या रानभाज्या तुम्ही खाल्ल्या का ?
पावसाळ्यात सगळीकडे रानभाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. बहुतांश रानभाज्यांतून विविध पोषक घटक मिळतात. त्यामुळे रानभाज्या खाल्ल्याने आरोग्यही चांगले राहते. त्यामुळे आरोग्याचा हा ठेवा चुकवू नये, असाच आहे.
या रानभाज्या खा, ठणठणीत राहा..!
• ठणठणीत राहा…!
शेवगा : अनेक फायदे, शेवगा सर्वाधिक आढळणारी वनस्पती आहे. मधुमेह, हृदय, संधिवात, बद्धकोष्ठतेपासून शेवगा आराम देतो.
• नेत्रविकार दूर ठेवण्यास :
अंबाडी : या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए, लोह, झिंक भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे ही भाजी नेत्रविकार दूर करण्यासह अशक्तपणा कमी करते.
• चरबी कमी करण्यासाठी :
करटोली : यामध्ये प्रोटिन्स, आयर्न, अँटिऑक्सिडंटस, फायबर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
• हृदयरोगाचा धोका कमी :
अळू : यामध्ये व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे हृदयरोगाचा, कर्करोगाचा धोका कमी करतो.
• पाऊस लांबल्याने रानभाज्या लांबल्या :
पाऊस लांबल्यामुळे रानभाज्याही लांबल्या आहेत. काही मोजक्याच रानभाज्या सध्या बाजारात येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
• मूळ चवीला धक्का नको :
रानभाज्यांच्या मूळ चवीला धक्का न लागू देता आणि त्यांच्यातील पोषण मूल्ये कमी न करता रानभाज्या खाल्ल्या पाहिजेत, रानभाज्या बनविताना पुदिना, कैरी, लिंबू टाकून त्यांची पोषण मूल्ये वाढविता येतात. भाज्यांसोबत पोळ्यांऐवजी भाकरी खाणे अधिक आरोग्यदायी असते.
यासारख्या आणखी विविध अपडेट्स साठी sachbaathai.com या संकेतस्थळावर नियमित भेट देत रहा.
खूप सुंदर माहिती…मनापासून धन्यवाद..!