इतिहास घडला : एनडीएतून प्रथमच महिला कॅडेट्सची तुकडी बाहेर..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

एनडीएमधून अनेक अधिकारी घडले आहेत. मात्र, यंदाचे वैशिष्ट्य वेगळे असून, प्रथमच महिला कैडेट्सची तुकडी उत्तीर्ण होत आहे. याचा विशेष आनंद होत आहे. मुलींनो, तुम्ही दाखनिलेले धैर्य व क्षमतेच्या जोरावर यश संपादन केले आहे. तुमचे यश केवळ तुमचे स्वतःचे नसून, भारतातील हजारो तरुणींसाठी प्रेरणा असल्याचे प्रतिपादन दीनद‌याळ उपाध्याय गोरखपूर विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. पूनम टंडन यांनी केले.

राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एनडीए) इतिहासात यंदा एक नवा आध्याय लिहिला गेला पहिल्यांदाच महिला कैडेट तुकडी एनडीएमधून प्रशिक्षण पूर्ण करून त्यांचा दीक्षान्त समारंभ गुरुवारी पार पडला. यामध्ये बीएससी शाखेत ८४ विद्यार्थी, बीएससी कम्प्युटर सायन्स ८५ विद्यार्थी, कला शाखेतील ५९ विद्यार्थी आणि बीटेकमधील १११ विद्याव्यांचा सम्मवेश आहे. एकूण ३३९ कैजेट्‌सचा दीक्षान्त समारंभ पार पडला. यावेळी एनडीए कमांडंट व्हाइस अॅडमिरल गुरचरण सिंग, एअर व्हाइस मार्शल सिद्धार्थ बेदी यांच्यासह एनडीएच्या वेगवेगळ्या विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये 71 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मुलींची तुकडी सैन्यामध्ये रुजू झाली आहे 2021 च्या परदेशी मुली निर्णयानुसार कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार मुलींना सुद्धा एनडीए ची कवाड खुली केली आणि त्यानंतर 2022 मध्ये 17 मुली परीक्षा उत्तीर्ण करून एनडीए मध्ये दाखल झाल्या त्यानंतर तीन वर्षांचा खडतर प्रशिक्षण पूर्ण करून आज या 17 मुली लष्करात अधिकारी म्हणून रुजू होतात त्यामुळे आजचा सोहळा सुवर्णाक्षरामध्ये लिहिण्यासारखाच आहे

श्रिती दक्ष पहिली महिला सिलव्हर मेडलिस्ट:

राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एनडीए) इतिहासात यंदा महिला कैंटेटस् ची तुकडी एनडीएमधून प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडली, या तुकडीत १७ महिला आणि ३०० जून अधिक पुरुष कैडेट्स आहेत. यामध्ये कला शाखेत श्रिती दक्ष हिला सिलव्हर मेडल प्रदान करण्यात आले. एनडीएच्या इतिहासात पहिल्यादाच एका महिलेला सिल्व्हर मेडल मिळाले आहे.

माझ्या परिवारातील संरक्षण विभागात काम करणारी ही चौथी पीढी असेल. मला भारतीय नौदलात काम करायचे असून, उत्कृष्ट कामगिरी केल्याचा आनंद होत आहे. एनडीएत प्रवेश घेतला तेव्हा सुरुवातीला भावनिक असल्यामुळे तीन वर्ष याठिकाणी काढू शकेल, ही शंका होती. मात्र, भावनिक बाब ताकद म्हणून वापरली आणि आज चांगली कामगिरी करू शकली आहे.

महिलांचे प्रमान वाढत आहे.

एनडीएच्या इतिहासात पहिल्यांदा 17 महिला कॅडेट्स 300हून अधिक पुरुषांसह एनडीए मधून ग्रॅज्युएट होतील. त्या भारतीय लष्कर, नवदल आणि हवाई दलात सामील होतील. 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महिलांना एनडीए परीक्षा देण्याची परवानगी देण्याचा आदेश दिला होता. यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने महिलांना अर्ज करण्याची परवानगी दिली.भारतीय सैन्यात 12 लाख पुरुषांच्या तुलनेत सा हजार महिला पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण फक्त 0.56% हवाई दलात सुमारे 1.5 लाख जवान आहेत महिलांची संख्या फक्त 1600 इथे हे प्रमाण एक टक्क्यापेक्षा थोडं जास्त भारतीय नौदलात पुरुषांची संख्या दहा हजार तर महिलांची संख्या फक्त 700 या दलात महिलांचे प्रमाण 6.5 टक्के इतके आहे. एनडीएच्या महिला ब्रिगेड तिन्ही दलांमध्ये एकूण 9118 महिला अधिकारी आहेत. 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये भारताच्या तीनही सैन्यात महिलांची संख्या वाढली.

भारतात महिला लढाऊ विमान उडवण्यात आणि समुद्रात लष्करी जहाजांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या हाताळण्यात महत्त्वाची भूमिका बजावतायत. तसच विशेष ऑपरेशन्स द्वारे शत्रूला धडा शिकवतायत. ऑपरेशन सिंदूर मध्ये आपण हे पाहिलय. आता यात एनडीएत पास झालेल्या या नव्या 17 महिला कॅडेट्स भारतीय सैन्याची सेवा करण्यास सज्ज झाल्यात.

७५ वर्षाच्या प्रदीर्घ काळात पहिल्यांदा:

एनडी खऱ्या अर्थाने एक नवा इतिहास रचणार आहे कारण आज महिलांची पहिली तुकडी पास आऊट होती खरतर हे एनडीए मधला आजच जो सोहळा आहे तो खरंतर एक ध्यास अभ्यास सातत्यपूर्ण अभ्यास कणखरपणा हाचा हा खरतर सोहळा असतो खरतर राष्ट्रापती जे समर्पण असत ते आजच्या या सोहळ्यामधून आपल्याला दिसतं खरतर दरवर्षी एनडीए च ही परेड पास आऊट होत असते हे पासिंग आऊट परेड होतच असते मात्र यावेळेसच्या परेडला एक वैशिष्ट्य आहे ती म्हणजे यावेळेसच्या परेडमध्ये महिलांच पथक आहे त्यामुळे एक एनडीएच्या 75 वर्षाच्या प्रदीर्घ इतिहासामध्ये खरंतर एक इतिहासाच मानाच पान आज आणखी जोडलं जाणार आहे खरं तर 148 वा हा अभ्यासक्रम आहे आणि पहिल्यांदाच महिलांची ही तुकडी पासिंग आऊट.

खरं तर महिलांचा एनडीएतला प्रवेश आणि त्यानंतर तीन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतरची पासिंग आऊट परेड ही तर महिलांच्या या बॅचच्या माध्यमातून 17 महिला आज लष्करात ऑफिसर्स म्हणून जॉईन होतात भारतीय लष्कर नौदल आणि हवाई दलामध्ये अधिकारी म्हणून त्या सेवा देण्यासाठी सज्जत महिलांची वाढती संख्या हे खरंतर खूप कौतुकास्पद बाब भारतासाठी साठी निश्चित आहे आणि 2022 पासून आजपर्यंत एनडीए मध्ये जवळपास 126 महिला कॅडिडेट्सने प्रवेश घेतला आणि 121 अजूनही त्यामध्ये प्रशिक्षण घेतात आणि यामध्ये महाराष्ट्रातल्या सुद्धा महिला आहेत हे विशेष आहे आणि कर्नाटकातल्या एक केरळ मधल्या चार कॅडेट सध्या प्रशिक्षण घेतात तर एनडीए मध्ये दिलं जाणार प्रशिक्षण आपल्याला सगळ्यांना माहिती अत्यंत कठोर शारीरिक मानसिक बौद्धिक क्षमतेची कसोटी घेणार असतं, आणि यामध्ये सैन्यदरासाठी शिस्त नेतृत्व बौद्धिक आणि व्यावहारिक अस सगळ शिक्षण दिलं जातं.

त्यामुळे एनडीए मध्ये होणारी पासिंग आऊट परेड ही केवळ एका बॅचच्या यशाची ही परेड नाही म्हणता येणार आहे कारण भारतीय लष्कराच्या इतिहासातल हे खरंतर एक खूप महत्त्वाच अस पाऊल ठरणार आहे आणि म्हणूनच आजच्या परेडकडे वैशिष्ट्यपूर्ण म्हणूनच बघाव लागेल कारण एनडीएच्या या संपूर्ण प्रदीर्घ इतिहासामध्ये जो सगळा इतिहास एनडीएचा आहे, त्यामध्ये हा जो दिवस आहे हा खरंतर सुवर्णाक्षरांनी नोंदवावा लागेल कारण एनडीए मधून महिलांची जी तुकडी पास होणारी ही पहिली तुकडी आहे त्यामुळे भारताच्या च्या शिरपेच्यामध्ये हा आणखी खरंतर मानाचा तुरा खोला गेला असं म्हणायला हरकत नाही.

सतत अभ्यास सातत्य कणखरपणा आणि राष्ट्रसेवेसाठी जे समर्पण असत अशा अनेक गुणांचं हे प्रदर्शन म्हणजे हा एनडीएचा म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या क्षेत्रपाल मैदानावर होणारा हा दीक्षांत समारंभ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *