केंद्र सरकारनं मुलांच्या भविष्यासाठी एक महत्त्वाची आणि दूरदृष्टीची योजना सुरू केली आहे. या योजनेचं नाव आहे NPS वात्सल्य योजना. या योजनेअंतर्गत पालक आपल्या अल्पवयीन मुलांच्या नावाने निवृत्तीवेतन (Pension) खाते उघडू शकतात आणि लहान वयापासूनच त्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी बचत सुरू करू शकतात. या योजनेअंतर्गत लहान मुलांना देखील आता पेन्शनचा लाभ मिळणार आहे त्यामुळे पालकांना आपला मुलाचं भवितव्य आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याची संधी या योजनेद्वारे मिळणार आहे पण ही योजना नेमकी काय आहे कोणत्या वयोगटातील मुलांना या योजनेचा लाभ घेत येणार आहे त्याचे फायदे नेमके काय आहेत हे या माहितीच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात..
NPS वात्सल्य योजना म्हणजे काय?
NPS वात्सल्य ही National Pension System चीच एक विशेष योजना आहे, जी खास मुलांसाठी तयार करण्यात आली आहे. पालक किंवा कायदेशीर पालक आपल्या मुलाच्या नावाने हे खाते उघडू शकतात. मुलाच्या लहान वयात केलेली गुंतवणूक दीर्घकाळात मोठा निधी तयार करते.
या योजनेअंतर्गत पालकांना आपल्या मुलांना आर्थिक रित्या सक्षम बनवता येणार आहे एनपीएस वात्सल्य या योजनेत फ्लेक्सिबल कॉन्ट्रीब्यूशन आणि गुंतवणुकीचे पर्याय देखील आहेत त्यानुसार मुलांच्या नावावरती वार्षिक हजार रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येणार आहे.
योजना कोणत्या वयोगटासाठी लागू होणार आहे?
आता ही योजना कोणत्या वयोगटासाठी लागू होणार आहे ते पाहूया या योजनेअंतर्गत पालक आपल्या अल्पवहीन मुलांच्या नावावरती बँक खात्यात पैसे जमा करू शकतात या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलाच्या नावावर हे बँक खातं हस्तांतरित करण्यात येणार आहे म्हणजेच एनपीएस मध्ये हे अकाउंट कन्वर्ट केलं जाणार आहे 18 ते 60 वर्ष वयोगटातील प्रत्येक भारतीय नागरिकाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे यासाठी तुम्ही ईएनपीएस पोर्टल वरती जाऊन खातं सुरू करू शकता या योजनेअंतर्गत अल्पवयीन मुलांना परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर देखील दिला जाणार आहे. ही योजना निवृत्ती वेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत राबवली जाणार आहे दीर्घकालीन आर्थिक नियोजन आणि सर्वांना आर्थिक सुरक्षा मिळावी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
योजनेचा मुख्य फायदा:
या योजनेचा मुख्य फायदा म्हणजेच पालकांनी या योजनेअंतर्गत केलेली गुंतवणूक ही कालांतराने मुलांना एक मोठा आर्थिक फायदा मिळवून देऊ शकणार आहे त्याचबरोबर वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलाच्या नावाने हे अकाउंट एनपीएस अंतर्गत हस्तांतरित केलं जाणार आहे.
NPS वात्सल्यमुळे किती मोठा फायदा होऊ शकतो?
समजा तुमचं मूल 19 वर्षांपासून 60 वर्षांपर्यंत दरमहा फक्त 1,000 रुपये गुंतवतले तर
एकूण गुंतवणूकः सुमारे 7 लाख 20 हजार रुपये
अंदाजे मिळणारे व्याजः जवळपास 3 कोटी 76 लाख रुपये
एकूण कॉर्पसः सुमारे 3 कोटी 83 लाख रुपये
आता समजा 60 वर्षांनंतर हा संपूर्ण निधी अॅन्युइटी प्लॅनमध्ये गुंतवला
तरी व्याजदर फक्त 5 ते 6 टक्के धरला वर्षाला सुमारे 19 ते 22 लाख रुपये उत्पन्न
दरमहा अंदाजे 1.5 ते 2 लाख रुपये पेन्शन म्हणून मिळू शकतात.
योजनेच्या महत्त्वाच्या अटी व नियम:
- खाते फक्त मुलांच्या नावानेच उघडता येते
- मुलंच या योजनेचे एकमेव लाभार्थी असतात
- सर्व प्रमुख बँका, पोस्ट ऑफिस आणि पेन्शन फंडात खाते उघडण्याची सुविधा
- ई-NPS द्वारे ऑनलाईन खाते उघडता येते
- नाही गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा
- खात्यात जमा झालेल्या रकमेवर चक्रवाढ व्याज मिळते
- खाते सुरू केल्यानंतर 3 वर्षांनी शिक्षण, गंभीर आजार यासाठी 25 टक्के रक्कम काढता येते
- मुलाचे वय 18 वर्ष होईपर्यंत जास्तीत जास्त 3 वेळा रक्कम काढण्याची मुभा
- मुलगा किंवा मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत खात्यातून पूर्णपणे बाहेर पडता येणार नाही.
NPS वात्सल्य खाते कसं उघडायचं?
NPS वात्सल्य खाते प्रमुख बँका, पोस्ट ऑफिस, पेन्शन फंडातील Points of Presence (POP) येथे उघडता येते
ई-NPS ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारेही खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे.
ICICI बँकेनं आधीच काही मुलांची NPS वात्सल्य खाती नोंदवली असून PRAN नंबरही जारी करण्यात आले आहेत
ऑनलाईन खाते उघडण्यासाठी लिंक
https://app.camsnps.com/CRA /auth/enps/register?source= eNPS


