Investment Idea for Tax payers : गुंतवणूक करुन कसा वाचवाल कर ? जाणून घ्या ‘हे’ पर्याय…

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

💸गुंतवणूक करुन कसा वाचवाल कर ? जाणून घ्या ‘हे’ पर्याय…


प्रत्येक करदात्याच्या पगारातून जर तुम्ही योग्य वेळी कुठे गुंतवणूक केली नसेल तर टॅक्स कापला जातो. पण तुम्ही गुंतवणूक करुन कर वाचवू शकतात. काही पर्याय खालीलप्रमाणे :

▪️एफडी – 5 वर्षांच्या कालावधीसाठी जर तुम्ही FD मध्ये पैसे गुंतवले तर तुम्ही आयकर कायद्याच्या 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांचा कर लाभ घेऊ शकता. एफडीवर ७ ते ८ टक्के व्याज दिले जाते.

▪️PPF – सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीच्या गुंतवणूकदारांना देखील करात सूट मिळते. पीपीएफमध्ये मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर लागत नाही.

▪️इक्विटी लिंक्ड बचत योजना – इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम मध्ये, तुम्ही 1 वर्षात 1 लाख रुपयांपर्यंतची करमुक्ती करू शकता.

▪️राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र – राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र 6.8 टक्के व्याज देते. या योजनेत तुम्ही 1 आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांची कर कपात करू शकता.

▪️जीवन विमा – लाइफ इन्शुरन्स पॉलिसींमध्येही कर सूट उपलब्ध आहे. यामध्ये तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंत कर कपात करू शकता.

▪️राष्ट्रीय पेन्शन प्रणाली – नॅशनल पेन्शन सिस्टम ही एक स्वयंसेवक योजना आहे. या योजनेत देखील, तुम्हाला प्राप्तिकर कायद्याच्या 80CCD अंतर्गत 50,000 रुपयांपर्यंत कर सूट मिळू शकते.

▪️कर्मचारी भविष्य निर्वाह निधी – कर्मचारी भविष्य निर्वाह निधीद्वारे देखील कर वाचवता येतो. यामध्ये तुम्ही 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतचा कर लाभ घेऊ शकता.

▪️ज्येष्ठ नागरिक बचत योजना – ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूकदारांना कर सवलतीचा लाभ मिळतो.

▪️सुकन्या समृद्धी योजना – मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेत  देखील तुम्ही पैसे गुंतवू शकतात. ही एक करमुक्त योजना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *