अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण अन् दोन मिनिटांमध्येच कोसळले विमान..!
अहमदाबाद येथून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे रवाना होण्यासाठी एअर इंडियाच्या विमानाने गुरुवारी दुपारी उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच ते कोसळले व आग लागून भस्मसात झाले. बोइंग ७८७ ड्रीमलाइनर प्रकारातील या विमानात ११ लहान मुलांसह २४२ जण होते. त्यापैकी केवळ एकच प्रवासी बचावला आहे. मृतांत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे. विमान दुर्घटना शहरातील दाट लोकवस्तीच्या…