स्मार्ट सोलर योजना! 300 युनिट पर्यंत फुकट वीज मिळू शकते..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

ही भारत सरकारची योजना आहे ज्यात घराच्या छतावर रूफटॉप सोलर पॅनेल लावून वीज स्वतः तयार करता येईल आणि रोजच्या वीज बिलात मोठी बचत / 300 युनिटपर्यंत फुकट वीज मिळू शकते. घराच्या छतावर 1–3 kW सोलर सिस्टम लावता येईल.

राज्यात 100 युनिट पेक्षा कमी विजेचा वापर असलेल्या घरगुती वीज ग्राहकासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे स्मार्ट सोलर योजना ज्याच्या अंतर्गत दारिद रेषेखालील आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांना 47,500 रुपये पर्यंत अनुदान दिलं जातं आणि याच योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती अपडेट आणि याचबरोबर या योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जीआर याची माहिती आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

केंद्र सरकार सबसिडी देते —

  • 1 kW साठी सुमारे ₹30,000
  • 2 kW साठी ₹60,000
  • 3 kW साठी ₹78,000 (कमाल)
    सबसिडी थेट तुमच्या बँक खात्यात मिळते (DBT).

राज्यामध्ये 100 युनिट पेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील याचबरोबर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एक महत्त्वाची अशी योजना राबवली जाते ज्याच्या अंतर्गत पीएम सूर्यघर योजनेचे 30 हजार याचबरोबर 100 युनिट पेक्षा कमी विजेचा वापर असलेले दारिद्र्य रेषेखाली लाभार्थी यांना 17500 रुपये असे एकूण 47500 अनुदान दिलं जातं. एससी एसटी लाभार्थ्यांना 45000 रुपये तर इतर सर्वच लाभार्थ्यांना जे 100 युनिट पेक्षा कमी वापर आहे अशा घरगुती वीज ग्राहकांना 40 हजार रुपये पर्यंत अनुदान या योजनेच्या अंतर्गत दिलं जातं आणि याच्यासाठी राज्यामध्ये अर्ज भरायला सुरू झालेले आहेत. याच्या अंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांना आता अनुदानाच वितरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

किती निधी वितरीत केला जाणार आहे?

या योजनेच्या अंतर्गत दारिद्र रेषेखालील सुमारे एक लाख 54622 लाभार्थ्यांना सोलरचा लाभ दिला जाणार आहे तर 100 युनिट पेक्षा कमी विजेचा वापर असलेल्या 3,45,378 आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे एकूण 5 लाख घरगुती लाभार्थ्यांना छतावरील सोलर या योजनेच्या अंतर्गत दिला जाणार आहे ज्याच्यासाठी 2025-26 या आर्थिक वर्षा करता 330 कोटी तर 2026-27 या आर्थिक वर्षा करता 325 कोटी एवढा अनुदान निधी वितरित केला जाणार आहे आणि याच्याच अंतर्गत या निधीच वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर या स्मार्ट योजने करता लेखाशीर्ष निर्मितीला मंजुरी दिलेली आहे.

  • कोण अर्ज करू शकेल?
  • भारताचा नागरिक
  • घराचे छत असेल जे सौर पॅनेल बसवायला योग्य असेल
  • वैध वीज कनेक्शन असेल
  • आधी कोणतीही दुसरी सबसिडी घेतलेली नसावी (उदा: दुसरी सोलर सबसिडी)

आता लेखाशीर्ष निर्मिती झाल्यानंतर मंजूर करण्यात आलेला निधी या लेखाशीर्षाच्या अंतर्गत वितरित केला जाईल आणि याच्यानंतर जे काही लाभार्थी पात्र असतील त्या लाभार्थ्यांना डीबीटीच्या माध्यमातून या अनुदानाच वितरण केल जाणार आहे. या योजनेच्या अंतर्गत ओपन एससी एसटी ओबीसी सर्व प्रवर्गातील याचबरोबर दारिद्र्य खालील जे काही घटक असतील असे घटक या ठिकाणी लाभ घेऊ शकतात याच्यामध्ये 100 युनिट पेक्षा ज्यांचा विजेचा वापर कमी आहे असे लाभार्थी स्मार्टच्या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

कसे अर्ज करायचे?
PM Surya Ghar साठी राष्ट्रीय पोर्टलवर जा (pmsuryaghar.gov.in) आणि
Apply / Register करा
District / DISCOM / Consumer Number भरा
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
Approved vendor निवडा
Installation नंतर subsidy थेट बँकेत मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *