तुमच्याही घरी मुलगी जन्माला आली असेल तर तुम्हाला तब्बल एक लाख रुपये मिळू शकतात तुम्ही ऐकताय ते अगदी खर आहे तुमच्या लाडक्या लेकीला एक लाख रुपये मिळतायत आणि तेही आपलं महाराष्ट्र सरकारच देतय त्यामुळे गॅरंटी तर आहेच लाडकी बहिण योजनेप्रमाणेच ही राज्य सरकारची महत्त्वाची आणि अत्यंत फायदेशीर योजना आहे जिचं नाव आहे लेक लाडकी योजना मुलींच्या जन्मापासून त्यांच्या शिक्षणापर्यंत म्हणजे अगदी मुलगी 18 वर्षांची होईल पर्यंत सरकार तुम्हाला पैसे देतं मुलींच्या उज्जवल भविष्यासाठी ही योजना राज्य सरकारने सुरू केली आहे कदाचित तुम्ही या योजनेच नाव ऐकलं सुद्धा असेल पण नेमकी ही योजना काय आहे खरच एक लाख रुपये मिळतात का त्यासाठी काय करायचं असतं त्यासाठीच्या अटी कोणत्या आहेत आणि पैसे मिळवण्यासाठीची प्रक्रिया नेमकी कशी आहे असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर लगेच जाणून घेऊयात..
योजनेचा मुख्य आणि स्पष्ट उद्देश:
तुमच्या लाडक्या लेकींसाठी राज्य सरकारन लेक लाडकी योजना सुरू केली आहे. लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली एक महत्त्वाची सामाजिक योजना आहे. मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षण तसच त्यांच्या विकासासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. मुलींचा जन्मदर वाढवणं त्यांच शिक्षण सुरू ठेवणं आणि त्याचसोबत मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणं असा या योजनेचा मुख्य आणि स्पष्ट उद्देश आहे.
पाच टप्प्यांमध्ये हे पैसे दिले जातात:
मुलीच्या जन्मापासून पाच टप्प्यांमध्ये हे पैसे दिले जातात. जसं की मुलगी जन्माला आल्यानंतर आधी 5000 रुपये दिले जातात. मग जेव्हा मुलगी पहिलीत जाईल तेव्हा 6000 रुपये त्यानंतर इयत्ता सहावीत गेल्यावर 7000 मिळतात आणि शाळेनंतर महाविद्यालय शिक्षणाला सुद्धा आर्थिक सहाय्य केलं जातं. जेव्हा मुलगी अकरावीत जाते तेव्हा 8000 रुपये दिले जातात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलगी 18 वर्षांची झाली की तेव्हा तब्बल 75000 रुपये इतकी मोठी रक्कम दिली जाते. अशाप्रकारे एकूण एक लाख 1 हजार रुपये इतकी आर्थिक मदत मुलीला मिळते.
आर्थिक मदत कश्यासाठी दिली जाते?
ही रक्कम मुलीच्या शिक्षणासाठी कौशल्य विकासासाठी किंवा तिच्या भविष्यातील स्वप्नांसाठी उपयोगी पडू शकते. पण फक्त पैसे देऊन थांबायचं नाही तर पालकांना मुलीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त करायचं जर मुलीने शिक्षण अर्धवट सोडलं तर पुढच्या टप्प्याची रक्कम मिळत नाही. त्यामुळे पालकांनी मुलीच्या शिक्षणाकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं हा या योजनेचा एक महत्त्वाचा संदेश आहे.
महत्वाची कागदपत्रे:
- जन्म प्रमाणपत्र,
- रेशन कार्ड,
- आधार कार्ड,
- बँक पासबुक
अशी महत्त्वाची कागदपत्र लागतात.
अर्जप्रक्रिया:
अर्ज कसा कराल तर तेही सांगते सोपं आहे. ऑनलाईन अर्ज तर करू शकताय पण त्याचसोबत अंगणवाडी किंवा सेतू कार्यालया मार्फत सुद्धा अर्ज करता येतो. अंगणवाडी केंद्रात गेल्यावर आधी अंगणवाडी सेविकेकडून तुम्हाला लेक लाडकी योजनेचा फॉर्म घ्यायचा आहे.
आता त्या फॉर्ममध्ये दिलेली संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे. जसं की तुमचं नाव, मुलीचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर आणि बँकेची माहिती इत्यादी मग माहिती भरल्यानंतर अर्जासोबत कागदपत्र सुद्धा जोडायची आहेत. त्यानंतर हा अर्ज अंगणवाडी सेविकेजवळ जमा करायचा आहे. अर्ज जमा केल्यावर तुमचा अर्ज अंगणवाडी सेविकेद्वारे ऑनलाईन केला जाणार आहे आणि त्याची पावती सुद्धा तुम्हाला दिली जाईल. फक्त ती पावती सांभाळून ठेवावी लागेल. इतकी सोपी ही अर्ज प्रक्रिया आहे.
महत्वपूर्ण अटी:
आता अटी कोणत्या तेही समजून घेऊयात. लेक लाडकी योजना ही महाराष्ट्रात राहणाऱ्या मुलींसाठी असून 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींनाच याचा लाभ घेता येतो. प्रामुख्याने गरीब कुटुंबातील मुलींसाठी ही योजना आहे. केवळ एक किंवा दोन मुलींसाठीच ही योजना लागू होते. एक मुलगा आणि एक मुलगी असेल तरी फक्त मुलीलाच याचा लाभ मिळेल.
- प्रामुख्याने गरीब कुटुंबातील मुलींसाठी ही योजना आहे
- लाभार्थींकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असायला हवं.
- कुटुंब महाराष्ट्रात राहणारच असावं
- तसच मुलीच बँक खात सुद्धा महाराष्ट्रातलच असावं
- कुटुंबाच वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा जास्त नसावं
यासोबतच ही योजना मुलीच्या जन्मापासून ते ती 18 वर्षांची होईपर्यंत चालते आणि तिचा लाभ हा टप्प्याटप्प्यात मिळतो पण जर मुलींना शिक्षण अर्धवट सोडलं तर मात्र पुढल्या टप्प्याची रक्कम मिळत नाही त्यामुळे पालकांनी मुलीच शिक्षण पूर्ण होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे शासनानं ही योजना सुरू करून सामान्य माणसाला दिलासा दिलाय. विशेष म्हणजे मुलगी ही ओझ नाही तर ती कुटुंबाचा अभिमान आहे, सन्मान आहे हेच या योजनेतून ठामपणे सांगितलं जातय. आपण नेहमीच म्हणतो की एक मुलगी शिकली की कुटुंब शिकत आणि शिक्षित कुटुंब म्हणजे प्रगत समाज असतो हेही आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि ही लेक लाडकी योजना मुलींच्या उज्जवल भविष्यासाठी उचललेलं एक मजबूत पाऊल आहे.
त्यामुळे या योजनेची माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणं पालकांना जागरूक करणं आणि प्रत्येक मुलीला शिक्षणाची संधी मिळवून देणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

