अंतराळवीर शुभांशू शुक्ला शास्त्रीय प्रयोग करून पृथ्वीवर परतले..!
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर १८ दिवसांचा मुक्काम करून अत्यंत आनंदी मुद्रेने अंतराळवीर शुभांशू शुक्ला मंगळवारी पृथ्वीवर परतले. ही अंतराळ सफर भारताच्या गगनयान मोहिमेसाठी अतिशय महत्त्वाची ठरली आहे. आपले अंतराळवीर स्वतः तयार केलेल्या यानातून अंतरिक्षात पाठविण्याचे ध्येय भारताने गगनयानच्या रुपाने उराशी बाळगले असून, त्यासाठी शुक्ला यांचे अनुभव अतिशय मोलाचे ठरणार आहेत. राकेश शर्मा यांच्या १९८४मधील सोव्हिएत रशियन…