शेतकरी ओळखपत्र का फायदेशीर आहे,आणि ते काढणे का अनिवार्य आहे, तर ते तुम्ही खालील माहिती वरुन जाणून घेऊ शकता.
फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र सर्व शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी हा अनिवार्य करण्यात आलेला आहे. फार्मर आयडीचा तुम्हाला भरपूर असा फायदा आहे. फार्मर आयडीचे तीन ते चार फायदे आहेत पहिला म्हणजे सगळी शेतकऱ्यांची जी काही माहिती आहे ती फार्मर आयडी मध्ये साठवली जाणार आहे. दुसरं म्हणजे पीएम किसान योजनेअंतर्गत जो काही तुम्हाला हप्ता मिळतो त्यासाठी फार्मर आयडी तुमच्याकडे असणं अनिवार्य आहे. तिसरं म्हणजे तुम्ही जर बँकेतून पीक कर्ज घेत असाल तर आता तुम्हाला फार्मर आयडी हा लागणार आहे. चौथं म्हणजे पीक विमा भरताना सुद्धा तुम्हाला आता फार्मर आयडी हा लागणार आहे अशा प्रकारचे हे फायदे आहेत त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपला फार्मर आयडी काढून ठेवा. शेतकऱ्याचा फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी तुम्हाला खालील माहिती उपयुक्त ठरेल. हे ओळखपत्र बनवण्याची शेवटची तारीख 29 मे आहे तरी सर्वानी न चुकता लवकरात लवकर ओळखपत्र बनवून घ्यावे
शेतकरी ओळखपत्र मिळण्यासाठी अर्जप्रक्रिया:
- https://mhfr.agristack.gov.in ह्या वेबसाइट वर आल्यानंतर वरती ऑप्शन आहे लॉगिन विथ सीएससी ज्यांच्याकडे सीएससी आयडी पासवर्ड आहे. त्यांनी लॉगिन विथ सीएससी या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. आपला जो काही सीएससी आयडी आहे पासवर्ड आहे तो टाकायचा आहे त्यानंतर इथे येस ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे.
- त्यानंतर आपल्याला कार्ड काढायचा आहे तर अगोदर तुम्हाला आधार ऑथेंटिकेशनच्या दोन पद्धती आहेत पहिला आहे ओटीपी आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर ओटीपी दुसरा आहे बायोमेट्रिक थंब डिवाइस अशा पद्धतीने दोन ऑप्शन दिलेले आहेत तर तो त्यापैकी एक तुम्ही सिलेक्ट करा
- त्यानंतर आधार नंबर शेतकऱ्याचा आधार नंबर या बॉक्स मध्ये टाकायचा आहे त्यानंतर बाहेर क्लिक करायचं आहे बाहेर जसं तुम्ही क्लिक कराल तर आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओटीपी जाईल तो ओटीपी इथे टाकायचा आहे आणि व्हेरिफाय बटनावरती क्लिक करायचं आहे जसं व्हेरिफाय कराल तुम्ही तर इथे पाहू शकता
- पुढे आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल्स विचारले जातील इथे खाली शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाका ईमेल आयडी विचारलाय ईमेल आयडी नसेल तरी चालेल फक्त मोबाईल नंबर टाका आणि बाहेर क्लिक क्लिक करा त्यानंतर जो मोबाईल नंबर टाकलाय शेतकऱ्याचा त्यावरती एक ओटीपी येईल तो ओटीपी इथे टाकून व्हेरिफाय करा व्हेरिफाय होईल.
- नंतर इथे पाहू शकता तीन नंबरची स्टेप आहे फार्मर डिटेल्स ओपन होईल म्हणजेच इथे शेतकऱ्याची माहिती येईल जसं की नाव असेल मराठी मधलं नाव असेल त्यानंतर लिंग असेल कास्ट कॅटेगरीचा ऑप्शन तिथे येईल तसेच जन्मतारीख असेल केअर ऑफ मधलं नाव असेल वाईफ ऑफ असेल केअर ऑफ असेल किंवा काही अन्य असेल ही सगळी माहिती तुम्हाला इथे दाखवली जाईल त्यानंतर इथे आपल्याला कास्ट कॅटेगरी विचारली आहे तुम्ही एसटी एससी ओबीसी जनरल कोणत्या कॅटेगरी मध्ये येता तिसरी सिलेक्ट करा एनटी मध्ये येत असाल तर ओबीसी सिलेक्ट करा अशा पद्धतीने कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट करू शकता.
- नंतर खाली एक ऑप्शन येतो बघा कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा जर तुम्ही बाकीच्या कॅटेगरी मध्ये येत असाल जनरल सोडून तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नंबर खाली टाकावा लागेल.
- त्यानंतर खाली यायचं आहे खाली इथे जन्मतारीख तुमची दिसेल तसेच केअर ऑफ सन ऑफ जे ऑप्शन आहेत ते इथे दिसेल इंग्लिश मध्ये दिसेल मराठीमध्ये सुद्धा दिसेल शेतकऱ्याची सगळी माहिती एकदा चेक करून घ्या त्यानंतर खाली शेतकऱ्याचा फोटो येईल कधी कधी सर्वर प्रॉब्लेम असतो तर फोटो येत नाही तर काही प्रॉब्लेम नाही.
- त्यानंतर खाली इथे विचारलंय की न्यू बिझनेस आहे का किंवा न्यू बिझनेस केला आहे का तर ते ऑप्शन आहेत ते यस नो करू शकता काहीही इथे तुम्ही करू शकता काही प्रॉब्लेम नाही. केला असेल तर यस करू शकता बिझनेस नसेल केला तर नो करू शकता.
- त्यानंतर खाली रेसिडेंशिअल डिटेल्स आहेत जसं की ऍड्रेस आधार कार्ड वर जसा ऍड्रेस आहे तसा येईल मराठीमध्ये बरोबर आहे का ते चेक करा नाहीतर ते बरोबर करू शकता त्यानंतर आपलं स्टेट डिस्ट्रिक्ट तालुका कधी कधी इथे येत नाही गावाचं नाव इथे कधी कधी येत नाही तर तुम्ही इथे एक सेपरेट ऑप्शन सुद्धा दिलेला आहे आहे इथे पिनकोड आहे आता जर कधी कधी तालुक्याचं नाव तुमचं जर आलं नाही तर इथे खाली ऑप्शन आहे इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेंशिअल डिटेल्स हा जो ऑप्शन आहे त्यावरती जसं तुम्ही क्लिक कराल तर इथे तुम्हाला ऑप्शन येईल जिल्हा तालुका गाव पिनकोड अशा पद्धतीचे सगळी माहिती तुम्ही इथे टाकून घ्या.
- त्यानंतर लँड होल्डर जसे की तुम्ही स्वतः ओनर असाल तर ओनर त्यानंतर भाड्याने जर दिली असेल भाड्याने घेतली असेल तर टेनंट तर त्यानंतर बाकीचे आहे लँडलेस लँड नसेल तर किंवा फॉरेस्ट मध्ये जर असेल किंवा ओन अशा प्रकारचे प्रकार आहेत तर ते तुम्ही कशामध्ये येताय ते तुम्ही सिलेक्ट करा.
- त्यानंतर ऑक्युपेशन डिटेल्स इथे काही करायचं नाही हे ऑटोमॅटिकली टिक होत.
- त्यानंतर खाली यायचंय खाली आता शेतकऱ्याचा जो काही नंबर आहे तो ऍड करायचा आहे फेच लँड डिटेल्स वरती क्लिक करायचंय त्यानंतर डिस्ट्रिक्ट सब डिस्ट्रिक्ट गावाचं नाव ज्या ठिकाणी शेतकऱ्याची शेती आहे त्या ठिकाणचाच तुम्हाला इथे जिल्हा, तालुका आणि त्यानंतर गावाचं नाव इथे सिलेक्ट करायचं आहे.
- शेतकऱ्याचा गट नंबर म्हणजेच सर्वे नंबर टाकायचा आहे आणि प्रोसिड करायचा आहे प्रोसिड केल्यानंतर पाहू शकता त्या गटामधली जे काही नाव असतील ती नाव इथे दाखवली जाईल तर आता ज्या शेतकऱ्याच फार्मर आयडी कार्ड काढायचे त्या शेतकऱ्याचं नाव इथे शोधायचं आहे आणि तेच नाव फक्त इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे.
- नाव सिलेक्ट केलं की नंतर तुम्हाला इथे सगळी माहिती खाली आलेली दिसेल इथे तुम्हाला टिक करायचे बॉक्समध्ये आणि आपल्याला जो काही इथं ऑप्शन येईल तो आपल्याला इथे ऍड करायचा खाली सबमिट करायचा आहे. सगळी माहिती चेक करून आपल्याला खाली सबमिट करायचा आहे. तर ज्या व्यक्तीचा फार्मर आयडी कार्ड काढताय त्याच व्यक्तीचा फक्त नाव तुम्ही सिलेक्ट करा आणि हे ऑप्शन सिलेक्ट करून सबमिट बटनावरती क्लिक करा.
- इथे तुम्हाला सगळी माहिती आलेली दिसेल सबमिट केलं की इथे तुम्हाला या बॉक्स मध्ये खाली दिसेल आता आपल्याला हे व्हेरिफाय करायचं आहे व्हेरिफाय ऑल लँड हा ऑप्शन आहे. त्यावरती क्लिक करायचं आहे व्हेरिफाय ऑल लँड वरती क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर खाली यायचं आहे खाली डिपार्टमेंटलर अप्रूवल मध्ये रेव्हेन्यू सिलेक्ट करायचा आहे.
- त्यानंतर फार्मल कन्सेंट एक्सेप्ट करायचंय येस करायचंय सगळ्या इथे टिक डिक्लेरेशन असेल हे दोन्ही टिक करायचे
- त्यानंतर इथे कधी कधी प्रॉब्लेम येतो सेव्ह अॅज अ ड्राफ्ट चा ऑप्शन येतो सेव्ह चा ऑप्शन येत नाही. तर हे पहिलं काय करायचं सेव्ह अॅज अ ड्राफ्ट करून घ्ययच. पहिल्यांदा आपण जेवढा फॉर्म भरलाय तो सेव्ह अॅज अ ड्राफ्ट केला.
- आता पुन्हा आपण इथं येऊ सेव्ह अॅज अ ड्राफ्ट झालाय पुन्हा त्याच शेतकऱ्याचा पुन्हा एकदा नंबर टाका अजून फॉर्म आपला कम्प्लीट झालेला नाही सेव्ह अॅज अ ड्राफ्ट हा प्रॉब्लेम आलेला आहे,आपल्याला तर आपण पुन्हा इथे आधार नंबर टाकलाय आधार नंबर टाकून बाहेर क्लिक करा.
- नंतर तुम्ही पाहू शकता की आपला फॉर्म ड्राफ्ट मध्ये आहे तर कंटिन्यू एडिटिंग म्हणायचं कंटिन्यू एडिटिंग जसं म्हणाल तर हा जो फॉर्म आहे तो ओपन होईल.
- आता फक्त आपल्याला सेव्ह अॅज अ ड्राफ्ट ऑप्शन येत होता सेव्हचा ऑप्शन येत नव्हत. तर काय करायचं कुठं प्रॉब्लेम आहे का ते पाहायचं आता जास्त करून जो प्रॉब्लेम होतो तो कशा पद्धतीने होतो तर तुम्ही एखादी गोष्ट चुकीची लिहिली असेल किंवा काय तर ते एकदा चेक करून घ्यायचं आहे हा सेव्ह चा ऑप्शन तेव्हाच येईल जेव्हा नेम मॅच स्कोर आहे तो इथे 100% झालेला असेल. तर तो 100% करायचा म्हणजेच इंग्लिश मध्ये जसं आहे तसंच मराठीमध्ये तुम्हाला इथे टाकायचं आहे मराठीमध्ये व्यवस्थित टाकलं की हा जो स्कोर आहे तो इथं हिरवा होईल म्हणजे 100% होईल आणि हा जर 100% स्कोर झाला, तर त्यानंतर आता पुन्हा एकदा आपण फार्मर कन्सेंट द्यायचा. आता तोच फॉर्म तुम्ही पाहू शकता डिक्लेरेशन दिलेलं असेल नंतर आता सेव्ह अॅज अ ड्राफ्टचा ऑप्शन गेलेला असेल आता सेव्ह चा ऑप्शन येईल तर सेव्ह करा.
- ओटीपी इन बायोमेट्रिक दोन्हीपैकी एक ऑप्शन तुम्हाला येईल ते ऑप्शन सिलेक्ट करा.
- आणि इथे आपल्याला ई साइन करायचा आहे केवायसी करायची आहे प्रोसीड टू ई साइन करायचा आहे ई साइन केल्या की
- इथे आपल्याला शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा आहे जनरेट ओटीपी वरती क्लिक करायचा आहे.
- जर बायोमेट्रिक निवडली तर तुम्ही अंगठा घेऊ शकता जनरेट ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर इथे जो ओटीपी आहे तो इथे ओटीपी टाकायचा आहे एक्सेप्ट करून टर्म्स अँड कंडिशन एक्सेप्ट करून ओटीपी इथे शेतकऱ्याला जो आलाय तो इथे टाकून सबमिट बटन वरती क्लिक करायचा आहे.
- सबमिट केल्यानंतर आपलं काम झालेलं आहे हे ऑटोमॅटिकली रिडायरेक्ट होईल रजिस्ट्रेशन सक्सेसफुली फार्मर आयडी साठी आपली नोंदणी इथे शेतकऱ्याची झालेली आहे एक एनरोलमेंट आयडी इथे आलेला आहे तर हा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता नाही काढला तरी चालेल डाऊनलोड पीडीएफ चा ऑप्शन आहे या डाऊनलोड पीडीएफ ऑप्शन वरती क्लिक करून आणि ही जी प्रिंट आहे तीन पानाची ही एक प्रिंट आहे जी फार्मर आयडीसाठी आहे ही प्रिंट आपल्याला काढायची आहे आणि ही शेतकऱ्याला प्रिंट द्यायची आहे. अशाच पद्धतीने आता याचं स्टेटस आपण चेक करूयात शेतकऱ्याला दिली
- आता स्टेटस पहा आपण आधार नंबर टाकलाय आता पहा एक एनरोलमेंट आयडी जनरेट झालेला दिसेल आणि अप्रूवल स्टेटस जर पाहिलं तर पेंडिंग आहे थोड्या दिवसांनी हे अप्रूव होईल आणि त्यानंतर फार्मर आयडी जनरेट होईल. थोड्या दिवसांनी तुम्ही इथे आधार नंबर आता पुन्हा एकदा टाकून बघितल आधार नंबर इथे स्टेटस चेक करण्यासाठी टाकायचा आणि बाहेर आपल्याला क्लिक करायचा आहे बाहेर क्लिक केल्यानंतर पाहू शकता आपला जो काही फॉर्म आहे तो तुम्हाला अप्रूव झालेला दिसेल.