राज्यात मोठ्या प्रमाणात पदभरती करणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा..! 2026 हे ‘भरती’ वर्ष..
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पदभरती प्रक्रिया गतिशील करून सन २०२६ मध्ये मोठ्या प्रमाणात पदभरती करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली. ‘सरकारच्या प्रत्येक संवर्गातील पदे व त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप बदल झालेला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व संवर्गातील पदांच्या सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करण्यात येणार आहे’, असेही त्यांनी सांगितले, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सामान्य प्रशासन…