कर्जमाफीत तुमचं नाव आहे का? कर्जमाफी नेमकी कोणाला?

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

काल अर्थसंकल्पात मुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली दोन लाखांपर्यंत पीक कर्ज माफ करण्याची घोषणा करतानाच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 50 हजार रुपये मिळणार असल्याचं देखील फडनविसांनी सांगितलं काही महिन्यांपूर्वी बच्चू कडू यांच्यासह अजित नवले आणि इतर शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा शेतकऱ्यांची पीक कर्ज सरसकट माफ करावं यासाठी मोठं आंदोलन उभं केलं होतं त्यावेळी राज्य सरकारन शेतकरी कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं.

त्याची पूर्तता काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात करण्यात आली. अर्थात असं असलं तरी सरसकट शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालेला आहे का? या कर्जमाफीचा फायदा महाराष्ट्रातल्या सरसकट शेतकऱ्यांना मिळणार आहे का? असा निर्णय घेत असताना देखील सरकारनं नेमक्या कोणत्या अटी व शर्ती लावल्या आहेत? या अटी व शर्तीमुळं जर तुम्ही पीक कर्ज घेतलं असेल तर ते माफ होईल की नाही शिवाय कर्जमाफी नेमकी कधी होईल? याच प्रश्नांची सविस्तर उत्तर जाणून घेऊयात…

तर सुरुवात करूया शासनाच्या निर्णयापासून अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबवण्याचा असल्याच आश्वासन दिलं होतं त्यासाठी समिती गठीत केली आहे. 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी जाहीर करत आहे.

तसेच जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन पर लाभ देणार आहे. अर्थात या घोषणेनंतर शेतकरी कर्जमाफी झाली आहे म्हणून जल्लोष होऊ लागला पण दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी शिवाय 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच थकीत कर्ज आणि समिती या तीन गोष्टी या कर्जमाफीत महत्त्वाच्या ठरतात. त्याच विस्तारान समजून घ्याव्या लागतील.

कर्जमाफी करण्याची योजना का आणण्यात आली?

यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे तारखेचा. साधारणपणे वेगवेगळ्या हंगामात शेतकरी पीक कर्ज घेत असतात. पीक कर्ज घेऊन पीक घेणं आणि त्यानंतर जुनं कर्ज फेडून नव्ज घेणं या कर्जाच्या चक्रात शेतकरी अडकलेला आहे. यातून सुटका व्हावी म्हणूनच कर्जमाफी करण्याची योजना आणण्यात आली. साधारणपणे जून ते जून अशा प्रकारे कर्ज काढून परत भरण्याचा प्रकार चालतो.

तरीही वेगवेगळ्या भागातल्या वेगवेगळ्या पीक पद्धतीवर ही तारीख अवलंबून असते. आत्ता सरकारनं थकीत कर्जाची जी तारीख दिली आहे ती आहे 30 सप्टेंबर 2025 म्हणजेच 30 सप्टेंबर 2025 या तारखेपर्यंत तुम्ही कर्ज फेडलं नसेल तरच या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येतो. साधारण पीक कर्ज वर्षाच असतं म्हणजेच 31 ऑक्टोबर 2024 पूर्वी तुम्ही कर्ज घेतलं असेल आणि 30 सप्टेंबर 2025 या तारखेपर्यंत तुम्ही ते भरलं नसेल तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे.

योजनेचा लाभ तुम्हाला केव्हा मिळणार नाही?

31 ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज घेतलं असेल पण अद्याप तुम्ही ते भरलं नसेल तर मात्र या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. आता इथे एक मुद्दा निर्माण होतो तो म्हणजे 31 ऑक्टोबर 2024 पूर्वी कर्ज घेतलं होतं. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ते थकीत होतं मात्र त्यानंतर ऑक्टोबर 2025 पासून ते अगदी परवापर्यंत ते थकीत कर्ज फेडलं नसेल तर ही योजना लागू होईल का? तर अशा शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

अगदी सोप्या पद्धतीने सांगायचं तर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत तुमचं कर्ज थकीत असेल 31 ऑक्टोबर 2024 व त्यापूर्वी हे कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला कर्जमाफीच्या योजनेचा लाभ मिळणार आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज फेडल आहे अशा शेतकऱ्यांना मात्र कर्जमाफीचा लाभ न मिळता ₹50 हजार पर्यंतच्या प्रोत्साहन पर योजनेचा लाभ मिळणार आहे.

दुसरा मुद्दा;

आता इथं दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे 31 ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज घेतलं असेल आणि ते फेडल असेल किंवा नसेल तरीही त्या शेतकऱ्यांना दोन्ही गोष्टींचा लाभ मिळणार नाही. आता हा झाला तारखेचा नियम. दुसरा महत्त्वाचा विषय दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी. दोन लाखांहून अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी लागू नये अर्थात इथे फळबागा शेतकऱ्यांकडून टीका होऊ लागली कारण द्राक्ष डाळिंब किळी अशा विविध फळबागेसाठी मोठ्या कर्जाची आवश्यकता असते व ही रक्कम बऱ्याचदा दोन लाखांच्या वर असते त्यामुळे शेतकरी नेत्यांनी दोन लाखांची अट ठेवू नये तर सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी केली होती पण सरकारन दोन लाख रुपयांपर्यंतची अट कायम ठेवली आहे.

पर्यायान ज्या शेतकऱ्यांच पीक कर्ज दो लाख रुपयांच्या आत असेल त्यांनाच या कर्जमाफीचा फायदा होणार आहे. आता या दोन अटीनंतर येते ती तिसरी आणि महत्त्वाची अट. मुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफीच्या संदर्भातून समिती गठीत करण्यात येईल.

ही समिती 2 एप्रिल रोजी आपला अहवाल देईल आणि त्यातून नियम व अटी पाळून कर्जमाफी करण्यात येईल अस विधान केल आहे. पर्यायान अजित नवले यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांनी या समितीवर आक्षेप नोंदवला आहे माध्यमांसोबत बोलताना ते म्हणालेत की सरकार समितीला समोर करून अशा अनेक अटी व शरती लागू करेल ज्यामुळे कर्जमाफीची संख्या कमी होईल. घरात चार चाकी वाहन आहे का? सरकारी नोकरी आहे का अशा वेगवेगळ्या अटी समोर आल्या तर सरसकट शेतकऱ्यांना लाभ तर होणारच नाही पण काही मूठभर शेतकऱ्यांनाच या कर्जमाफीचा फायदा होईल अशी टीका शेतकरी नेते करू लागलेत एकूणच शेतकरी कर्जमाफीची रक्कम अंदाजे 35000 कोटीच्या आसपास असायला हवी होती.

पण सरकार ते 12000 कोटीपर्यंत आणेल दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टीकडे शेतकरी नेत्यांनी लक्ष वेदलय ते म्हणजे सप्टेंबर 2025 नंतर महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे ळ झालेल्या नुकसानाकडे तारखेचा घोळ असल्यानं अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांना सप्टेंबर 2025 नंतर कर्ज घेण्याची वेळ आली असेल अशा शेतकऱ्यांना या योजनेचा कोणताच लाभ होणार नाही अर्थात सरकारच्या समितीतून अजून कोणत्या अटी व शरती येत आहेत यावर कर्जमाफी कोणाला मिळणार हे समजणार आहे. तुरतास तरी तुम्ही 31 ऑक्टोबर 2024 पूर्वी कर्ज घेतल असेल 1 सप्टेंबर 2025 पर्यंत ते फेडल नसेल आणि कर्जाची रक्कम दोन लाखांच्या आत असेल तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *