शेवगाच्या शेंगा खाण्याचे अनेक फायदे आहेत. मधुमेह संधिवात बुद्धकोष्ठता ह्रदयरोग असे अनेक आजार व रोग शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने होत नाहीत शेवग्याच्या मुळापासून ते पाने फुले फळे बिया हे सर्व भाग औषधी आहेत. शेवग्याचे झाड 300 हूण अधिक रोग बरे करू शकतो. म्हणूनच आयुर्वेदात शेवगाला अमृत असे म्हटले आहे. शेवगा शेंगात लोह कॅल्शियम विटामिन मिनरल्स आणि प्रोटीन्स मुबलक प्रमाणात आढळतात. शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण प्रमाण वाढते. हिमोग्लोबिनची कमतरता भरून निघते. शेवग्याच्या शेंगा शेंगात असणारे कॅल्शियम हाडे मजबूत बनवते. शरीरातील थकवा दूर करण्यासाठी शेवग्याच्या शेंगाच सेवन नक्की करा. डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी देखील शेवग्याच्या शेंगा आवर्जून खाव्यात. शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने पचनक्रिया देखील सुधारते शेवग्याच्या शेंगा वजन वाढण्याच्या समस्येवर रामबाण आहेत. तुम्हाला डायबिटीज असेल तर अशावेळी शेवग्याच्या शेंगा नक्की खा फायदा होईल. शेवग्याच्या शेंगा आपली रोगप्रतिकार शक्ती देखील वाढवतात. शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब नियंत्रणात राहतो. शेवग्याच्या पानांचा रस आणि मध एकत्र घेतल्यास मोतीबिंदू मध्ये आराम पडतो. शेवग्याचे केवळ शेंगाच नव्हे तर पाने फुले बिया चाल आणि मूळ हे सुद्धा अनेक औषधी गुणधर्मानी युक्त आहेत. मधुमेह असणाऱ्या लोकांनी तर शेवग्याच्या शेंगा आवर्जून वापर करावा फायदा होतो. शेवग्याच्या पानांचा रस आणि नारळ पाणी यांचे मिश्रण जुलाब आणि कावीळ बरी करतात. शेवगा शेंगा खाल्ल्याने मुतखडा बाहेर पडण्यास मदत होते वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी होतात यकृत म्हणजेच लिव्हर निरोगी राहते सायटिका सांधेदुखी होत नाही पोटातील जंत नष्ट होतात दातांमध्ये कॅव्हिटी होत नाही. शेवग्याच्या शेंगांचे सूप नियमित केल्यास लैंगिक आरोग्य सुधारते पुरुष आणि महिला दोघांसाठीही शेवगा वरदान आहे. शेवग्याच्या शेंगात असणारे फायबर बुद्धकोष्टतेचा म्हणजेच कॉन्स्टिपेशनचा त्रास दूर करतात. सर्दी खोकला कफ तसेच दम्याची समस्या असल्यास शेवग्याच्या शेंगाचे सूप नक्की प्या शेवग्याच्या शेंगाचा सूप रक्त शुद्ध करण्यास मदत करतं परिणामी चेहऱ्यावर ग्लो येतो शेवगा शेंगाचे असे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
शेवगा पोटाच्या अनेक आजारापासून बचाव करतो शेवग्याच्या शेंगाचे नियमित सेवन केल्यास किडनी स्टोनचा त्रास कमी करण्यास मदत होते शेवग्याचा ज्यूस गर्भवती स्त्रीला देण्याचा सल्ला दिला जातो, याने डिलिव्हरी मध्ये होणाऱ्या समस्येपासून आराम मिळतो. पोटात जंत झाले असतील तर शेवग्याच्या शेंगाचे सूप तयार करून त्यावेळी विशेषतः लहान मुलांना याचा उपयोग होतो. शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा शेवग्याच्या शेंगाचा वापर केला जाऊ शकतो डायबिटीज असणाऱ्या लोकांनी शेवग्याचे सेवन अवश्य करावे.
शेवग्याची पाने खाल्याने काय फायदे होतात :
तुम्ही शेवग्याची पानं सकाळी चावून खाता का तर असं केल्यानं शरीराला चांगला फायदा होतो याशिवाय शेवग्याची पानं नियमित खाल्ल्यानं तुम्हाला निरोगी आणि उत्साही जीवन जगायला मदत होते. तर या शेवग्याच्या पानामुळे शरीराला नेमके काय काय फायदे आहेत चला जाणून घेऊयात, नंबर एक शेवग्याच्या पानात विटामिन ए सी ई आणि बी कॉम्प्लेक्स कॅल्शियम पोटॅशियम प्रोटीन आणि फायबरच प्रमाण जास्त प्रमाणात असतं नियमित याच्या सेवनानं आपल्या शरीराला पोषक तत्त्व मिळतात आणि आरोग्य चांगलं राहतं नंबर दोन शेवग्याची पानं सकाळी उपाशीपोटी चावून खाल्ल्यास रक्तदाबावर
नियंत्रण राहण्यास मदत मिळते. यातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयाच्या ठोक्याने नियंत्रित करण्यास सहाय्यक ठरतात. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. नंबर तीन शेवग्याची पानं खाल्ल्याने ब्लड शुगरची पातळी नियंत्रणात राहते त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांना ही पानं चघळल्याने फायदा होतो. नंबर चार शेवग्याच्या पानात फायबरच प्रमाण जास्त असतं त्यामुळे पचन यंत्रणा देखील चांगली राहते, यामुळे बद्धकोष्टता देखील दूर राहते. अन्य पचन संस्था संदर्भातील आजारही दूर राहतात. नंबर पाच या पानात विटामिन्स ए आणि ई च प्रमाण जास्त असतं त्यामुळे त्वचा आणि केसांचं आरोग्य चांगलं राहतं त्वचेला सुरकुत्या होण्याचे प्रमाण देखील कमी होतं. नंबर सहा शेवग्याची पानं मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करतात ज्यामुळे वजन नियंत्रणात राहतं, याच्या सेवनामुळे भूक कमी होते आणि शरीरातील ऊर्जा वाढते. नंबर सात शेवग्याच्या पानात अँटीऑक्सिडंट तत्वांचा खजाना आहे, त्यामुळे रोगप्रतिकार शक्तीत वाढ होते त्याचबरोबर शरीर आजारांचा योग्य प्रकारे सामना करू शकतो नंबर आठ मानसिक आरोग्यासाठी देखील ही पानं चांगली असतात, यातील तत्वे तणाव आणि चिंता दूर करतात. नंबर नऊ यातील अँटीऑक्सिडंट घटकांमुळे शरीरातील फ्री रेडिकलशी लढण्यास
मदत करत याशिवाय हे शरीराला डिटॉक्सिफाय करत आणि अनेक रोगांचा बचाव करत तर हे होते शेवग्याच्या पानांचे फायदे.
शेवग्याची पाने सुकवून केलेले पावडरचे फायदे:
शेवग्याची पाने सुकवून त्याचे पावडर बनवले जाते त्याचे देखील आपल्याला अनेक फायदे बघायला मिळतील, शेवगा ला मोरिंगा किंवा ड्रमस्टिक देखिल म्हणतात. तर आपण बघूया ही मोरिंगा पावडर त्याची पाने सावलीत वाळवून बनवली जाते. मोरिंगा पावडरच्या गोळ्या देखील उपलब्ध आहेत ज्या पौष्टिक पूरक म्हणून देखील वापरल्या जातात. शेवग्याला खूप आरोग्यदायी मानले जाते, अनेक वर्षांपासून. वर्षानुवर्षे, शेवग्याची पाने औषधी वनस्पती म्हणून वापरली जात आहेत. आपल्याला शेवग्याच्या फायद्यांबद्दल माहिती मिळेल म्हणजेच मोरिंगा सर्वप्रथम आपण मोरिंगा पावडरचे पौष्टिक मूल्य जाणून घेऊ. १ चमचा पावडर ९ किलो कॅलरी ऊर्जा, १ ग्रॅम कार्बोहायड्रेट, १ ग्रॅम प्रथिने १ ग्रॅम फॅट्स मोरिंगा पावडर वजन कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. आणि अनेक रोगांमध्ये फायदेशीर आहे. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी मोरिंगा पावडरचे सेवन करावे. मोरिंगा पावडरमध्ये कार्बोहायड्रेट, प्रथिने, चरबी, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे अ, क आणि बी कॉम्प्लेक्स आढळतात. १ चमचा मोरिंगा पावडर १ मल्टीविटामिन कॅप्सूलच्या समतुल्य आहे. मोरिंगा पानांमध्ये प्रीट्रिग्रोस्पारविन नावाचा पदार्थ असतो, जो बॅक्टेरिया प्रतिबंधक म्हणून काम करतो.
म्हणूनच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मोरिंगा पावडर खूप फायदेशीर आहे. तर पौष्टिक मूल्यांबद्दल माहिती अशी होती, मोरिंगा पावडर सर्व पौष्टिक मूल्यांनी परिपूर्ण आहे. आपण पाहिल्याप्रमाणे, मोरिंगा पावडरमध्ये कॅल्शियम, आयन, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, सी भरपूर प्रमाणात असते. उदाहरणार्थ, गाजरमध्ये व्हिटॅमिन ए असते, दुधात कॅल्शियम असते, पालकात आयर्न असते. तर आपण या गोष्टी मोरिंगा पावडरच्या तुलनेत पाहतो.
ज्यांना अशक्तपणा आहे, त्यांनी मोरिंगा पावडर घ्यावी आता आपण पाहिले की मोरिंगामध्ये कोणते जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, चला जाणून घेऊया की वेगवेगळ्या आजारांवर मोरिंगा वापरण्याचे फायदे काय आहेत. १- रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. शेवग्याच्या पानांचा रस आतड्यांसंबंधी दुखापत बरे करण्यासाठी फायदेशीर आहे.
ज्यांना वारंवार डोकेदुखी होते त्यांच्यासाठी हे मदत करते. शेवग्याच्या पानांच्या रसात चिमूटभर मिरची पावडर घाला आणि ते प्या. मोरिंगा आम्लता संबंधित समस्या कमी करण्यास मदत करते. केसांमध्ये कोंडा असल्यास, शेवग्याच्या पानांचा रस कोंडा कमी करण्यास मदत करतो शेवग्याच्या पानांचा रस कोंडा कमी करण्यास मदत करतो तोंडाचे अल्सर, घशाची सूज आणि खाज कमी करण्यासाठी शेवग्याची पावडर फायदेशीर आहे. अपचन, गॅस, तोंडाची चव बिघडणे, कुपोषण इत्यादींमध्ये हे फायदेशीर आहे.