उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल?…

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

आपल्या डोळ्यांना प्रखर सूर्यप्रकाश कोरडी हवा आणि आपल्या डोळ्याला जे इन्फेक्शन होतं ते टाळण्यासाठी उन्हाळ्यात डोळ्यांची जास्त काळजी घेणं आवश्यक आहे. आता ती काळजी कशी घ्यायची ते आपण आता बघूया. सूर्यापासून सूर्य किरणांपासून आपल्या डोळ्यांच आपण रक्षण केलं पाहिजे सूर्यकिरणांपासून आपल्या डोळ्यांचे रक्षण करण्याकरता आपण सनग्लासेस वापरले पाहिजेत.डोळे नेत्र नयन किंवा लोचन हे आपले सर्वात महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय आयुर्वेदानुसार तेज या महाभूताची शरीरातली उपस्थिती डोळ्यांची जी चमक असते ना त्यातून कळते शरीराचे मनाचे कुठलेही भाव डोळ्यांमधून आपोआप व्यक्त होतात

आपले डोळे नेहमी ओलसर ठेवा कोरडी हवा असते त्यामुळे डोळे कोरडे पडतात दुखायला लागतात त्यामुळे डोळे ओलसर ठेवा त्यासाठी लुब्रिकंट आय ड्रॉप्स मिळतात ते वापरत चला आणि हायड्रेट रहा दिवसभरात आठ ते दहा ग्लास उन्हाळ्यात पाणी पिलच पाहिजे आणि पाण्याची पातळी शरीरातली व्यवस्थित ठेवा त्यामुळे सुद्धा डोळ्याच आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.

दिवसभरात स्क्रीन टाइम कसा आणि किती ठेवायचा:

आता सध्या सगळ्यांचाच स्क्रीन टाईम हा खूप वाढलेला आहे.तो मर्यादित करा त्यामुळे डोळे सतत स्क्रीन कडे बघितल्यामुळे डोळे कोरडे होत आहेत त्यामुळे करायचं काय 20 20 मिनिटे हा नियम पाळायचा आहे, काय आहे हा नियम 20 20 तर दर 20 मिनिटांनी 20 फूट अंतरावर दूर असलेल्या एखाद्या गोष्टीकडे 20 सेकंदासाठी पहा 20 मिनिटांनी 20 फूट दूर एखाद्या गोष्टीकडे 20 सेकंदासाठी तुम्हाला पाहायचं आहे.

असं थोडं थोड्या वेळाने तुम्ही करायचं आहे. त्यामुळे काय होईल तुमच्या डोळ्यावरचा जो ताण आलेला आहे तो कमी होईल. त्यानंतर आपली स्क्रीन जी आहे लॅपटॉपची स्क्रीन असेल, मोबाइल ची स्क्रीन किंवा तुमच्या कंम्प्युटरची स्क्रीन असेल तर ती ऍडजस्ट करा. तुमचं स्क्रीन पासून अंतर किती आहे ते बघा त्याचा ब्राईटनेस कसा आहे तो बघा. आणि दिवसभरात एकूणच तुमचा स्क्रीन टाईम जो आहे तो कमी केला पाहिजे आणि शांत झोप खूप आवश्यक आहे डोळ्यावर ताण येणार नाही अशा गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत दोन्ही हात रब करून तुम्ही डोळ्यावर थोड्या वेळासाठी ठेवायचे आहेत परत दोन्ही हात रब करायचे आहेत परत डोळ्यावर ठेवायचे आहेत असं दिवसभरात दोन तीन वेळा जर तुम्ही केलं तरी सुद्धा डोळ्याला शांत वाटतं थंड वाटतं तर असे उपाय करून बघा आणि तुम्हाला डोळ्या उन्हाळ्यामध्ये जे डोळ्यांचे उष्णतेचे विकार होतात त्यापासून तुम्हाला आराम वाटेल आणि डोळ्यांना इन्फेक्शन होणार नाही याची काळजी घ्या स्वच्छता बाळगा सतत तुमचे हात पाण्याने धुत रहा डोळे पाण्याने धुवायचे आहेत. दिवसातून दोन ते तीन वेळा स्वच्छ थंड पाण्याने जर डोळे तुम्ही धुतले तर तुम्हाला ताजतवान वाटतं आणि डोळ्यातली घानही निघून जाते.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी योग्य आहार:

डोळ्यांच आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तुमच्या आहारामध्ये व्यवस्थित हिरव्या भाज्या विटॅमिन ए विटॅमिन सी नंतर पालेभाज्या त्यामध्ये गाजर पालक लिंबूवर्गीय फळं त्यानंतर विटॅमिन ई ओमेगा फॅटी ऍसिड साठी नट आणि सीड्स तुम्ही घेऊशकता उन्हाळ्यामध्ये टरबूज आणि काकडी हे जर घेतलं तर तुमच हायड्रेशन चांगलं राहू शकतं म्हणून तुमच्या शरीरामध्ये पाण्याची पातळी योग्य ती राहण्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे उन्हात जाताना तुम्ही सनग्लास वापरले पाहिजे. आपल्या जेवणामध्ये फारच तेलकट तिखट सतत न खाता फ्रेश हिरव्या भाजीपाला सुद्धा असले पाहिजेत.

डोळ्यांचा कोरडेपणा कसा दूर करावा:

कोरडेपणाचा त्रास आहे तो कमीत कमी होईल याच्या प्रकारचं खाणं खावं ज्याच्यामुळे याचा फायदा असतो तर फिश मध्ये एक ऑइल असतं याच्यामध्ये ओमेगा थ्री रिच ऑइल असते हे तर याच्यामुळे आपल्या डोळ्याला नक्की फायदा असतो अर्थात जे शाकाहारी असतील त्यांनी ड्रायफ्रूट्स खास करून अखरोट बदाम हे खाणं फार महत्त्वाचं आहे याच्यातून आपल्याला ओमेगा थ्री चे औषध मिळतात याशिवाय पूर्ण व्यवस्थित पाणी पिणं बऱ्याच लोकांना अ पाणी प्यायची सवय नसते त्यांना डिहायड्रेशन होत असतं त्यामुळे सुद्धा कोरडेपणा वाढत असतो त्यामुळे पाणी मुबलक प्यावं आणि हिरव्या भाजीपाल्यांचा वापर आपल्या जेवणामध्ये नक्की असावा.

डोळीखालील काळे वर्तुळे व त्यावरील उपाय:-

सतत मानसिक तान कमी झोप सतत डोळे चोळणे समतोल आहाराचा नियमित वापर न करणे कुपोषण ऍलर्जी निस्तेज त्वचा वय वाढणे डिहायड्रेशन पिगमेंटेशन अशा विविध कारणांमुळे डोळ्याभोवती काळी वर्तुळे निर्माण होतात ही निर्माण झालेली काळी वर्तुळे घालवण्यासाठी आपण बाजारात मिळणाऱ्या विविध केमिकलचा वापर करतो काही काळ ही वर्तुळे गेल्यासारखी वाटतात परंतु या केमिकलचा या डोळ्याभोवती विपरीत परिणाम झालेला दिसून येतो केवळ सौंदर्याच्या दृष्टीनेच नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीनेही या वर्तुळांचा विचार करायला हवा.

 एक चमचा लिंबू रस घ्या व एक टोमॅटो घ्या दोन्ही एकत्र करा व त्याची पेस्ट तयार करा आणि ही तयार झालेली पेस्ट या डोळ्याभोवती वर्तुळावरती लावा साधारणपणे वीस मिनिटानंतर हे धुऊन टाका असे काही दिवस उपचार केल्यास ही जी डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे आहेत ती नष्ट होतात.

 काकडीचे काप घ्या आणि हे काप नियमितपणे डोळ्यावरती साधारणपणे वीस मिनिटे ते 30 मिनिटे एवढा वेळ ठेवा अशाप्रकारे काही दिवस केल्यानंतर डोळ्याला थंडावा निर्माण होतो त्याचबरोबर डोळ्याच्या भोवती आलेली काळी वर्तुळे नष्ट होतात.

संत्र्याचा रस घ्या व हा रस डोळ्याभोवती लावा वीस मिनिटानंतर धुऊन टाका असे काही दिवस केल्यानंतर या डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे नष्ट होतात.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *