केंद्र सरकारची एक योजना आहे उद्योग करणाऱ्या महिलांना केंद्र सरकार तीन लाख रुपयांची मदत करणार आहे ही मदत कशाप्रकारे करणार आहे याची सविस्तर माहिती आपण या पाहणार आहोत उद्योगिनी हे एक केंद्र सरकारची योजना आहे या योजनेअंतर्गत महिलांना उद्योग करण्यासाठी तीन लाख रुपया पर्यंतची मदत दिली जाते महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने उद्योगिनी योजना 2025 आणखी सक्षम केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना बिनतारण 3 लाखांपर्यंतचे कर्ज आणि सुमारे 30% अनुदान मिळणार आहे. या योजनेत ग्रामीण महिलांना विशेष प्राधान्य दिलेले आहे
महिला उद्योगिनी योजना या योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्ज येथे महिलांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी इथे देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत महिला त्यांचा स्वतःचा व्यवसाय इथे वाढू शकणार आहेत नवीन व्यवसाय सुरू करू शकणार आहात.
उद्योगिनी योजना 2025 म्हणजे काय?
→ उद्योगिनी योजना ही महिलांना उद्योजक बनवण्यासाठी तयार केलेली विशेष आर्थिक मदत योजना आहे.
→ या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करणे आणि लघुउद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे आहे.
स्वतःच्या पायावर उभा राहून स्वावलंबी व्हावं म्हणून महिलांनी त्यांच्या सातत्याने धडपड असते एखादा व्यवसाय करून चांगलं उत्पन्न मिळवायचं म्हटलं तर स्वतः जवळ भांडवल नसतं त्यामुळे महिला उद्योग उभारू शकत नाहीत महिलांजवळ कौशल्य असून सुद्धा त्यांना उद्योग उभारता येत नाही हीच बाब लक्षात घेऊन शासनाकडून महिलांना बँकेमार्फत व्यवसायासाठी कर्ज देण्याची सुविधा उद्योग योजनेच्या माध्यमातून करण्यात येते या योजने अंतर्गत तीन लाखापर्यंत व्याज परतावा निरंक करण्यात आलाय म्हणजे तीन लाखावर कोणत्या प्रकारचं व्याज इथे आकारलं जाणार नाही यात कर्ज रक्कमेच्या तीन टक्के व्याज केंद्र शासनाकडून भरण्यात येणार आहे व चार टक्के व्याज राज्य शासनाकडून इथे भरण्यात येणार आहे यामुळे तीन लाखापर्यंत बिनव्याजी महिलांना कर्ज इथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कोणते व्यवसाय सुरू करता येतील?
- ब्युटी पार्लर
- टेलरिंग / शिवणकाम
- किराणा दुकान
- दुग्धव्यवसाय
- पापड, मसाले, लोणचे उत्पादन
- एकूण 88 प्रकारचे लघुउद्योग
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये:
- $ 3 लाखांपर्यंत बिनतारण कर्ज
- 30% पर्यंत अनुदान
- सोपी कागदपत्र प्रक्रिया
- परतफेडीची लवचिक सुविधा
- महिलांच्या नावावर व्यवसायासाठी प्रोत्साहन
कोण करू शकते अर्ज?
- वय 18 ते 55 वर्षे
- कोणतेही पूर्वीचे कर्ज थकित नसावे
- वार्षिक उत्पन्न 1.5 लाखांपेक्षा कमी
- विधवा व अपंग महिलांसाठी उत्पन्न मर्यादा नाही
- निवडलेल्या व्यवसायाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक.
- यामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारची अट इथे दिलेली नाहीये कर्जाचा लाभ घेण्यासाठी महिलांना कोणत्याही जमावदाराची आवश्यकता भासणार नाही म्हणजेच जो काय आपण त्याला म्हणतो जामीनदार त्याची आवश्यकता इथे भासणार नाही
- कर्ज परतफेडीचा कालावधी हा सात वर्षाचा ठेवलेला आहे.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबुक
- दोन फोटो
- उत्पन्न प्रमाणपत्र
अर्ज कसा करावा?
- UMANG अॅपवर योजना शोधा
- myScheme पोर्टलवर तपशील पाहा
- जवळच्या बँक किंवा सरकारी कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज करा
- कागदपत्रे सादर करून प्रक्रिया पूर्ण करा
महिलांसाठी खऱ्या अर्थाने संधी स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी ही योजना महिलांसाठी मोठा आधार आहे. कमी गुंतवणुकीत स्थिर उत्पन्न मिळवण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.
या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ तुम्हाला इथे मिळवायचा आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला बिनव्याजी कर्ज इथे तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी दिला जातो आणि यावर जे काही व्याज असतं ते चार टक्के राज्य शासनाकडून आणि 3% केंद्र शासनाकडून पेड केलं जातं ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे तर अशाप्रकारे महत्त्वाची योजना होती नक्की ज्या काही महिला असणार आहे ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे अशा महिलांना या योजनेचा नक्की फायदा होणार आहे कारण की उद्योग योजने अंतर्गत आता त्यांना तीन लाख रुपया पर्यंत बिनव्याजी कर्ज इथे उपलब्ध करून दिलं जात आहेत.

