आजच्या काळात मुली शिक्षणात, नोकरीत, व्यवसायात, खेळात आणि समाजकारणातही आघाडीवर आहेत. सरकारच्या योजना कायदे आणि समाजाची बदललेली मानसिकता यामुळे मुलगी जन्माला आली म्हणजे चिंता नाही तर अभिमान वाटायला हवा. विचार बदलले तरच खऱ्या अर्थान समाज पुढे जाईल. मुलगा मुलगी समान आहेत. दोघेही घराचं आणि समाजाच भविष्य आहेत. हेच या सगळ्यातून लक्षात ठेवायला हवं.
मुलगा झाला पाहिजे असा अठ्ठास असतो पण आता हेच आपण बदलायला हवं कारण वंशाला दिवा म्हणजे फक्त मुलगाच असतो असं नाही तर संस्कार कर्तुत्व आणि माणुसकी जपणारी मुलगी सुद्धा तितकीच घर उजळवते फक्त तिला गरज असते योग्य वेळी योग्य मार्गदर्शनाची आणि सपोर्टची जर तुम्ही गरीब असाल आणि तुमच्या घरी मुलगी जन्माला आली तर वाईट वाटून घेण्यापेक्षा तिला लक्ष्मी समजून तिला शिकवा आणि तिच्या पायावर उभं करा आणि यासाठी आर्थिक मदत म्हणून तुम्ही खालील योजनांचा फायदा घेऊ शकता.
सुकन्या समृद्धी योजना:
पहिली योजना आहे सुकन्या समृद्धी योजना ही सरकारची स्मॉल डिपॉझिट स्कीम आहे मुलींसाठी ही योजना सगळ्यात लोकप्रिय असून सरकारन बेटी बचाव बेटी पढाव या अंतर्गत ही योजना सुरू केली होती. या योजनेनुसार पालक आपल्या मुलींच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नाच्या खर्चासाठी पैसे जमा करू शकतात. या योजनेत मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत परतावा म्हणून मोठी रक्कम मिळू शकते. सध्याच्या नियमानुसार जर मुलगी लहान असताना यात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर 15 वर्ष गुंतवणूक करता येते.
सुकन्या समृद्धी योजनेवर सध्या 8 टक्के इतका व्याज दर दिला जातोय. या योजनेत गुंतवणूक करताना जो व्याजदर असतो तोच पूर्ण कालावधी संपेपर्यंत मिळतो. या योजनेत मिनिमम 250 रुपये तर मॅक्झिमम 1.5 लाख पर्यंत रक्कम प्रत्येक महिन्याला जमा करू शकता आणि मुलीच्या वयाच्या 21 वर्षानंतर ही रक्कम काढता येते. या योजनेसाठी मुलीची पात्रता 10 वर्षांच्या आत असावी लागते. एका कुटुंबातील दोनच मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकतो.
अर्जप्रक्रिया व महत्वपूर्ण कागदपत्रे:
या योजनेचा फॉर्म तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये भरू शकता. त्यासाठी मुलीचे जन्म प्रमाणपत्र, पालकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा आणि खात उघडण्यासाठी किमान 250 रुपये लागतात.
माझी कन्या भाग्यश्री योजना:
दुसरी योजना आहे माझी कन्या भाग्यश्री योजना ही योजना मुलींच्या जन्माच स्वागत करण्यासाठी आणि आर्थिक पाठवळ यासाठी तयार केली आहे. माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी असणं आवश्यक आहे. या योजने अंतर्गत आई आणि मुलीच्या नावात बँकेत संयुक्त खातं उघडल जातं. त्याचबरोबर एक लाख रुपयांचा अपघात विमा मिळतो आणि 5000 रुपयांचा ओव्हरड्राफ्ट मिळतो. याशिवाय मुलींच्या जन्मानंतर पालकांना नसबंदी करून घ्यायची असेल तर त्यांना 50,000 रुपये मिळतात. दोन मुलींच्या जन्मानंतर नसबंदी केली तर दोन्ही मुलींच्या नावावर 25-25,000 रुपये दिले जातात आणि तिथून पुढे मुलींना शिक्षणासाठी हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात.
अर्जप्रक्रिया:
योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज भरता येईल.
महत्वाचे कागदपत्र:
या योजनेसाठी मुलींचे जन्म प्रमाणपत्र, आई-वडिलांचे आधार कार्ड, कुटुंबाचे रेशन कार्ड, बँक खात तपशील पासबुक झेरॉक्स, शालेय प्रवेश घेतल्याच प्रमाणपत्र आणि पासपोर्ट साईज फोटो ही कागदपत्र लागतील.
लेक लाडकी योजना:
तिसरी योजना आहे लेक लाडकी योजना या योजनेमध्ये मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी टप्पेटप्प्याने आर्थिक मदत मिळते. या योजनेमध्ये मुलीच्या जन्मावेळी 5000 रुपये मिळतात. त्यानंतर मुलगी पहिलीत गेल्यावर 6000 रुपये सहावीत गेल्यावर 7000 रुपये 11 वीत गेल्यावर ₹8000 रुपये मिळतात आणि मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये दिले जातात म्हणजे एकूण एक लाख रुपये मिळतात. या योजनेचा लाभ घरातील फक्त दोन मुलींनाच मिळू शकतो. यासाठी अट अशी आहे की कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 1 लाखाच्या आत असायला हवं आणि कुटुंब नियोजन पाळलेलं असावं.
अर्ज कसा करायचा?
तर तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकड तुम्हाला या योजनेचा अर्ज करता येईल.
महत्वाचे कागदपत्र:
यासाठी मुलींच्या जन्माचा दाखला, आधार कार्ड, पालकांचे आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, रेशन कार्ड आणि कुटुंब नियोजन, शस्त्रक्रिया प्रमाणपत्र ही कागदपत्र लागतात.
बालिका समृद्धी योजना:
चौथी योजना आहे बालिका समृद्धी योजना. आजही देशाच्या अनेक भागात मुलीचा जन्म आनंदाने साजरा केला जात नाही. या योजनेचा उद्देश मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणं त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलणं आणि बालविवाह सारख्या वाईट प्रथांपासून त्यांच संरक्षण करणं असा आहे. या योजने अंतर्गत गरीब कुटुंबातील मुलींना जन्मापासून ते दहावीपर्यंतच्या शिक्षणा दरम्यान आर्थिक मदत मिळते.
मुलगी जन्माला येताच कुटुंबाला 500 रुपयाची रक्कम दिली जाते. त्यानंतर दरवर्षी वर्गानुसार 300 रुपये ते 1000 रुपयांची स्कॉलरशिप थेट मुलींच्या बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा होते. विशेष म्हणजे जर मुलीच लग्न 18 वर्षांपूर्वी झालं नसेल तर 18 व्या वर्षी तिला मॅचुरिटी रक्कम काढण्याचा अधिकार आहे. ही रक्कम तिला अभ्यासासाठी किंवा कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी वापरली जाऊ शकते. शाळेची फी भरताना पुस्तक गणवेश आणि इतर खर्चासाठी या पैशांचा वापर होऊ शकतो.
सीबीएससी उडान योजना:
पाचवी योजना आहे सीबीएससी उडान योजना ही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मुलींच्या हितासाठी चालवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. ही योजना 2014 मध्ये सुरू झाली. सीबीएससी उडान योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे तांत्रिक शिक्षणाच्या क्षेत्रात मुलींचा सहभाग वाढवणं या योजनेत 11 वी आणि बारावी इयत्तेतील मुलींसाठी मोफत अभ्यासक्रम साहित्य आणि ऑनलाईन संसाधने दिली जातात.
अकरावी आणि बारावी इयत्तेतील मुलींसाठी आठवड्याच्या शेवटी ऑनलाईन आणि ऑफलाईन वीकेंड क्लासेस असतात. मुलींच्या प्रगतीच सातत्यपूर्ण निरीक्षण केल जातं या योजनेचा लाभ घेण्यासाठी इयत्ता दहावी मध्ये 70% पेक्षा जास्त मार्क्स असणं गरजेच आहे तर तुमचं या योजनेमध्ये सिलेक्शन होऊ शकतं त्याचबरोबर विज्ञान आणि गणितात किमान 80% गुण मिळाले पाहिजेत.
अर्ज कसा करायचा?
या योजनेचा अर्ज कसा करायचा तर सीबीएससी उडान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे तिथे तुम्ही हा अर्ज करू शकता.
महत्वाची कागदपत्रे:
सीबीएससी उडान योजनेसाठी अर्ज करताना राहण्याचा पुरावा, आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, जातीचा दाखला, वयाचा दाखला, दहावीची गुणपत्रिका आणि दहावीच प्रमाणपत्र ही कागदपत्र लागतात.
तर या होत्या मुलीसाठीच्या पाच योजना तुम्हाला मुलगी झाली तर या योजनाचा नक्की लाभ घ्या…
