पालक भाजी मध्ये जीवनसत्व अ ब क आणि तसेच प्रोटीन सोडियम कॅल्शियम फॉस्फरस क्लोरीन आणि लोह असते पालकची भाजी नियमित खाल्ल्याने शरीरातील रक्ताची आणि हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते चला तर मग जाणून घेऊयात पालक भाजीचे आरोग्यदायी फायदे पालकमध्ये लोह कॅल्शियम फॉस्फरस प्रथिने खनिजे तंतुमय आणि पृष्ठमय पदार्थ अ, ब आणि क जीवनसत्व फॉलिक ऍसिड भरपूर प्रमाणात असते. पालक या भाजीमध्ये रक्तवर्धक गुणधर्म असल्याने रक्तकन निर्माण होण्याची प्रक्रिया लगेच सुरू होते तसेच पालक रक्त शुद्ध होऊन आणि ही मजबूत बनवतात पालकमध्ये रक्तशोधक गुणधर्म असल्यामुळे यकृताचे विकार कावीळ पित्त विकार यामध्ये उपयुक्त आहे.
पालक हे आरोग्य बरोबरच केसांसाठी ही चांगली असते केस गळतीमुळे त्रस्त असलेल्यांनी त्यांच्या आहारात पालकचा समावेश केला पाहिजे कारण पालक शरीरात लोहाची कमतरता भरून केस गळणे कमी करते दररोज पालकचा रस प्यायल्याने चेहरा चमकदार बनतो आणि त्वचाही हायड्रेटही राहते पालकात फॉलिक ऍसिड आणि कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त असते हे दातांसाठी खूप महत्त्वाचे आहे कच्चा पालक पाणी चघळल्याने पायरी यापासून आराम होतो. पालकमध्ये विटामिन क देखील असते ज्यामुळे हाडे मजबूत करण्यास मदत होते हे हाड मजबूत करते आणि शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर करते पालकाच्या रसात गाजराचा रस सेवन केल्यास चरबी कमी होते किंवा रसामध्ये लिंबाचा रस पिल्याने लठ्ठपणा दूर होतो. माती खाल्ल्याने मुलांचे कोट वाढत असेल म्हणून दिवसातून दोन वेळा पालकचे सुख दिल्याने पोट हलके राहते आणि बाळही तंदुरुस्त राहते.
सामग्री:
- पालक – 100 ग्रॅम
- गव्हाचे पीठ – 2 कप
- दही -2 चमचे
- मीठ – चवीनुसार
- हिरव्या मिरच्या – 4 ते 5
- लसूण पाकळ्या – 7 ते 8 पाकळ्या
- बडीशेप – एक छोटा चमचा
- जिरे – एक छोटा चमचा
- धने – एक छोटा चमचा
- ओवा – एक छोटा चमचा
कृती:
एका पॅनमध्ये एक लिटर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला उकळी आली की यामध्ये साधारण अर्धा जोडी पालक स्वच्छ धुऊन यामध्ये घालायची आहे देठ फार नाही घ्यायचे कोवळे देठ असेल तरच वापरायचे साधारण दोन ते तीन मिनिटे पालक यामध्ये उकळून घ्यायची त्यानंतर गॅस बंद करून पालक नरम पडली की आपल्याला लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे जर तुम्हाला करायला वेळ असेल तर तुम्ही ही पालक थंड पाण्यामध्ये घालून ठेवू शकता त्यानंतर यामध्ये चार ते पाच तिखट वाल्या हिरव्या मिरच्या आणि सात आठ लसूण पाकळ्या घालून पेस्ट तयार करून घ्यायची आहे. परातीमध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलेला आहे यामध्ये दोन चमचे दही दही घातल्यामुळे पराठे जे आहे शेवटपर्यंत सॉफ्ट राहतात वरतून चवीनुसार मीठ इथे मी धने जिरे बडीशेप आणि आणि ओवा हे हलकेसे भाजून घेतले आहे, आणि त्याची पूड तयार करून घेतलेली आहे तर एक चमचा ती पूड घातलेली आहे यामुळे पराठ्यांना फ्लेवर खूप छान येतो. सोबतच जी प्युरी तयार करून घेतलेली आहे ती घालायची आहे हे अगोदर असंच मिक्स करून घ्यायचं गरज पडल्यास पाण्याचा वापर करू शकता सेमी सॉफ्ट गोळा असायला हवा त्यानंतर वरतून एक चमचा तेल घालून आणखीन चांगल्यापैकी मळून साधारण 10 मिनिटे रेस्ट करण्याकरिता ठेवायचं आहे.
छोटे छोटे एक पराठा बनवता येईल असे गोल गोल गोळे बनवून घ्यायचे आहे. आज आपण चौकोणी असा पराठा बनवणार आहे, तुम्हाला गोल, त्रीकोणी किंवा आणखीन कोणता शेप द्यायचा असल्यास तो तुम्ही देऊ शकता. सगळे गोळे तयार करून झाले की गव्हाच्या पिठामध्ये घोळून स्क्वेअर शेपची पारी लाटून घ्यायची आहे स्क्वेअर शेपची पारी लाटताना लाटणं जे आहे एकाच दिशे मध्ये फिरवायचं आहे एक वेळा वर्टिकल डायरेक्शन लाटला की पराठा 90 डिग्री ने चेंज करून पुन्हा वर्टिकल डायरेक्शन वर लाटायचा आहे म्हणजे त्याला चौकोणी शेप येतो.
त्यानंतर एक चमचा तेल घालून तेल लावून घ्यायचं आहे आणि फोल्ड करून घ्यायचं आहे, फोल्ड करताना सुद्धा थोडसं तेल लावायचं जसं आपण पॉकेट तयार करतो त्याच पद्धतीने फोल्ड करायचं आहे. तर इथे आपण याला स्क्वेअर शेप दिलेला आहे आता पुन्हा गव्हाच्या पिठामध्ये घोळून पराठा लाटून घ्यायचा आहे लाटताना पुन्हा तीच स्टेप फॉलो करायची आहे एकाच डायरेक्शन मध्ये तुम्हाला लाटायचा आहे 90 डिग्री ने चेंज करायचा आणि पुन्हा त्याच डायरेक्शन मध्ये लाटायचा तर अशा पद्धतीने लाटला की स्क्वेअर शेप येतो तर इकडे तवा गरम करून घेतलेला आहे, त्यावर पराठा घातलेला आहे पराठा शेकतोय तोपर्यंत दुसरा पराठा लाटून घ्यायचा थोडा वेळ पराठा शिजला की पलटी करून घ्यायचा खालची बाजू आणखीन एखादा मिनिट भाजून घ्यायची आणि त्यानंतर तेल घालून दोन्ही साईडने आपल्याला भाजून घ्यायचा आहे गॅसचा फ्लेम मिडीयम ठेवायचा हे पराठे छान फुगतात पण आणि गरमागरम खायला तर खूप छान लागतात डब्याल्या सुद्धा नेऊ शकता, कारण टिफिनवर सुद्धा तेवढेच छान लागतात तर अशाच प्रकारे सर्व पराठे इथे मी करून घेतोय
या पराठ्यामध्ये आपण खूप कमी साहित्य वापरलेलं आहे या पराठ्यांची जी चव आहे पालक हिरवी मिरची आणि लसूण वर आहे आणि जो फ्लेवर आहे जी पूड आपण तयार करून घातलेली आहे ज्यामध्ये धने जिरं बडीशेप आणि ओवा आहे त्यामुळे एक विशिष्ट फ्लेवर येतो तर एवढंच साहित्य घालायचं त्यामुळे पराठे छान होतात आणि याच पिठापासून तुम्ही पुऱ्या सुद्धा करू शकता तेवढ्याच चविष्ट लागतात तर इथे आपले हे पराठे तयार आहे हे पराठे तुम्ही असेच खाऊ शकता कारण असेच छान लागतात किंवा मग दह्या बरोबर किंवा केचप बरोबर किंवा लोण्याबरोबर सुद्धा खाऊ शकता हवं असल्यास तुम्ही यामध्ये पालकासोबत थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालू शकता त्याने सुद्धा एक वेगळी आणि छान चव येते
निष्कर्ष:
- हाडाच्या आरोग्यासाठी पालक खाणे खूप उपयुक्त आहे पालक हाडांना मजबुती देते.
- हिवाळ्याच्या मोसमात लोकांना सर्दी खोकल्याचा त्रास होतो या समस्येवर पालक फायदेशीर.
- पालक खाल्ल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढते त्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.
- नियमित पालक खाल्ल्यास उच्च रक्तदाब सामान्य ठेवण्यास पालक मदत करते.
- पालक तुमचे वजन कमी करण्यात उपयुक्त ठरू शकते.
- पालकमध्ये वजन कमी करणारे गुण असतात पालक केसांना मजबूत बनवते तसेच केस तुटण्यापासून रोखते केसांना चमकदार बनवते.
- पालक मधुमेह रुग्णासाठी एक उत्तम पर्याय आहे.
- पालक रक्तातील साखर नियंत्रित ठेवते नियमितपणे पालक खाणे आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करते.