कोणत्या खत विक्रेत्याकडे खताचा किती साठा आहे, याबरोबरच पिकाच्या वर्गवारीनुसार कुठल्या पिकाला कोणते खत देणार आशा प्रकारची माहिती देणारे ‘महाविस्तार-एआय’ अॅप नुकतेच लाँच करण्यात आले आहे. प्ले स्टोअरवर उपलब्ध है मोबाइल अॅप्लिकेशन शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. शासनाने नुकतेच ‘महाविस्तार- एआय’ अॅप्लिकेशन नुकतेच लाँच केले आहे. हे अॅप एआयच्या मदतीने काम करणारे आहे. शेतकऱ्यांनी या अॅपचा उपयोग करावा. या अॅपचर विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील मालाची आवक आणि बाजारभावही समजेल.
महाविस्तार एआय चा आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अधिकृत ॲप विकसित करण्यात आले शेतीविषयक सल्ला बाजारातले दर कोणती शेती करावी सोबतच कोणत खत घ्याव या संदर्भात एआयच्या माध्यमातून आता मदत केली जाणार.
कृत्रिम खतटंचाई, शेतकऱ्यांची लूट थांबणार:
‘महाविस्तार- एआय’ अॅप्लिकेशनवर आपल्या जिल्ह्यासाठी शासनाने किती मे. टन खत मंजूर केले? यापैकी किती टन खत उपलब्ध झाले, हे समजेल. परिणामी, कृत्रिम खतटंचाई करता येणार नाही. शेतकऱ्यांची लूट थांबेल.
रांगेत उभे नाही राहावे लागणार:
खतखरेदीसाठी शेतकऱ्यांना सर्व कामधंदे सोडून रांगेत उभे राहावे लागत होते. मात्र आता दुकानदाराकडे किती खतसाठा शिल्लक आहे, हे दुकानातील फलकावरच कळेल. यामुळे रांगेत उभे राहण्याची गरज नाही
अॅप सांगणार खताची मात्रा:
‘महाविस्तार- एआय’ अॅप्लिकेशन हे शेतकऱ्यांसाठी एक मार्गदर्शक म्हणून काम करणार आहे. पिकाला खताची किती मात्रा द्यावी, याविषयी सविस्तर माहिती या अॅपवर असेल. तुम्हाला हे प्लिकेशन तुमचं संपूर्ण काम तुमच्या शेतीचं काम तुमच्या जमिनीला खत किती लागते. त्याची संपूर्ण माहिती तुमच्या पिकाला कोणता रोग आहे, कोणते, औषध वापरावं याची संपूर्ण माहिती आणि डीबीटी फार्मर या या वेबसाईट मधून आपलं अर्ज केला आहे. त्याची स्थिती संपूर्ण माहिती या अॅपमधून आपल्याला कळणार आहे. त्यामध्ये आपले पीक कोणत आहे त्याची त्याला खत किती लागणार आहे याची संपूर्ण माहिती या ॲप मध्ये आहे आणि हे ॲप ए आय च्या माध्यमातून बनविण्यात आलेला आहे. आपल्या जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये भाव काय आहे सध्या आपल्या पिकाचे भाव काय आहेत ते संपूर्ण जाणून घेण्यासाठी हे अॅप महत्त्वाचे ठरणार आहे
विक्रेत्यांकडील खताचा साठा कळणार:
जिल्ह्यातील कोणत्या खतविक्रेत्यांकडे किती खताचा साठा शिल्लक आहे, याची माहिती या अॅप्लिकेशनवर असेल. कारण विक्री करण्यात आलेल्या खताची माहिती ऑनलाइन शासनास सादर करणे खतविक्रेत्यांना बंधनकारक आहे.
बाजारभाव व कृषीविषयक योजनांची माहिती:
या अॅपचर विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील मालाची आवक आणि बाजारभावही समजेल.
कृषी विभागाच्या या अॅपवर विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील मालाची आवक आणि बाजारभावही समजेल. शिवाय कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती मिळेल. शेतकऱ्यांना संबंधित योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर संबंधित पोर्टलवरही घेऊन जाईल.
क्रॉप कव्हर, मल्चिंगचीही माहिती:
या अॅपवर शेतीसंबंधी सर्व माहिती तसेच दुग्ध व्यवसायासाठीही माहिती मिळते. एवढेच नव्हे तर पाणी बचत करणारे मल्चिंग तंत्रज्ञान आणि पिकांचे संरक्षण करणाऱ्या क्रॉप कव्हरची माहितीही मिळते.
अॅप कसे डाउनलोड करायचे?
सर्वात प्रथम आपल्याला प्ले स्टोर वर यायच आहे. प्ले स्टोर वर येऊन ए आय ॲप्स हे टाईप करून ते अॅप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यायचे आहे. ते अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला सर्वात प्रथम महत्त्वाचं काम म्हणजे रजिस्ट्रेशन करायचा आहे.आपली संपूर्ण माहिती भरायची आहे. आपल नाव आणि मोबाईल नंबर आणि आपला जिल्हा निवडायचा आहे, जिल्हा निवडल्याच्यानंतर तालुका निवडायचा आहे, तालुका निवडल्याच्यानंतर आपलं गाव जे गाव आहे ते गाव निवडायचा आहे, ते गाव निवडल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन सक्सेसफुल सबमिट करायचा आहे.
नंतर आपल्याला ॲपमध्ये येऊन लॉगिन करायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून ओटीपी येईल तो या ठिकाणी रखण्यात भरायचा आहे, आपल्याला ओटीपी आल्याच्यानंतर आपल्याला जीपीआरएस लोकेशन द्यायच आहे. लोकेशन दिल्याच्यानंतर या ठिकाणी ॲपमध्ये लॉगिन झालेले आहोत. आपण ही अॅप्लिकेशन सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.