शेतकऱ्यांचे रेशन पैसे अखेर जमा सुरू! तुमच्या खात्यात आले का?

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित असलेले शेतकऱ्यांचे राशनचे पैसे अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांना राशनऐवजी दिलं जाणार अनुदान हे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेल्या बऱ्याच दिवसापासून जमा करण्यात आलेल नव्हतं ते अखेर जमा करायला सुरुवात झालेली आहे.

हे अनुदान जमा होत असताना काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून अनुदान कमी आलेले आहे आमच्या खात्यामध्ये तर अनुदान आलंच नाही अनुदान येत तर नेमक ते कोणत्या खात्यामध्ये येत आणि कोणत्या शेतकऱ्यांना हे मिळतं या संदर्भात प्रश्न विचारले जातात आणि याच्याच बद्दलची थोडक्यात माहिती आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

अनुदान कुठे आणि किती मिळणार?

मराठवाडा आणि विदर्भातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये शेतकरी रेशन जे काही आहे केसरी शिधापत्रिका आहे या शेतकऱ्याला अन्नधान्याऐवजी अनुदान द्यायला मंजुरी दिलेली आहे ज्याच्यामध्ये प्रति रेशन कार्ड प्रति लाभार्थी प्रति महिना 170 रुपये एवढं अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये मराठवाड्यातील सर्व जिल्हे अमरावती विभाग याचप्रमाणे नागपूर विभागातील वर्धा जिल्हा अशा 14 जिल्ह्यांमध्ये हे अनुदान दिलं जातं.

याच्यासाठी शेतकऱ्यांना एक अर्ज करण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं. ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून अर्ज करण्यात आलेले आहेत. या अर्ज केलेल्या जे काही कुटुंब असतील या कुटुंबामधील ज्या लाभार्थ्यांची केवायसी झालेली आहे अशा आधार संलग्न झालेल्या लाभार्थ्यांच हे प्रतिमा 170 रुपयाचा अनुदान दिलं जातं. बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांना सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यामध्ये अनुदान क्रेडिट करण्यात आलेल होत पण बरेच सारे लाभार्थी अद्याप देखील हे अनुदान वितरित होण्याच्या प्रतीक्षेत होते 31 डिसेंबर 2025 पर्यंत केवायसी करण्याची तारीख होती बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी करण्यात आलेली होती

याच्यामध्ये केवायसी झालेले जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांचा अनुदान सुद्धा आता 1 जानेवारी पासून वितरित व्हायला सुरू झालेले आहे याच्यामध्ये प्रति लाभार्थी प्रतिमा 170 रुपये याप्रमाणे हे अनुदानदिलं जातं बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांनी यांनी याच्यामध्ये अर्ज केले नव्हते आता ज्यांचे अर्ज अप्रूव् झालेले आहेत त्या तारखेपासून ते पैसे यायला सुरू झालेले आहेत.

अनुदान कोणाच्या खात्यामध्ये जमा होणार?

याचबरोबर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर रेशनवरती महिला कुटुंब प्रमुख असतात यामुळे या रेशनवरती ज्या महिलेचं नाव असेल त्या महिलेच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातात. आता बरेच जण रेशनमध्ये नाव आहे म्हणजे माझ्या खात्यात येणार का असा संभ्रम निर्माण करून घेतात मी माझंच खाते नंबर दिलेला आहे असेही त्या ठिकाणी करतात परंतु हे आधार संलग्न पैसे येत असल्यामुळे डीबीटीने हे अनुदान येत असल्यामुळे कुटुंब प्रमुख महिला लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्येच येत मग आता बरेच जण म्हणतात मग आमच्या आलंच नाही याच्यामध्ये कुटुंब प्रमुखाच जे बँक खातं आधार संलग्न आहे ते बँक खातं बऱ्याच वेळा बंद असतं त्याची केवायसी झालेली नसते किंवा बऱ्याच वेळा या कुटुंबप्रमुख महिलाच्या बँक खात्यालाच आधार लिंक नसतो. अशा अनेक कारणामुळे अनेक लाभार्थ्यांच अनुदान अटकलेलं होतं.

ज्यांचे पैसे आले नसेल त्यांनी पुढील कार्य करावे…

अजून सुद्धा ज्यांच कोणाच अनुदान अटकलेल असेल त्याच्यासाठी सुद्धा हीच कारणं असू शकतात त्याच्यामुळे आपल्या बँक खात्याला आधार लिंक आहे का? कुटुंब प्रमुखाच्या बँक खात्याला आधार लिंक आहे का? आपल्या रेशनची केवायसी झालेली आहे का? रेशनची जर केवायसी झालेली नसेल तर तुम्ही मेरा रेशन प आणि फेस आधार आरडी च्या माध्यमातून किंवा आपल्या जवळच्या जे काही रेशनच दुकान असेल याच्या माध्यमातून केवायसी करू शकता.

याच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर आपलं जे काही बँक खातं आधारशी संलग्न आहे एनपीसीआयला जे बँक खात कुटुंब प्रमुखाचे मॅपिंग झालेले ते खातं ऍक्टिव्ह आहे का त्याची केवायसी झालेली आहे का या बाबी तुम्हाला तपासणं गरजेचे आहे आणि अद्याप जर तुमच रेशन बंद झालेला असेल आणि तुम्ही जर या अनुदानासाठी अर्जच केला नसेल तर मात्र मग तुम्हाला सर्वात पहिला अर्ज देखील करावा लागेल. या अर्जाच्या आधारे हा अर्ज दिल्यानंतर मंजूर झाल्यानंतर तुमच्या अनुदानाचे पैसे तुम्हाला यायला सुरुवात होईल तर आता तुमचे किती पैसे आलेले आहेत तुम्हाला पैसे येत आहेत का हे सुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *