अमरावती भंडारा वाशिम मागच्या काही दिवसात राज्यभरात ठीक ठिकाणी महिलांची आंदोलन पाहायला मिळाली. अमरावतीमध्ये शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढत संताप व्यक्त केला. भंडारा जिल्ह्यात चिडलेल्या महिलांनी थेट मुंबई कोलकत्ता राष्ट्रीय महामार्ग अडवत आंदोलन केलं वाशिम जिल्ह्यातही वारंवार विनंती करून जिल्हाधिकाऱ्यांनी भेट नाकारल्यामुळे महिला आक्रमक झाल्या आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीला घेराव घातला.
या सर्व ठिकाणी महिला एवढ्या आक्रमक झाल्या याचं कारण म्हणजे सरकारच्या योजनेचे थकलेले पैसे. ही योजना म्हणजे अर्थातच लाडकी बहिण योजना महाराष्ट्र सरकारन 2024 च्या विधानसभा निवडणुकी आधी लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेला आता एक वर्ष होऊन गेलाय पण अलीकडे या योजनेच्या लाखो लाभार्थी महिलांना त्यांचे पैसेच मिळाले नाहीत.त्यामुळे महिला आक्रमक झाल्यात. पण असं काय झालं ज्यामुळे लाखो महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले नाहीत. ही योजना थांबवण्यात आली आहे का? नेमका मॅटर काय आणि महिलांना पैसे कधी मिळणार?
राज्यातल्या लाखो महिलांना 2024 पासून लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो. या योजने अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळते. पण मागच्या डिसेंबर महिन्यापासून अनेक महिलांचे लाडक्या बहिणीचे पैसे आले नव्हते. अनेक महिलांचा तर नोव्हेंबर महिन्यापासूनचा हप्ता थकलेला होता. त्यामुळे आता दोन ते तीन महिन्यांचे पैसे महापालिका निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजे 14 जानेवारीला एकत्रित बँक खात्यात जमा होणार असं म्हटलं जात होतं या संदर्भात अनेक बातम्याही आल्या होत्या.
लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीला मोठी भेट मिळेल असं म्हटलं जात होतं पण तसं काहीच घडलं नाही. निवडणुकी आधी सुद्धा लाडक्या बहिणींचे थकलेले पैसे आले नाहीत. त्यामुळे राज्यात ठीक ठिकाणी महिला आक्रमक झाल्या. खरं तर सरकारन सप्टेंबर महिन्यात लाडकी बहिण योजनेसाठी ई केवायसी अनिवार्य केली होती. या अंतर्गत या योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना दोन महिन्यांच्या आत म्हणजेच डिसेंबर पर्यंत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार होती. त्यांची ई केवायसी झाली नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही अशीही चर्चा रंगली होती. पण ई केवायसी साठी आम्हाला वेळ मिळाला नाही सरकारने ई केवायसी ची वेबसाईट आठ दिवसांमध्ये बंद केली त्यामुळे आम्ही ई केवायसी करू शकलो नाही असा आरोप अनेक महिलांनी केला.
केवायसी करूनही हप्ता मिळाला नाही?
पण कित्येक महिला अशा होत्या ज्यांना ई केवायसी करूनही हप्ता मिळाला नाही त्यामुळे अनेक ठिकाणी महिला आक्रमक झाल्या. आता नेमकं काय घडलं ई केवायसी केलेल्या लाडक्या बहिणींचे पैसे कशामुळे थकले ते पाहू सरकारने या योजनेत अनेक अपात्र लोकांचा समावेश झाल्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया राबवली होती. या प्रक्रियेत पात्र महिलांना काही प्रश्न विचारण्यात आले होते पण या प्रश्नांमुळे सर्व घोळ झाला.
ई केवायसी फॉर्म मधला एक प्रश्न असा होता ज्यात दोन नकारात्मक शब्दांचा वापर करण्यात आला होता. यामुळे अनेक महिलांचा गोंधळ उडाल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं इ केवायसी फॉर्म मधला हा प्रश्न होता तुमच्या घरातले कोणी सरकारी नोकरीत नाही ना या ठिकाणी लाभार्थी महिलांनी नाही असं उत्तर देणं अपेक्षित होतं पण या गोंधळात टाकणाऱ्या वाक्यरचनेमुळे अनेक महिलांनी या प्रश्नाला होय असं उत्तर दिलं अशा महिलांची संख्या जवळपास 24 लाखांच्या आसपास असल्याचं समोर आलय पण याचा अर्थ काय काढण्यात आला तर या 24 लाख महिलांच्या कुटुंबातला किमान एक सदस्य सरकारी कर्मचारी आहे. त्यामुळे कम्प्युटर प्रोग्रामन आपोआप या महिलांना हप्ता थांबवला असं महिला आणि बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं.
लाडक्या बहिणींचे थकलेले हप्ते मिळू शकणार आहेत:
आता ई केवायसी केल्यानंतरही अनेक महिलांचे 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाले नाहीत. यामुळे राज्याच्या वेगवेगळ्या भागातून तक्रारी यायला लागल्या. राज्यभरातल्या अनेक जिल्ह्यांमधून या तक्रारी समोर आल्या. तक्रारी वाढल्यानंतर महिला आणि बालकल्याण विभागाने डेटाची तपासणी केली यात आढळून आलं की महाराष्ट्रात निम सरकारी संस्था आणि महामंडळांचे कर्मचारी मिळून एकूण आठ ते नऊ लाख सरकारी कर्मचारी आहेत पण ई केवायसी फॉर्म मध्ये तब्बल 24 लाख महिलांनी या प्रश्नाचे उत्तर हो असं दिलं होतं. हे प्रकरण समोर आल्यानंतर याची दखल घेत महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक्स वर माहिती दिली की या सर्व लाभार्थ्यांची आता प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे.
यासाठी राज्यभरात सुमारे एक लाख अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सेविका घरोघरी जाऊन संबंधित महिला खरोखरच पात्र आहेत का याची खात्री करतील आणि त्यानंतरच त्यांचे मानधन पुन्हा सुरू केले जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. लाडकी बहिणी योजनेसाठी राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून महिला आणि बालकल्याण विभागाला 393.25 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. यासोबतच सामाजिक न्याय विभागाने या योजनेसाठी 2025-26 या आर्थिक वर्षात 3960 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या निधीमुळे आता लाडक्या बहिणींचे थकलेले हप्ते मिळू शकणार आहेत.
थकलेले पैसे कधीपर्यंत मिळतील?
आता हे थकलेले पैसे कधीपर्यंत मिळतील तर माध्यमांमधल्या बातम्यानुसार पुढच्या महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. शिवाय ज्या महिलांचे नोव्हेंबर पासूनचे पैसे थकलेले आहेत त्या महिलांच्या बँक अकाउंट मध्येही एकत्रित सर्व रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबतच नोव्हेंबर आणि डिसेंबरची थकीत रक्कम म्हणजेच एकूण 4500 जमा होण्याची शक्यता आहे. पण याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
अपात्र लाभार्थ्यांकडून पैशांची वसूली होणार का?
या ठिकाणी एक प्रश्न महत्त्वाचा आहे तो म्हणजे या योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांकडून पैशांची वसूली होणार का? तर राज्य सरकारकडून सध्या या योजनेच्या सुमारे 2.25 कोटी लाभार्थ्यांसाठी दर महिन्याला 3700 कोटी रुपये वितरित केले जातात. मात्र महिलांसोबतच अनेक पुरुष आणि सरकारी कर्मचारी सुद्धा या योजनेचा लाभ घेतल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर ई केवायसी मोहीम हाती घेण्यात आली.
आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिलेल्या लेखी उत्तरात म्हटलय की पडताळणी मोहिमेत लाडकी बहिण योजनेचा गैरवापर झाल्याच उघड झालय. केवळ महिलांसाठी असलेल्या या योजने अंतर्गत 14298 पुरुषांनी लाभ घेतल्याच आढळून आलं तर 1500 हून अधिक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजने अंतर्गत मदत घेतल्याचं समोर आलय. त्यामुळे आता ज्या पुरुषांनी आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला अशांकडून आता वसुलीची प्रक्रिया सुरू झाली असल्याचं सरकारने स्पष्ट केलय पण सध्या तरी लाडक्या बहिणींचे थकलेले पैसे आणि त्यानंतर महिलांनी राज्यात ठिकठिकाणी सुरू केलेल आंदोलन चर्चेत आलय.
आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकी आधी महिलांना पैसे मिळणार असल्याचं बोललं जातय आता खरंच असं होतंय का आणि जर झालं तर याचा परिणाम निवडणुकीवरती होतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल.

