः विद्यार्थ्याने त्या ठिकाणी त्या पोर्टलवर नोंदणी कशी करावी नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्या ठिकाणी मिळालेला आयडी आणि पासवर्ड याचा वापर करून लॉगिन करून अर्ज कसा भरावा या स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी महत्त्वाची माहिती पाहूया,
आपण आपल्या मोबाईल अथवा लॅपटॉपवर गुगल वर https://mahafyjcadmissions.in ही वेबसाईट सर्च करायची आहे. त्यावर जाऊन देखील आपण आपला प्रवेश फॉर्म भरू शकता.
लिंक ओपन केल्यानंतर आपल्यासमोर स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट ही पहिलीच वेबसाईट दिसते यावर आपण क्लिक करणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर एक अधिकृत या ठिकाणी हे एक पोर्टल आपल्याला आलेल दिसेल. या डॅशबोर्डवर सुरुवातीला सूचना दिलेली आहे ही वाचून घ्यायची आहे लक्षात घ्या आपण जर 19 मे आणि 20 मे या दोन दिवशी हा फॉर्म भरला असेल तर हा प्रॅक्टिस सेशन म्हणूनच ग्राह्य धरला जाणार आहे, याचा अर्थ असा की आपण रेजिस्ट्रेशन करून पुन्हा लॉगिन करून जो फॉर्म भरणार आहेत हा 20 तारखेला रात्री 12 वाजता हा पूर्णतः या ठिकाणी काढून घेतला जाणार आहे. 21 तारखेच्या नंतर जो अर्ज केला जाईल तोच अर्ज ग्राह्य धरला जाईल.

अर्ज कसा करायचा ?

  • 11th admission process steps: असे असतील टप्पे –
  • https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.
  • त्यानंतर राहण्याचे ठिकाण (तालुका) निवडा.
  • संकेतस्थळाच्या दर्शनी पानावर ‘न्यू रजिस्ट्रेशन’ या पर्यायावर क्लिक करा.
  • उघडणाऱ्या पानावर नाव, मोबाइल नंबर, इमेल आयडी ही वैयक्तिक माहिती अचूक भरा.
  • इयत्ता दहावी परीक्षेचा बैठक क्रमांक, उत्तीर्ण होण्याचे वर्ष व शिक्षण मंडळ याची माहिती भरा.
  • आवश्यक प्रश्नांची उत्तरे देऊन सुरक्षित पासवर्ड तयार करून नोंदणी पूर्ण करा.
  • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मिळालेला लॉगइन आयडी आणि अर्ज क्रमांक जपून ठेवा.
  • Documents required for 11th admission: आवश्यक कागदपत्रे भरणे – पुढील टप्प्यात खालील आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील :
  • इयत्ता दहावीची गुणपत्रिका.
  • रहिवासी पुरावा.
  • जातीचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो.
  • आधार कार्ड आणि शाळा सोडल्याचा दाखला.

Admission after 10th: मराठवाड्यात प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार प्रवेश! अकरावी, ITI आणि पॉलिटेक्निकच्या किती जागा?

  • Online Admission form for 11th Standard: अर्ज क्रमांक १ भरणे –
  • लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून संकेतस्थळाच्या डॅशबोर्डवर लॉग इन करा.
  • तुमचे नाव, पत्ता, पालकांचे संपर्क क्रमांक, त्यांच्या व्यवसाय, इत्यादी माहिती काळजीपूर्वक भरा.
  • तुमचा प्रवर्ग निवडा.

आवश्यक कागदपत्रे:

कागदपत्र कुठली लागतील त्यावर चर्चा करूयात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इयत्ता दहावीची गुणपत्रिका तुमचा जो रिझल्ट आहे तो लागणार आहे रिझल्टची खूप आवश्यकता आहे ऍडमिशन प्रक्रियेसाठी. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला बघा मित्रांनो ज्या दिवशी तुम्हाला शाळेमध्ये तुमचा रिझल्ट मिळेल त्याच दिवशी रिझल्ट सोबत दाखला मिळेल तर हा शाळा सोडल्याचा दाखला कंपलसरी लागणार आहे ओरिजनल लागणार आहे तुम्हाला ऍडमिशन प्रक्रियेमध्ये त्याच्यामुळे तो जपून ठेवा नीट ज्या दिवशी तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला शाळेतून मिळेल त्या दिवशी त्याचे जवळपास दोन तीन झेरॉक्स मारून घ्या कारण त्यानंतर तो ओरिजिनल दाखला तुम्हाला कॉलेजमध्ये तुम्हाला सबमिट करावा लागतो. पुढे बघा जातीचा दाखला बघा ज्या विद्यार्थ्यांनी ठराविक कास्ट मध्ये फॉर्म भरला असेल तर त्यांना त्या कास्टचा त्या कास्टचं कास्ट सर्टिफिकेट लागेल आणि ज्या मुलांनी ओपन मध्ये फॉर्म भरला असेल त्यांना कास्ट सर्टिफिकेटची आवश्यकता लागणार नाही ओके त्याचबरोबर पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये आहे नॉन क्रिमिनलच प्रमाणपत्र लागू शकतं.

जे विद्यार्थी ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरणार आहेत तर त्यांना ईडब्ल्यूएस च प्रमाणपत्र जे आहे ते लागेल उत्पन्नाचा दाखला जो आहे तो लागणार आहे दिव्यांग प्रमाणपत्र बघा जे विद्यार्थी दिव्यांग आहेत अपंग आहेत थोडेफार त्यांच्याकडे ते सर्टिफिकेट असणं गरजेच आहे ते सर्टिफिकेट असेल तर ऍडमिशन प्रक्रिया तुमची सुलभ होईल पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे जे विद्यार्थी प्रकल्पग्रस्त आहेत किंवा भूकंपग्रस्त आहेत तर अशा विद्यार्थ्यांकडे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असल्याच प्रमाणपत्र जर असेल तर ते उत्तम होईल त्यानंतर जे विद्यार्थी आजी माजी सैनिक पाल्य आहेत तर तुमच्याकडे ते आजी माजी सैनिक पाल्य प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्ही तुम्हाला जर का खेळा तुम्ही खेळामध्ये असाल विशेष खेळामध्ये जर तुम्ही काही नैपुण्य मिळा मिळाल असेल तर तसं ते प्रमाणपत्र त्याची आवश्यकता असेल आणि अनाथ विद्यार्थी असतील तर अनाथ विद्यार्थ्यांसाठी विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास विभागाच प्रमाणपत्र जे असत तर त्या प्रमाणपत्राची आवश्यकता आहे.

तर इतकी सारे प्रमाणपत्र जे आहेत तर ती आपल्याला लागतात तहे सर्व प्रमाणपत्र जी आहे मित्रांनो तर ती आत्ताच त्या प्रमाणपत्राची तयारी करा तुम्हाला जे प्रमाणपत्राची आवश्यकता असते तुम्ही जर प्रकल्पग्रस्त असाल भूकंपग्रस्त असाल तर ते प्रमाणपत्र आणून ठेवा जर तुम्ही दिव्यांग असाल तर ते प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल तर ते लवकरात लवकर ते प्रमाणपत्र व्यवस्था करा ओके जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल आणि तुम्ही कास्ट मधून फॉर्म भरणार असाल तर ते कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते सुद्धा आणून ठेवा तर ही सारी प्रमाणपत्र जी आहे त्यांची आवश्यकता आपल्याला लागणार आहे तर ती प्रमाणपत्र जमा करून ठेवा जेणेकरून ऍडमिशन प्रक्रियेमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही काही अडचण येणार नाही

10th नंतर कोणकोणत्या क्षेत्रात तुम्ही जाऊ शकता:


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *