“कसली फिट आहे ना ती…!” असं आपण एखादीकडे बघून हेव्याने म्हणतो. पण फिट असणं म्हणजे काय? कोणी कबूल करो अथवा न करो, आपल्या आत्ताच्या वजनातून 5-10-15-20 किलो कमी झाले तर किती छान होईल हा विचार सगळ्यांच्या मनात असतोच.
बारीक म्हणजे फिट का?
1. फिटनेसच्या अनेक व्याख्या असू शकतात. पण सर्वसामान्यपणे विचार केला तर आपल्याला रोजचं आयुष्य जगण्यात आणि त्याव्यतिरिक्त काही शारीरिक श्रमाचे कष्ट करण्यात अडचणी येत नाहीत. वजन मापात आहे तर आपण फिट आहोत असं म्हणू.
2. निदान चाळीशीपर्यंत तीन-चार जिने सहज चढता येणं, दहा-बारा किलो भाजी किंवा किराणा एखाद्या किलोमीटरवरुन उचलून आणता येणं, स्टूलवर चढून पाच-सात किलोचे डबे वरच्या मांडणीवर ठेवता/काढता येणं, रोजची कामं केल्याने प्रचंड थकवा न येणं, असे काही निकष आपण फिटनेस ठरवताना वापरु शकतो.
3. फिटनेस म्हणजेच ज्याच्याकडे ताकद स्टॅमिना, बॅलेन्स आणि लवचिकपणा हे सगळे गुण असतात, ती व्यक्ती फिट अस आणि अशी सर्व अर्थाने फिट असणारी व्यक्ती बहुतेक वेळा बारीक असतेच.
4. पण बारीक असणारी व्यक्ती फिट असेलच असं काही सांगता येत नाही. म अत्यंत शिडशिडीत मुलीला जर का दोन पायऱ्या चढून धाप लागत असेल तर ती फिट नाही त्यामुळे बारीक असण्यापेक्षा फिट असणे महत्त्वाचं! विचारा स्वतःला आपण फिट आहोत का?
असेच नवनवीन आरोग्यविषयक लेख वाचण्यासाठी sachbaathai.com या संकेतस्थळावर अपडेट रहा.
One thought on “वजन कमी करायचं की फिट व्हायचं ?”