शेतकऱ्यांनो तुमच्याकडे शेती आहे पण ती शेती कोरड वाहवू आहे बागाईत शेती नाही कारण त्या शेतीमध्ये विहीर नाही आणि विहीर खोदण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा भांडवल नाही. तर शेतकरी मित्रांनो चिंता करू नका राज्य सरकारने तुम्हाला विहीर खोदण्यासाठी पाच लाख रुपये पर्यंतच अनुदान हे सिंचन विहीर योजने अंतर्गत देत असतं आता या सिंचन विहीर योजनेसाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे पात्रता अटी निकष काय आहेत याची सविस्तर अगदी सोप्या भाषेतून माहिती तुम्हाला आज इथे मिळणार आहे चला तर मग जाणून घेऊया सविस्तर…
शेतकऱ्यांनो सिंचन विहीर योजना ही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा अंतर्गत राबवली जाते. भारत सरकारची प्रमुख योजना मनरेगा आहे त्या अंतर्गत ही योजना राबवली जाते ज्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराची हमी दिली जाते. या योजनेत पायाभूत सुविधांची उभारणीवर नैसर्गिक संसाधनाचे व्यवस्थापन करण्यासाठी विविध कामांचा समावेश आहे. त्यात विहीर योजना विशेष महत्त्वाची आहे कारण ती शेतकऱ्यांसाठी पाणी साठवण व सिंचनाच्या सोयीसाठी प्रभावी ठरत असते.
योजनेचे उद्दिष्ट:
आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार जरी कोणतीही योजना अनत असता तर तिचे काही प्रमुख उद्दिष्ट आणि उद्देश असतात. तसेच या योजनेचे काही उद्दिष्ट आहे ते म्हणजे शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करून देणे, भूजल पुनर्भरणासाठी प्रोत्साहन देणे, शेती उत्पादन क्षमता वाढवणे, दुष्काळ प्रवण भागातील शेतकऱ्यांना पाणी पुरवठ्याची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देणे अजून भरपूर उद्देश राज्य सरकारचा या योजनेमागचा आहे.
पात्रता व अटी;
आता शेतकऱ्यांनो तुम्हालाही जरी सिंचन विहीर योजने अंतर्गत पाच लाख रुपये पर्यंतच अनुदान घ्यायचं असेल तर त्यासाठी काही पात्रता व अटी या योजने अंतर्गत असतात त्या म्हणजे…
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवाशी व शेतकरी असणं आवश्यक आहे
- त्यानंतर अर्जदाराकडे किमान 0.40 हेक्टर शेती असावी.
- त्यानंतर शेतात आधीपासून विहीर नसावी.
- लाभार्थ्याचे बँक खाते आधारशी जोडलेले असणं आवश्यक आहे.
- प्रस्तावित ठिकाणापासून 500 मीटर च्या परिसरात दुसरी विहीर नसावी.
- अर्जदाराने या आधी वीहीर योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- अर्जदार मनरेगाच्या जॉब कार्डधारक कुटुंबाचा सदस्य असणं सुद्धा गरजेच आहे.
महत्वाची कागदपत्रे:
आता या योजने अंतर्गत अर्ज करायला तुम्हाला काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट लागतील. जसे की…
- आधार कार्ड,
- राशन कार्ड,
- उत्पन्नाचा दाखला,
- बँक पासबुक,
- रहिवास पुरावा,
- ग्रामसभा ठराव
- त्यानंतर शेतीचा सातबारा उतारा, अट उतारा,
- मोबाईल नंबर,
- ईमेल आयडी
- त्यानंतर अर्जदाराचा जातीचा दाखला
- आवश्यक असल्यास नकाशा आणि खोदकामासाठी आवश्यक परवानगी जॉब कार्ड जे की तुम्हाला रोजगार हमी योजने अंतर्गत मिळत असतं.
अर्ज कसा करायचा?
आता शेतकऱ्यांनो सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे अर्ज नेमक कसा करायचा आता सिंचन विहीर योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आता सिंचन विहीर योजनेला अर्ज करण्यासाठी दोन ऑप्शन आहेत एक म्हणजे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकतात आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा?
पहिले आपण ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा आहे तर तुम्हाला तुमच्या तालुका किंवा डिस्ट्रिक्टच्या मोठ्या झेरॉक्स सेंटरवरून जो सिंचन विहीर योजनेचा फॉर्म येतो मनरेगा अंतर्गत तर तो फॉर्म घ्यायचा आहे तो फॉर्म संपूर्ण भरायच आहे यात तुम्हाला ग्रामपंचायतीचा ठराव वगैरे सगळं जोडाव लागेल ग्रामसेवकाच्या सही शिक्का तुमच्या ग्रामपंचायतीच्या सगळं जे सिग्नेचर वगैरे तर तो फॉर्म कम्प्लीट करा आणि तुमच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये मनरेगाच्या डिपार्टमेंट मध्ये जमा करा ही झाली ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रोसेस
ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा?
आता तुम्ही यासाठी ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करू शकतात त्यासाठी तुम्हाला शेतकरी महा ईजीएस हॉर्टिकल्चर हे ॲप डाऊनलोड करावा लागेल हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्या ॲपला ओपन करा आणि तिथे तुम्ही सिंचन विहीर योजनेसाठी अर्ज करू शकतात तिथेही तुम्हाला बरेच डॉक्युमेंट विचारले जातील फॉर्म भरताना पण तुम्हाला सोपी पध्दत आहे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रोसेस तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करा कारण जे एवढेही डॉक्युमेंट असत तर तुमचे डायरेक्टली पंचायत समितीमध्ये ते पोहोचतील अजून जो ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा जो रेट आहे तर तो खूप कमी आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अडचणी सुद्धा शेतकऱ्यांना खूप फेस कराव्या लागल्या आहेत त्यामुळे हे जे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याच आहे तर ते एवढं अजून सुरळीत झालेल नाही, त्यामुळे बहुतेक तुम्ही ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करा.
