राज्यातील शेतकऱ्यांसाठी २०२६ मध्ये जाहीर होणारी शेतकरी कर्जमाफी योजना अनेकांसाठी दिलासा देणारी ठरणार आहे. मात्र काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्यास लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात. खाली दिलेली महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे.
अनेक शेतकऱ्यांची माहिती अद्याप अपूर्ण किंवा चुकीची असल्यामुळे, पात्र असूनही हजारो शेतकरी कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तात्काळ आवश्यक माहिती अद्ययावत करणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. लाभासाठी पात्र शेतकरीः ५ एकरपर्यंत शेती असलेले शेतकरी नियमित कर्जफेड करणारे किंवा थकबाकी असलेले शेतकरी आधार कार्ड, बँक खाते आणि जमीन रेकॉर्डशी लिंक असलेले शेतकरी मात्र, माहिती अपूर्ण असल्यास नाव यादीतून वगळले जाऊ शकते.
खालील कामे तात्काळ पूर्ण कराः
आधार कार्ड अपडेट आणि लिंकिंग आधार कार्डातील नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक अचूक असावा बँक खात्याशी आणि जमीन रेकॉर्डशी आधार लिंक करा, ७/१२ व ८अ उतारा अपडेट महाभूलेख पोर्टलवरून तुमचा ७/१२ व ८अ उतारा तपासा नाव, क्षेत्र, पीक तपशील अचूक भरलेले असावेत वारस नोंदवावाचा शेतरस्त्यांचावत निर्णय किंवा इतर दुरुस्त्या असल्यास तलाठी किंवा सेटू केंद्रात भेट द्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी तपासा आपले सरकार पोर्टल किंवा संबंधित कृषी विभागाच्या वेबसाइटवर माहिती अपडेट करा आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड, बैंक पासबुक, ७/१२ उतारा स्कॅन करून अपलोड करा.
1) आधार लिंकिंग आणि ई-केवायसी पूर्ण करा:
आपले बँक खाते आणि कर्ज खाते आधार क्रमांकाशी लिंक असणे आवश्यक आहे.
बँकेत जाऊन e-KYC पूर्ण करा
मोबाईल नंबर आधारशी लिंक असावा
2) बँक खात्याची माहिती अपडेट ठेवा:
खाते सक्रिय (Active) असावे
IFSC कोड बरोबर आहे का तपासा
जॉइंट खाते असल्यास आवश्यक कागदपत्रे जमा करा
3) 7/12 उतारा आणि जमीन नोंद तपासा
7/12 व 8A उताऱ्यावर नाव योग्य आहे का पाहा
वारस नोंद (Mutation) पूर्ण झाली आहे का तपासा
पीक नोंद (Crop entry) अपडेट असावी
4) कर्जाची माहिती बँकेत पडताळा
कर्ज रक्कम, खाते क्रमांक तपासा
नियमित/थकीत कर्जाची स्थिती स्पष्ट करा
पुनर्गठित (Restructured) कर्ज असल्यास बँकेकडून लेखी माहिती घ्या
5) ऑनलाईन अर्ज (असल्यास) वेळेत भरा
सरकारकडून ऑनलाईन पोर्टल सुरू झाल्यास:
अधिकृत संकेतस्थळावरच अर्ज करा
चुकीची माहिती भरू नका
अर्जाची पावती जतन करून ठेवा
कोण वंचित राहू शकतात?
चुकीची कागदपत्रे असलेले अर्जदार
आधार/बँक लिंक नसलेले खाते
जमीन नोंद अपूर्ण असलेले शेतकरी
शासनाच्या निकषात न बसणारे कर्ज
शेतकरी कर्जमाफी २०२६ अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी केवळ कागदपत्रे पूर्ण असणे पुरेसे नाही, तर शासनाने घालून दिलेल्या अटी व निकष समजून घेणेही तितकेच आवश्यक आहे. सहसा कर्जमाफी योजना ही पीक कर्ज (Crop Loan) किंवा अल्पमुदतीच्या कर्जासाठी लागू असते. त्यामुळे आपल्या कर्जाचा प्रकार कोणता आहे हे संबंधित बँकेतून स्पष्ट करून घ्या.
काही वेळा कर्जाची रक्कम ठरावीक मर्यादेपर्यंतच माफ केली जाते. उदाहरणार्थ, १ लाख किंवा २ लाख रुपयांपर्यंतची मर्यादा असू शकते. त्यामुळे जास्त कर्ज असल्यास उर्वरित रक्कम भरण्याची तयारी ठेवावी लागते. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन पर अनुदान (Incentive) दिले जाऊ शकते. जर अर्ज प्रक्रियेत नाव यादीत दिसत नसेल, तर तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध असते. ग्रामपंचायत, कृषी विभाग किंवा संबंधित बँकेत लेखी अर्ज देऊन पडताळणी करून घ्यावी.




