सोयाबीन पासून पनीर (टोफू) तयार करण्याची घरगुती पद्धत..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

सोयाबीन हे पूर्व आशियातील कडधान्य गटातील वनस्पती आहे यापासून तेल मिळत असल्याने याचा तेल बियामध्ये समावेश होतो. सोयाबीनच्या दरामध्ये चढउतार असले तरी मागणी सातत्याने वाढत आहे. सोयाबीन पासून तेल, पशुखाद्य या दोन मुख्य उत्पादनासह यापासून दूध, पनीर, योगर्ट, श्रीखंड सारखे अन्नपदार्थ बनवता येतात. सोयाबीनचे आरोग्यासाठी फायदे हाडांना मजबुती मिळते, तंतुमय पदार्थामुळे पचनक्रियेस मदत, रक्तदान नियंत्रणात राहण्यास मदत, कार्बोदके कमी असल्याने मधुमेहासाठी उत्तम कडधान्य ठरते. सोया दूध आधुनिक यंत्र द्वारे एक किलो सोयाबीन पासून सहा ते सात लिटर दूध तयार करता येते. सोयाबीन दुधाला गाईच्या दुधासारखी चव नसली तरी त्यात साखर,खोबरे, चॉकलेट, इलायची, व्हॅनिला अशा या स्वादांचा वापर केल्यास सर्वांना आवडते स्वयं दुधामध्ये प्रथिने जीवनसत्वे यांचे प्रमाण अधिक असते सोया दुधाचा वापर पनीर तयार करण्यासाठी देखील होतो. तर आज आपण बघणार आहोत की सोयाबीन दुधापासून पनीर कसे बनवायचे.

सोयाबीन पनीर बनवण्यासाठी लागणारी सामग्री:

१) सोयाबीन – ७५०gm (तुम्हाला हवे तितके तुम्ही घेऊ शकता).

२) वीनेगर – २ चमचे ( निंबू असेल तर ते देखील चालेल).

३) पाणी.

सोयाबीन पनीर बनवायची कृती:

आपण दुधाचे पनीर बनवतो पण आज आपण अतिशय पोस्टीक तसेच पनीरपेक्षा सुद्धा हाय प्रोटीन असलेले सोया पनीर बनवणार आहोत तर नक्की घरी ट्राय करून बघा सोयाबीन तुम्हाला कुठेही सहज मिळून जाईल दुकानांमध्येही तुम्हाला मिळून जाईल. सोयाबीनचा फारसा उपयोग आपण आहारामध्ये करत नाही पण हे खूप हाय प्रोटीन असतं आणि हे आपण खाल्लं पाहिजे.

तर हे सोयाबीन आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे. आणि धुतल्यानंतर आपल्याला ते कमीत कमी दहा ते बारा तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे नॉर्मल पाणी घ्यायचं आहे कोमट पाणी करायची काही गरज नाही, तर आपण हे भिजवून घेणार आहोत तुम्ही १० ते १२ तास सोयाबीन भिजल्यानंतर बघू शकता आपलं सोयाबीन छान भिजलेल असेल आणि त्यावरचे जे कव्हर असतं ते आपण काढून घ्यायचा आहे. कारण ते शरीरासाठी चांगलं नसतं म्हणून त्याचे जे साल आहे ते पूर्णपणे छान काढून घ्यायचा आहे तर हे साल करताना आपण दोन्ही हाताचा उपयोग करणार आहोत आणि दोन्ही हातावर ते रगडून रगडून आपण ते काढून घ्यायचा आहे पूर्णपणे काढून घ्यायचा आहे जसे आपण डाळिंबी बनवतो डाळिंबीची उसळ बनवतो त्याचा कव्हर कसं काढतो त्याच पद्धतीने सोयाबीनचा साल सुद्धा काढून घ्यायचा आहे. आणि दोन ते तीन पाण्याने ते स्वच्छ धुऊन घ्यायचं आणि त्याचा साल सुद्धा आपण वेगळं करून घेणार आहोत तर आपण ते करून घेऊया. तर आता आपण हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीची सोयाबीनची डाळ आपली सोयाबीनची डाळ झालेली आपल्याला दिसेल, आणि ती अतिशय सुंदर अशी भिजलेली दिसेल

आता आपण ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत इथे मी साधारणतः पाव किलो सोयाबीन घेतली होती आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि त्यामध्ये टाकायचा आहे थोडसं पाणी आपण तसं नारळाचं दूध काढतो सेम त्याच प्रोसेसने आपण सोयाबीनचे दूध सुद्धा काढून घेणार आहोत आता आपण याची फाईन पेस्ट करूया त्यामध्ये आपण थोडसं पाणी टाकून घेऊया आणि हे पेस्ट आपण एका पातील्यामध्ये कीव कोणत्याही भांड्यामध्ये आपण काढून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने आपण सर्व सोयाबीन वाटून घ्यायचे आहे. नंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं दूध हे निघालेल तुम्हाला दिसेल. आता हे दूध आपण चाळणीने गाळून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण कपड्याने गाळून घेणार आहोत तर सुरुवातीला आपण चाळणीने गाळून घेऊया हे तुम्ही हव तर लगेचच कपड्यांमध्ये टाकून घेऊ शकता. पण त्याला थोडा वेळ लागतो म्हणून या पद्धतीने आपण सुरुवातीला चाळणीने गाळून घेणार आहोत.

नंतर तुम्ही बघू शकता दूध बनलेले तुम्हाला दिसेल आणि जो उरलेला चोथा असतो त्यामध्ये अगदी थोडसं पाणी टाकायचं आहे खूप जास्त पाणी टाकायचं नाही कारण आपल्याला घट्टसर दूध हवं आहे तर यामध्ये आपण साधारणतः छोटा एक ग्लास पाणी टाकला आहे आणि हे छान मिक्स करून घेऊया आणि हे पुन्हा गाळून घ्यायचा आहे आणि ते दूध आपण दुधामध्ये टाकून घेऊया सोयाबीन आपण खूप वापरत नाही जास्तीत जास्त आपण सोयाबीन वडी किंवा सोयाबीन तेल घरामध्ये वापरतो तर या पद्धतीने तुम्ही घरी मुलांना सोयाबीन पनीर बनवून देऊ शकता. हाय प्रोटीन आहे तर नक्की घरी ट्राय करून बघा याची वेगवेगळ्या रेसिपीज सुद्धा बनवता येतात तसे आपण पनीरच्या रेसिपीज बनवतो सेम पद्धतीने आपण त्याच्या सुद्धा रेसिपीज बनवू शकता. आता हे दूध आपण कपड्याने गाळून घेणार आहोत त्यासाठी इथे मी कढई घेतली आहे आणि त्यावर ओढणी ठेवली आहे आपण गाळून घेऊया. सर्व गाळून घेतल्या नंतर आपण ते थोडसं पिळून घेऊया दोन ते अडीच लिटर दूध आपलं हे तयार झाला आहे. तर इथे मला पावकिलो सोयाबीन मध्ये २ ते २.५ लिटर दुध बणलेल आहे.

नंतर ते दूध आपण गॅस वर ठेवायच आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे. कारण दूध हे खाली लागू शकतं जसं आपलं दूध लागतं तसंच हे दूध सुद्धा खाली लागू शकतो, म्हणून सतत ढवळत राहायचं आहे हे दूध फाडण्यासाठी मी इथे विनेगर वापरणार आहे तुमच्याकडे जर विनेगर नसेल तर तुम्ही लिंबू दही सुद्धा वापरू शकता. तर इथे दोन ते अडीच चमचे छोटे विनेगर घेतला आहे आणि त्यामध्ये टाकायचा आहे साधारणतः अर्धा ग्लास पाणी दूध गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये विनेगरचं पाणी टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण ज्या पद्धतीने पनीर बनवतो त्याच पद्धतीने प्रोसेस करायची आहे थोडं थोडं विनेगर त्यामध्ये ऍड करायचा आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे तुम्ही बघू शकता विनेगर टाकल्यानंतर दूध वाढायला लागला आहे आणि अशा पद्धतीने आपलं हे पनीर छान रेडी होईल खूप पौष्टिक आहे. वीनेगर च पाणी टाकताना अगदी थोडं थोडं टाकायचं आहे एकदम टाकायचं नाही तर थोडं थोडं चमच्यामध्ये घेऊन टाकायचा आहे तुम्ही बघू शकता आपलं पनीर हे छान रेडी झालेल दिसेल. छान पनीर आपलं तयार होईल. आता आपण ते कपड्यांमध्ये काढून घेणार आहोत त्यासाठी इथे मी रुमाल घेतला आहे आणि त्याखाली एक मी डबा किंवा कुठलाही भांडे तुम्ही ठेवू शकता. अशा पद्धतीने त्यामध्ये ओतून घेऊया आता आपण त्यावर थोडंसं थंड पाणी टाकायचं आहे आणि स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे कारण सोयाबीनला थोडासा उग्र वास असतो पाण्याने स्वच्छ धुऊन घेऊया आणि त्यातलं पाणी आपण निथळून घ्यायचा आहे.

पाव किलो जर तुमचा सोयाबीन असेल तर साधारणतः तीनशे ते साडेतीनशे ग्राम पनीर तयार होतं. आता आपण त्यातलं पाणी काढून घेऊया जेवढे तुम्हाला काढता येईल तेवढे काढून घ्यायचा आहे नंतर रुमालाला छान घडी करून किंवा गाठ बांधून ठेवायचे आहे आणि त्यावर थोडीशी जड वस्तू ठेवायची आहे जेणेकरून त्यातलं पाणी हे पूर्णपणे निथळून जाईल आणि हे आपल्याला ठेवायचं आहे एक ते दोन तास नंतर तुम्ही बघू शकता त्या खालचे जे पानी आहे ते तुम्ही फेकून देऊ शकता कारण यामध्ये कुठल्याही प्रकारचा जीवनसत्व नाहीये किंवा प्रोटीन नाहीये तर हे पाणी तुम्ही घ्यायचं नाहीये हे पाणी आपण फेकून देणार आहोत. दोन तासानंतर तुम्ही बघू शकता आपलं पनीर छान तयार झाला आहे. आता आपण ते ओपन करून बघूया त्यावर जड वस्तू ठेवल्याने ते छान सेट होतं ते बघू शकता आता आपण त्याचे काप करूया, हे थोडसं कोरड असत म्हणून पनीर बनवताना त्या दुधामध्ये तुम्ही थोडीशी साय टाकू शकता त्याने हे छान मऊ लुसलुशीत होतं तुम्ही बघू शकता आपलं पनीर छान बनवून तयार झाल आहे आपण त्याचे काप करूया. आणि आशा प्रकारे आपले सोयाबीन पनीर बनवून तयार झालेले आहे.

निष्कर्ष:

सोयाबीन पासून बनणारे पनीर याला टोफू असे देखील म्हणतात. हे आपलं ग्लुटेन फ्री आहे, लॅक्टोज फ्री आहे, फॅट कमी आहे. सोयाबीन पनीर मध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन जास्त असतात. साध्या पनीर पेक्षा आणि याच्यामध्ये कार्बस हे जास्त असतात. कॅलरी कमी असतात, फॅट कमी असतात आणि शुगर नसते त्यामुळे शुगर फ्री आहे. शुगर लोकांसाठी हे एक चांगले फायदेमंद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *