आतुरता पंढरीच्या वारीची !! आषाढी वारी २०२५!!
अवघाचा संसार, सुखाचा करीन! आनंदे भरीन, तिन्ही लोक ! जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया! अनंत तीर्थाचे माहेर असलेल्या भुवैकुंठ पंढरीत कटेवर हात ठेवून भक्तांच्या भेटीसाठी अतुर झालेल्या सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या १९४ व्या पालखी सोहळ्याने गुरूवारी भर पावसात पंढरीसाठी प्रस्थान केले. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ असा जयघोष आणि टिपेला पोहोचलेला टाळमृदंगाचा…